Skip to main content

तरीही लिहा..

Published on शुक्रवार, 18/02/2011
कागद म्हणतो लिहा , लेखणी म्हणते लिहा, दौतीतली शाई म्हणे लिहा लिहा अन लिहा काळजातल्या तक्रारी फुंकर मागतात, अंधारातले कोपरे उजेड मागतात, मग, लिहा लिहा अन लिहा अवघडलेले शब्द वाटा मागतात, नेहमीच्या वाटा बदल मागतात, मग, लिहा लिहा अन लिहा. मन म्हणते मला सुचत नाही, गाणे म्हणते तुला जमत नाही, कोणी म्हणे ताल नाही, कोणी म्हणे चाल नाही, तरीही, लिहा लिहा अन लिहा.

आपल्या आईवडिलांना क्षमा करा !

लेखक सातबारा
Published on शुक्रवार, 18/02/2011
आपल्या आईवडिलांना क्षमा करा ! चिगोंची मार्गाथा व वपाडाव यांची व्यथा , त्यांच्या कथा ह्रुदयद्रावक आहेतच पण आईवडिलांची बाजू पण समजून घेतली पाहीजे. सर्वसाधारणपणे असे दिसते की थोरली मुले जास्त मार खातात. मी पण थोरला, व बापाचा मजबुत मार खाल्लेला. त्यामानाने धाकटी पोरे फारशी शिक्षेला सामोरी जाता दिसत नाही. मला वाटायचे की धाकटे लाडके व आम्ही दोडके. पण स्वतः बाप झाल्यावर अपत्यसंगोपनाची पारंपारीक सत्ये व त्यांची पॉवर लक्षात आली. आमच्या तीर्थरुपांचे एक लाडके तत्त्व होते. इंजीन रुळावर नीट असले की बाकीचे डबे पण नीट येतात.

तंदुरी चिकन

लेखक गणपा
Published on शुक्रवार, 18/02/2011
नमस्कार मंडळी, उद्या रंणशिंग फुंकल जाणार. भारताचा सुपरबॉल चालु होतोय ना :D. दोन चार दोस्त मंडळी नसतील सोबतीला तर काय मजा. म्हणुन मित्रांना आमंत्रण गेली आहेत. आमच्या तर्फे जय्यत तयारी केली जाणार आहे. फ्रिज भरलेला आहे. (कश्याने ते सांगायलाच हव का? ;)) बाकी सटर फटर तोंडी लावण्या सोबत तंदुरी केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात त्याचा सराव सामना करुन झाला. तुम्हाला ही भारतासाठी जल्लोष करताना वातावरण निर्मीती करुन ठेवायची असेल तर मदत व्हावी म्हणुन हा प्रपंच. :) तर लागा तयारीला फक्त २४ तास उरलेत.

विनिल आणि...

Published on शुक्रवार, 18/02/2011
मुद्दाम शीर्षक अर्धवट ठेवले. विषय आहे विनिल कृष्णाचा. ओरिसातील मलकनगिरीचा जिल्हाधिकारी. लोकप्रिय, प्रामाणिक, कर्तृत्त्ववान... खरे तर या विशेषणांचा क्रम उलटा लिहायला हवा. कारण पुढच्या दोन गुणांमुळे तो लोकप्रिय झाला आहे. माओवाद्यांनी (म्हणजे काय हा प्रश्न आहेच) त्याचे अपहरण करून आता अठ्ठेचाळीस तास होत आले आहेत. त्याच्या सुटकेचे नेहमीचे प्रयत्न वगैरे सुरू आहेत. पण एक प्रश्न मला पडला आहे. बिनायक सेन यांच्यासंदर्भात उठणारे आवाज गेल्या अठ्ठेचाळीस तासांत पुन्हा उठलेले दिसले नाहीत. स्वामी अग्निवेश यांचा अपवाद. त्यांनी विनिलच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. पण बाकीचे?

' सुखाचा ठेवा -'

लेखक विदेश
Published on शुक्रवार, 18/02/2011
मी बालपणी खेळविले, तुज खांद्यावर नाचविले तुज खेळविता मी बाळा, ना केला कधी कंटाळा तू किती जरी मज छळले- तव खेळी मन विरघळले कधि घोडा-घोडा झालो; ओझ्याचे गाढव बनलो ! तू तळहाताचा फोड, पुरविले सर्व तव लाड ठेवून 'रोज' मनी स्वार्थ , ना घालविला क्षण व्यर्थ ! कालांतरि होशिल मोठा ! सन्माना नसेल तोटा ! नोटांच्या पायघडया त्या- कुणि घाली सामोरी त्या ना विसरावे तू मजला, ही एकच आस मनाला ! कधि कुणापुढे ना झुकलो; परि आता मी रे थकलो- 'ती' इच्छा मम पुरवावी ' मज वृद्धाश्रमी न ठेवी ! ' तव खांदा मला मिळावा- मजसाठी "सुखाचा ठेवा" !
काव्यरस

लकडी पूल

Published on शुक्रवार, 18/02/2011
मिपा वरील हा माझे पहिलेच लि़खाण, आणि लिखाणाचे प्रयोजन हे कि आपल्या (पुणेकरान्च्या) लकडी पूला ला २५० वर्षे पुर्ण झाली. या निमित्ताने मिपाकरान्कडून लकडी पूलाबद्दल काही अधिक माहिती मिळावी ही अपेक्षा.