Skip to main content

उबुंटू/लिनक्सवर गमभन प्रणाली वापरून मराठी लेखन कसे करावे?

लेखक उपाशी बोका यांनी मंगळवार, 25/01/2022 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
उबंटूवर ऑफलाइन (म्हणजे ब्राउजर न वापरता) मराठी लिहायचे असेल तर मला त्रास झाला आहे. iTrans (m17n) ही प्रणाली त्यातल्या त्यात "गमभन"च्या जवळ जाणारी आहे. बाकी इतर KaGaPa phonetic, inscript (m17n), phonetic (m17n)आणि हिंदी बोलनागरी वापरून मराठी लिहिणे खूपच कठीण आहे आणि पटपट लिहिणे तर जवळपास अशक्य आहे, विशेषतः मायबोली आणि मिसळपावसारखी "गमभन"ची सवय असेल तर. गमभन आता लिनक्सवर कसे आणायचे ते आता कळले आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे. $cd /usr/share/m17n $sudo cp mr-itrans.mim mr-gamabhana.mim मग mr-gamabhana.mim ही फाइल एडिट करा. $sudo edit mr-gamabhana.mim (सूडो वापरणे महत्वाचे आहे.

ध्रांगध्रा - १८

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 24/01/2022 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
" माझ्यावर विश्वास ठेव" महेश माझ्याकडे पहात बोलतो. " हो खात्री बाळग.... आपण मित्र आहोत. " महेशला खांद्यावर हात ठेवत मी दिलासा देतो. तो काय बोलणार आहे हे मला माहीत नाही. " तुला खोटं वाटेल पण मी खरं सांगतोय. विश्वास ठेव."
आपण आलो त्या दिवसापासून मी झोपू शकलेलो नाही. त्या दिवशी तुला सोडलं आणि घरी गेलो. हातपाय धुवून झोपायला गेलो. थकलो तर होतोच. जरा डोळा लागला असेल माझा. हा मघाशी फोटोत दिसला ना तो स्वप्नात आला. रागारागाने पहात होता. दरडावून काहीतरी बोलत होता. विचारत होता. मला भाषा समजत नव्हती. पण मी खडबडून जागा झालो. खूप घाबरलो होतो. दरदरून घाम फुटला होता अंगाला.

मुखपट्टी (मास्क)

लेखक VRINDA MOGHE यांनी सोमवार, 24/01/2022 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
'मास्क' आता नेहमीच हवा विसरून नाहीच चालणार, बाहेर पडताना ठेवा ध्यानात नाक तोंड झाकून ठेवा जनांत ! तसे तर आपण सवयीने वापरतो अनेकदा मुखवटे, वर वर हसू, ओठाआड राग व्देषाची मनात असते आग !! गोड शब्दाने भुलवतो त्याला ज्याचा मत्सर पेटवतो ज्वाला, वरवर हसत शुभेच्छा देताना, मनात मात्र असूयेची भावना !! 'अरे वा!'असं कौतुक वरवरचं 'लायकी नसताना मिळालय', असं मनातल्या मनात बोलणं. अवघड व्हायचं ना अशावेळी हसणं? मुखपट्टीच्या वापरामुळे आता हे मात्र बरं झालय अंतरातले भाव दिसण्याचं कारणच नाही उरलय !! मनातले खरे भाव आता आरशातल्या स्वतः पुरतेच बाकी कोणाला कसे दिसतील मुखपट्टी मागे दडून राहतील !! -©️सौ.वृंदा म

( श्रीवल्ली )

लेखक चौथा कोनाडा यांनी सोमवार, 24/01/2022 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
२०२१ चा डिसेंबर उजाडला आणि तिसऱ्या आठवड्यात पुष्पा: द राईझ तेलगू भाषेत प्रदर्शित झाला अन पहिल्याच दिवशी जगभरातू १७४ कोटींचा दणदणीत गल्ला जमवला ! सामी, श्रीवल्ली सारखी सुपरहिट गाणी गल्लीबोळात, बस रिक्षात, कॉम्पुटर मोबाईल, टीव्ही ओटीटी इ वर जोरजोरात वाजू लागली. याच्या तामिळ, मल्याळम, हिंदी कन्नड आवृत्याही हिट झाल्या ! सगळी कडून सामी, श्रीवल्ली चे प्रतिध्वनी ऐकू येऊ लागले. याचे शॉर्ट्स, रील्स, स्टेट्स व्हिडिओं करायच्या नादी तमाम चाहती जनता लागली !

गुजरात सहल २०२१_भाग ५- सासन गीर

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 24/01/2022 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग खालील लिंकवर वाचता येईल. गुजरात सहल २०२१_भाग ४- पोरबंदर, माधवपूर,सोमनाथ (प्रभास पाटण) आज सहलीचा सहावा दिवस. सकाळी सोमनाथमधील दोन ठिकाणे पाहून गीरच्या दिशेने प्रवास सुरु झाला . रस्त्याच्या बाजूने आमराई दिसत होती. केशर आंब्यांच्या बागा आहेत असे समजले. अकरा वाजता भोजदे, सासन गीर येथील आमचे बुकिंग असलेल्या 'गीर विहार रिसॉर्ट'ला पोहोचलो. अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे. मोठा परिसर, सुंदर बगीचा, स्विमिंग पूल, अद्ययावत कॉटेज, उत्कृष्ठ जेवण. शिवाय जंगल सफारीसाठी आपल्याला 'सिंह सदन' ला जावे लागते ते ठिकाण येथून फक्त दहा मिनिटावर आहे.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ९

लेखक मदनबाण यांनी रविवार, 23/01/2022 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पा द राइज पार्ट 1... युट्युबवर वेगवेगळी गाणी शोधताना / पाहताना अचानक या चित्रपटातील नुकतेच अपलोड झालेले स्वामी स्वामी हे तेलगु भाषेतील गाणे पाहण्यात आले होते. त्या नंतर या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यात आला. अल्लू अर्जुन ची मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट पाहण्या सारखाच असे तो ट्रेलर पाहुन वाटले.

ध्रांगध्रा - १७

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 23/01/2022 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
काय? काय सांगायचंय तुला? आपण त्या ट्रीपवरून आल्यापासून मी झोपू शकलेलो नाही. डोळे मिटले की त्याचा चेहेरा डोळ्यासमोर येतो. रात्री सुद्धा मी त्यूबलाईट पूर्ण चालू करून ठेवतो रूम मधे अंधार झाला की त्याचा चेहरा दिसतो" हे सांगताना महेशच्या चेहेर्‍यावरची भिती लपत नाही.
मागील दुवा ध्रांगध्रा - १६ http://misalpav.com/node/49814 " काय म्हणतोस ! कसला चेहेरा?" खरंतर महेशनं हे मला विचारलं असतं तर मी पण हेच सांगितलं असतं.

झटपट जळगावी भरीत

लेखक Bhakti यांनी रविवार, 23/01/2022 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
पार जळगावहून वांगी आले होते.ही वांगी आकाराने ओव्हल मोठी ,फिक्कट हिरवी असतात.यात बिया कमीअ असतात.२०१६ साली जळगावी वांग्यांना GI tag ही मिळाला आहे. शेवटी हे एकच राहिले होते.तेव्हा जळगावी भरीतची पाकृ लिहिण्याची आणि चित्रित करायचे ठरवले.हा पदार्थ हल्लीच शिकल्यामुळे करून खायला घालायला उत्साह वाटतो आणि झटपटीत होतो. १ साहित्य : १.पावशेर जळगावी वांगे २.एक वाटी कांद्याची पात (चिरलेली) ३.एक वाटी कच्चे शेंगादाणे ४.अर्धी वाटी भाजलेले शेंगादाणे ५.एक वाटी चिरलेला ओला कांदा ६.५-६ हिरव्या मिरच्या ७.७-८

कोकण प्रवास: प्रकाशचित्रे

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 22/01/2022 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
२० ते २२ नोव्हेंबर
कोकण पाहायचे दूरच, पण साधं "येवा कोकण आपलाच असा" हेही ऐकलं किंवा वाचलं नव्हतं. डिसेंबरची पर्यटनगर्दी अजून दूर होती. त्यामुळे चार-पाच दिवस हाताशी ठेऊन, खूप नियोजन न करता निवांत फिरण्याचं नियोजन होतं. नेहमीप्रमाणे कोणी तयार होणार नाही हे माहीत असूनही सगळ्यांना सोबत यायचा आग्रह करून झाला होता. अशा मोहिमांसाठी आवश्यक मानसीक तयारी, नवीन हवामानात रुळण्याची प्रक्रिया (acclimatization) बेस कॅम्पवर, अर्थातच सासुरवाडीत, पूर्ण झाली होती. कदाचित मनात आलं तर कोकणातच स्थायिक होता येईल अशा विचाराने सौं ने सामानाची बांधाबांध केलेली दिसत होती.

अमानुषता आणि माणुसकी

लेखक मार्गी यांनी शनिवार, 22/01/2022 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्व जण कसे आहात? सर्व जण ठीक असाल अशी आशा करतो. नुकतंच स्नेहालय संस्थेच्या कामाबद्दलचं 'अंधाराशी दोन हात' हे पुस्तक वाचण्यात आलं. हे पुस्तक अक्षरश: आपल्याला हादरवून सोडतं. थरकाप उडतो हे पुस्तक वाचताना. भारतामध्येही नाझी किंवा तालिबानी मानसिकतेचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत हे कळून अनेक धक्के बसतात. ते पुस्तक वाचल्यानंतरची प्रतिक्रिया ह्या लेखामधून व्यक्त करत आहे. आपल्यापैकी बरेचसे जण खूप प्रोटेक्टेड जगात राहतो, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना नसते. किंबहुना अनेकदा जाणूनबुजून आपण ह्या गोष्टी नजरेआड करत असतो. परंतु हे पुस्तक वाचताना ख-या आणि बीभत्स जगाचं दर्शन घडतं.