तापोळा - महाराष्ट्राचे मिनी काश्मीर
"तापोळा - महाराष्ट्राचे मिनी काश्मीर"
घरी बसून कंटाळा आलेला आणि त्यातून लग्नाचा वाढदिवस जवळ आलेला म्हटलं काहीतरी जवळपास पण कधी न गेलेलो ठिकाण पाहू. मग नोव्हेंबर च्या शेवटी प्लॅन केला , शक्यतो वीकएंड टाळून (म्हणजेच गर्दी टाळून ) जाता येईल असं ठरवून गुरुवार शुक्रवार सुट्टी हाणली आणि महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या "तापोळा" ह्या ठिकाणी जाण्याचं ठरवले. बुकिंग साठी बरेच ठिकाणं शोधली आणि "शिवसृष्टी ऍग्रो टुरिसम " इकडे बुकिंग करून निवांत झालो. ह्या वेळेस ठरवले होते कि जास्त फिराफिर न करता निवांत राहायचे.
मिसळपाव