Skip to main content

रंगपंचमी तील अनिष्ट प्रकार

लेखक शुचि यांनी रविवार, 20/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
रंगपंचमीचा अंगावर काटा आणणारा अनुभव लिहीते आहे. खूप वर्षे झाली त्या गोष्टीला. नवरा जहाजावर होता आणि आमचा फक्त साखरपुडा झालेला होता. मी मुंबईच्या एका महाविद्यालयात शिकत होते आणि हॉस्टेलवर रहात होते. दर शनिवारी, रवीवारी मी सासरी जाऊन रहायचे कारण नवरा एवीतेवी नव्हताच त्यामुळे आईबाबानी परवानगी दिली होती. त्यायोगे सासरच्या लोकांशी ओळख होत असे, रीतीभाती समजत असत. एका रवीवारी नेमकी रंगपंचमी आली. आणि मी परत हॉस्टेलवर निघाले. मला सासूबाईंनी जाऊ दिले. त्यांच्या लक्षात आले नसावे की या दिवशी स्त्रियांनी मुंबईत बाहेर पडणे किती धोक्याचे असते. झाले मी रेल्वे स्टेशनवर गेले, सामसूम होती.

होळी २०११

लेखक Antarang यांनी रविवार, 20/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात येवुन जवळ ४ वर्ष होत अलीत.... पण कधीच पुण्यातील होळी पाहण्याची इच्छा अथवा योग आला नाही... घरी होतो तेव्हा या सणाना फार महत्व होते आणी आज पण आहे... तेव्हा कमीत कमी शाळा/कोलेजला सुट्टी तरी असायची कीव्हा घरात काहीना काही गोड धोड बनत असायचे ... पण बाहेर असल्यावर ह्या गोष्टी अनुभवायला काय पहायला पण मीळत नाही... काल आमच्या सोसायटीतल्या (आमची एक अपार्टमेन्ट) मन्ड्ळीनी होळी साजरी करायचा बेत आखला होता..त्यात शनीवार असल्याने बाजुच्या काकु आणि ताईनी होळी बघायला बोलावले होते....

ओले परीस...

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 20/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यामधील आसू परतून ना गळावे धुंदीत मी जगावे, धुंदीत मी मरावे आता न जाणवावी दुःखे उदासवाणी ’दारू’ परीस ओले जखमांवरी फिरावे तार्‍यांत वावरावे सहवास चांदण्यांचा डोळे उभ्या जगाचे माझ्याकडे असावे काळोख दाटलेला आहे दहा दिशांनी श्वासात ध्यास आहे तोची प्रकाश दावे आत्म्यात राम राहे, आत्म्यात कॄष्ण आहे हे राम-कॄष्ण आता बाहेरही दिसावे - स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com

माझा महाराष्ट्र महाराष्ट्र माझा

लेखक श्री गावसेना प्रमुख यांनी रविवार, 20/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
म पो से सदरक्षणाय खलनिग्रहाय, चोर सोडुन पोलीसच मातलाय, गरीबांच्या पैशांची दारु मारी, अन म्हणतोय मी जावई सरकारी , दिसली गाडी की मार झडप , दहा आले,वीस आले कर हडप , अंगात खाकी आहे म्हणुन लोकही देतात मान, नाहीतर सगळेच म्हणतात काढा ही घान, सच्चा असो वा बेईमान तुमच्यासाठी सर्व समान, पैसा दाखवला की झुकते यांची मान , दहा हजार पगारात्,दहा मजली ईमारत, तरीही नाही तुमच्या वर आयकर खात्याची हरकत, अहो म पो से आता तरी सुधरा, नीदान खाकी साठी तरी तुमच्यात बदल करा, आता सोडा हे दहा रुपये अन वीस, आणी गर्वाने म्हणा मी मी महाराष्ट्र पोलीस जय हिंद जय महाराष्ट्र
काव्यरस

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-९)

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 20/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
(भाग-१) (भाग-२) (भाग-३) (भाग-४) (भाग-५) (भाग-६) (भाग-७) (भाग-८) पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात पाय रोवुन आपले स्थान निर्माण करणारी एकमेक महीला संगीतकार म्हणजे उषा खन्ना

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी शनिवार, 19/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या मते सांग माला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ? मनाने मनावर केलेल प्रेम.... की नजरेच सौंदर्यावर असलेल प्रेम हे प्रेम असतं ? खर पाहता प्रत्येक जण प्रेमात, ह्या दोन्ही गोष्टींना महत्व देत असतो । प्रत्येकाच्या दृष्टीने फक्त... दिलेल्या'इम्पॉर्टन्स'च्या'पर्सेंटेज'मध्ये थोडासा फरक असतो । तुझ्या मते सांग माला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ? आईने-मुलावर,नवऱ्याने-बायकोवर,मित्राने-मैत्रिणीवर केलेल प्रेम.... की माणसाने माणसावर केलेल प्रेम हे प्रेम असतं ? खर पाहता प्रेमात नात्याला फारस महत्व नसतं । कारण प्रेमाच्या ओलाव्याने नात फुलत असतं... पण नात असल्याने त्यात प्र

कटाची आमटी ---

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 19/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
चार वाट्या पुरणावरील कट--आपण आज जे पुरण केले त्यावरील जेवढा कट आधीच बाजूला काढून ठेवला असेल तो घ्या.व थोडेसे तयार पुरण पण घ्या, गुळ पाव वाटी, एक लींबाएवढी चिंच भिजत घालून ठेवा व त्याचा कोळ काढा, सुक्या खोबर्याचा एक छोटा तुकडा गॆसवर भाजून घ्या म्हणजे तो तुकडा गॆसवर धरा तो पेट घेइल तो खाली काढून ठेवा व तो पुर्ण काळा झाला की फ़ुंकर घाला...करपु देउ नका, आता त्याचे बारीक तुकडे करुन ते वे जिरे चमचाभर घेउन मिक्सरवर वाटून घ्या, गोडा मसाला एक चमचा (टे.