Skip to main content

‘मेजॉरिटी’ - बहुमतात सामील होण्याचं प्रशिक्षण

चिंतातुर जंतू यांनी या दिवशी प्रकाशित केले.
Majority - poster आफ्रिकन, मध्यपूर्वेतल्या किंवा दक्षिण अमेरिकेतल्या चित्रपटांमध्ये अनेकदा भारतीय संस्कृतीसारख्या संवेदना किंवा आस्थाविषय दिसतात. त्यामुळेच कधीकधी आपल्या समस्या या त्यांच्याही झालेल्या दिसतात. 'मेजॉरिटी' या तुर्की चित्रपटाच्या बाबतीत असंच झालं. मर्तकान या तरुण मुलाची ही गोष्ट आहे. आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायात ते त्याला हळूहळू सामील करून घेत आहेत. मित्रांबरोबर भटकणं, गाड्या उडवणं, पब/डिस्कोमध्ये जाऊन यथेच्छ 'एन्जॉय' करणं असा त्याचा दिनक्रम आहे.

...

अभिषेक९ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
काव्यरस
आजचे पान कोरे-करकरीत आहे, अगदी पांढरे शुभ्र .... इतके की पेन टेकवायची पण भय... कदाचित त्याचे सौंदर्यच नष्ट होईल... मागची पाने गच्च आहेत आहेत असंख्य रंग लाल, पिवळा, निळा, भगवा गडद्द आहे, गुलाबीपण आहे ... पण फिक्कट.. आहेत अनेक अक्षरे काना, मात्रा, अनुस्वार सगळे सुष्पष्ट आहे, जोडाक्षरेही आहेत... पण खोडलेली... आहेत आकडे पण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आहेत, भागाकारही आहे...

स्त्रीमुक्ती - विस्कळीत विचार

चित्रा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पाश्चिमात्य तसेच भारतातील स्त्रीमुक्तीवादी चळवळींचा माझा अभ्यास नाही, हे या लहानशा लेखाच्या प्रारंभीच सांगून टाकते. तेव्हा या लेखात जे काही आहे, ते माझ्या वैयक्तिक निरीक्षणांमधून आले आहे, त्यात माझे अनुभव जेव्हा कधीतरी स्त्रीमुक्तीवादी लेखिकांच्या स्त्री किंवा मिळून सार्‍याजणी सारख्या मासिकांमधून ज्या कथा/कादंबर्‍या किंवा लेख हाती लागले त्यांच्याशी आपोआप जोडले गेले, कधी त्यात आणि माझ्या मध्यमवर्गीय आयुष्यात मी जे काही समान पाहिले त्यामधून ही मते कधी टोकदार तर कधी बोथट होत गेली.

केतकीच्या बनी तिथे..

विसोबा खेचर यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
केतकीच्या बनी तिथे... (कृपया येथे ऐका)
१९७०-७५ चा काळ असावा तो. किंवा ७०चं दशक म्हणुया. संध्याकाळी पावणे सात की सात वाजता आकाशवाणी मुंबई 'ब' वर केवळ १५ मिनिटांचाच मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागायचा. त्यात हे गाणं अगदी हटकून ऐकायला मिळायचं.

गुळाची पोळी........

निवेदिता-ताई यांनी या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य--- एक वाटी बेसन पिठ, एक ते दीड वाटी रिफ़ाईंड, पांढरे तिळ एक वाटी, गुळ चांगला पिवळा दोन ते अडीच वाट्या, वेलदोडा पुड एक चमचा,तांदूळ पिठी. पारीसाठी- एक वाटी मैदा, अर्धी वाटी कणीक,चिमुटभर मिठ, एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालुन पिठ घट्ट भिजवुन ठेवा.

हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी

रुपाली प्रा॑जळे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
८ ते १० कचोरी साठी साहित्य : १. हिरवी तुरीची दाणे २ वाट्या २. हिरवी मिर्ची ३ ते ४ ३. जिरे, हि॑ग (आवश्यकतेनुसार) ४. तिखट, हळ्द, मिठ (चविनुसार) ५. मैदा २५० ग्राम ६. खाण्याचा सोडा चिमुट्भर ७. तिळ १ टिस्पुन ८. तेल तळण्याकरीता कृती : १. हिरवी तुरीची दाणे व हिरवी मिर्ची मिक्सर मधुन बारीक करुन घ्यावीत. २. त्यामधे तिखट, हळ्द, मिठ (चविनुसार) व जिरे, हि॑ग (आवश्यकतेनुसार) घालुन मिक्स करा. ३. मैद्यात मिठ,चिमुट्भर खाण्याचा सोडा ,तिळ, २ टिस्पुन गरम तेल घालुन मळावे. ४. मैद्याचे छोटे गोळे करुन पुरीसारखे लाटुन घ्यावे. ५.

रंग-रुप जास्वंदीचे

जागु यांनी या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम पुज्य गणपतीच आवडत फुल म्हणजे जास्वंद. जास्वंदीचा पुजेपासुन आयुर्वेदिक औषधांसाठी वापर केला जातो. जास्वंदीचे मुळ, पान फुल अगदी सगळ्याचाच औषधा मध्ये वापर केला जातो. केसांच्या संवर्धनासाठी जास्वंद ही वरदान ठरली आहे. पुर्वी जास्वंद ही लाल रंगात जास्त दिसायची पण निसर्गनिर्मित जास्वंदीला आता कृषीतज्ञांनी वेगवेगळी रुप व रंग दिले आहेत.

तात्पर्यात गडबड? नेहमीच्या कथा..

गवि यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासून (किंवा लहानपणीच !!) नेहमी ऐकलेल्या काही कथा. त्यातली एकदोन सँपल उदाहरणं उचलून दाखवतो. यातल्या काही कथा तर उदाहरण / चांगले विचार / बोध याकरता सांगितल्या जातात..अजूनही सांगितल्या जातात का माहीत नाही. पण बर्‍याच कथा त्या त्या वेळी शाळेतल्या बाई किंवा आजूबा आज्जींकडून ऐकून घेतल्या. आता त्याविषयी उलट विचारही मनात येतात : १) द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी वस्त्रहरण करणार्‍याच्या मनात शरम उत्पन्न करणं किंवा त्याचे हात लुळे पाडणं किंवा त्याचं डोकं कलम करणं अशा प्रकारे मदत करण्याऐवजी फक्त वस्त्रपुरवठा करत राहून तो "शो" लांबवत का ठेवला..?