Skip to main content

आयर्लंडला भारताचा पराभवाचा धक्का

लेखक टारझन यांनी रविवार, 06/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
६ मार्च - आज वर्ल्ड कप मधला अजुन एक मोठा उलटफेर झाल्या आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्रेट अनसर्टंटीज असे म्हंटले जाते त्याचा आज बंगळुरु च्या ग्राऊंड मधल्या हजारो प्रेक्षकांनी प्रत्यक्षात तर करोडो लोकांनी टिव्ही वर आणि हजारो लोकांनी रेडिओ वर अनुभव घेतल्या आहे . आज आयर्लंड मैदानात उतरलं होतं ते भारताचा खुर्दा उडवण्याच्या उद्देशाने. परंतु सुरुवातीलाच दुबळ्या भारताला टॉस जिंकुन थोडंफार लक ची साथ मिळाली. भारताच्या बॉलर झहिर खान ह्याने आयर्लंड ची सलामीची जोडी पहिल्याच तीन षटकांतच तंबुत पाठवली तेंव्हा भारतभर फटाके फोडल्या गेले.

श्वानमित्र...एक हास्यकविता.?????

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 06/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्यासाठी मी माझा .. नेहेमीचा रस्ता बदलला.. ती काही भेटली नाही..कळाले.. तिने आपला पत्ता बदलला.. प्रेमासाठी मात्र मी.. निवडला मार्ग नेकीचा होता.. ती तिथेही भेटली नाही.. काय करणार पत्ताच जर चुकीचा होता.. तिच्या गल्लित जाणे म्हणजे.. एक मोठे दिव्य होते.. मनेका गान्धीन्च्या मित्रान्चे.. तिथे जणु अभयारण्यच होते.. तिच्यासाठी मित्रानो.. काय काय नाहि मी केले सान्गा..? खाम्बासारखा उभा तिच्याघरासमोर.. हरेक कुत्रे गेलेय वर करून दोन्ही टान्गा.. तिच्यासाठी तिच्याघराबाहेर रोज मी असा लागलो ताटकळु माझ्या दु:खाचा गहिवराने गल्लीतली कुत्री रोज लागली व्हिव्ह्ळू ती जालीम दुसर्याची झाली.. फुटके माझे नशीबच शे
काव्यरस

शब्दांच्या पलिकडले !

लेखक स्पंदना यांनी रविवार, 06/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नुकत्याच तुम्ही 'शरद्जींच्या' दोन कविता वाचल्या. त्याच दोन पत्रांची उलगड माझ्या शब्दात, 'गुरु आज्ञा शिरसावंद्य मानुन' मी इथे द्यायच धाडस करते आहे. प्रयत्न गोड मानुन घ्यावा! बरचस सांगता येत नाही! बरचस बोलताही येत नाही ! ना डोळ्यातून डोकावण्याची मुभा असते या 'बरचस' ला! पण हे ' बरचस ' तुटत ही नाही, मिटत ही नाही ! मंडळी कल्पना करा, पन्नास वर्षापुर्वी गुंतलेल्या दोन जीवांची! बरचस जीवन उंबर्‍याच्या आत व्यतित करणार्‍या तुमच्या माझ्या आज्जीच्या वेळच्या काळाची! कुठ काहिस वादळ उठल , पण त्या वादळाला बाहेर येण्याची मुभा नसल्यान मनाच्या आतच; त्यान तांडव मांडल्यान व्याकुळ 'ती 'अन व्याकुळ 'तो'!

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग ४)

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 06/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग- १) (भाग-२) (भाग-३) ह्या भागात ज्यांची कारकिर्द स्वतंत्र संगीतकार म्हणून मोजक्या चित्रपटांच्या पलीकडे गेली नाही अश्या काही संगीतकारांचा आणि त्यांच्या प्रसीध्द गाण्यांचा आढावा घेउ. संगीतकार- जी एस कोहली १९५२साली ओ.पी. नैयर यांचे असीस्टंट म्हणून कारकिर्द सुरू केलेल्या श्री.कोहली यांनी स्वतंत्र संगीत दिग्दर्शन १९६३ साली केले.

जिजामाता उद्यानात (राणी बाग) फेरफटका

लेखक योगेश२४ यांनी रविवार, 06/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
जिजामाता उद्यान प्राणीसंग्रहालयात मारलेला एक फेरफटका. जे काहि उरले सुरले प्राणी/पक्षी आहेत ते आत्ताच पाहुन घेणे योग्य नंतर कदाचित फक्त रिकामे पिंजरे बघायला मिळतील.

ते क्षण जे त्यानं दिले

लेखक निनाव यांनी रविवार, 06/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
त्यानं ओतले जाता जाता ओंजळीत माझ्या चांदणे निसटले ते, विझले सारे - मग मीच मज वेचले असे दिले त्याने मज ते क्षण मीच होते बहरले सावत्र जरी दुखं, जपले मी होते त्यानं दिले तहान राहीली तशीच, अन होडी सागरा मधेच वारं सगळं घेउन गेला तो, होते त्याने वाहिले गोष्टी वाचते मी पुन्हा-पुन्हा त्याच्या पुस्तकातल्या शोधते ते, शब्द सारे - माझेच ते हरवले!

पत्रलेखन ... हरवत चाललेला ठेवा

लेखक शरद यांनी रविवार, 06/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. पंगुशेठ यांचा लेख वाचला आणि एक जुनी आठवण जागी झाली. त्यावेळी बराह, श्रीलिपी वगैरे उपलब्ध नव्हते. त्यामुळे पुण्याहून अमेरिकेतल्या आपल्या लाडक्या लेकीला ई-मेल पाठवतांना आईला इंग्रजीशिवाय पर्याय नव्हता. आणि हे माध्यम भावना, तळमळ कळवण्यास तसे निरुपयोगीच. मी एक सोपा उपाय सुचवला होता. एक साधा स्कॅनर घ्या, कागदावर स्वहस्ताने खरडलेले पत्र स्कॅन करा व द्या पाठवून. निदान दोघींनी तो मानला व त्याचा इतका उपयोग झाल्याचे दिसून आले की त्यांच्या मैत्रिणी घरी पत्र लिहावयाच्या व यांच्याकडे येऊन, ते स्कॅन करून, आपापल्या मुलींना "पत्र" पाठवावयाच्या.

मिशन हस्ताक्षर

लेखक पिंगू यांनी शनिवार, 05/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सांगायच कारण काय तर आज काल हाताने केलेले लिखाण खूपच वाईट यायला लागलय. काय कारण असेल बर याचं. जरा धांडोळा घेतला तर लगेच कारण उमजले. काय असेल ते तर गेल्या दोन वर्षात मी पेन आणि पेन्सिल वापरून काही लिहिलेच नाही. तेव्हा जरा भूतकाळात डोकावण्याची इच्छा झाली. शाळेतील ते दिवस आठवले. पाचवी-सहावीला असताना माझे अक्षर म्हणजे शाळेत असताना एक अगम्य होतं. शिक्षक म्हणायचे कार्ट्या काय ह्या कोंबडीच्या नख्या काढल्यात. त्यामुळे कधी कधी गृहपाठाची वही डोक्यात पडायची. हा नित्यनेम सातवीत जाईपावेतो असाच होता.