Skip to main content

बर्मा फ्रंटवरून........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 27/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, माझ्या मराठालाईट इन्फंट्रीच्या आभ्यासादरम्यान हे एका सैनिकाने त्याच्या प्रेयसीला लिहीलेले पत्र सापडले. त्याचे भाषांतर केले आहे. सैनिकांची मनस्थिती यात बरीच समजून येते. हे पत्र बर्माहून लिहीले आहे. प्रियतमे, पंख असते तर तू उडत येथे आली असतीस असे सारखे म्हणतेस, पण खरंच तुला येथे यायला आवडेल का ? तुला आवडेल की नाही हे मला माहीत नाही पण तू येथे आलेले मला आवडणार नाही हे निश्चित. येथे येण्यात धोके आहेत, नाही असे नाही, पण याही पलीकडे काही कारणे आहेत. धोके तर आमच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत.

फुलपाखरू माझ्या मनीचे....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी रविवार, 27/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मन माझे जणू एक फुलपाखरूच होते.., असंख्य फुलांमधुनी..ते आपला मार्ग काढीतं होते । इतक्यात त्यातले एकच फ़ूल का.. त्यास इतके आवडिले, की त्या फुलावरी जाउनी मग ते.. विराजमान झाले । घेता गंध चाखता मध.. त्यास ते अपुलेसे वाटिले, आता विसावे इथेच आपण.. हे स्वप्न त्याने पाहिले । इतक्यात कुणीतरी येउनी फ़ूल ते.. तोडूनिया नेले, विसाविले पाखरू क्षणी त्या.. धरतीवर पडले । खाली पडता असे अचानक.. स्वप्न सारेते मोडूनी गेले, भान येता मग कळले त्यास.. फ़ूल आपुलेते कधीच नव्हते । हे सारे कळल्या वर मगते.. सैरा-वैरा उडू लागले, फुटल्या वाटी जाउनी तेथे.. त्याच फुलास ते शोधू लागले । वणवण फिरले शोधूनी थकले..

शत्रु समोरून थेट वार करुन गेला -

लेखक विदेश यांनी रविवार, 27/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
शत्रु समोरून थेट वार करुन गेला - मित्र मिठित पाठीवर वार करुन गेला ! मैफिलीत हास्यरंग उधळण्यास आला सुतकी चेहऱ्यांस नमस्कार करुन गेला ! सुखाचाच शोध घेत रडत जन्म झाला - तिरडीवर मात्र आज छान हसुन गेला ! पौर्णिमेस गोल चंद्र पाहण्या विसरला , अवसेला काजवाच चकित करुन गेला ! भ्रष्टांचा देवळात सुळसुळाट झाला सचोटिचा देव तिथुन कधिच पळुन गेला !

रास

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 27/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
चांद रात मंद वात गंध श्वास टाकतो धुंद साथ उष्ण हात कंप हृदयी जागतो नील जल प्रतिबिंब चंद्र त्यात पाहतो लुब्ध मुग्ध शुभ्र पुष्प पारिजात ढाळतो रक्त ओष्ठ रक्त नेत्र भ्रमरही मोहतो मत्त वक्ष पुष्ट गात्र समीर हाताळतो एक भास एक ध्यास प्रेम वह्नी जाळतो व्यस्त केश भ्रष्ट वेश मुकुंद रास खेळतो धूम्र वर्ण पीत वस्त्र अधर तो चावतो मीलनातुर झाली राधा कृष्ण वेड लावतो. - (पूर्वप्रकाशित)
काव्यरस

ट्यार्पीचे शिलेदार-एक आधुनिकोत्तर पॅकेज.

लेखक Nile यांनी रविवार, 27/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, आम्ही तुमच्या करता एक आधुनिकोत्तर असे पॅकेज घेउन आलेलो आहोत, पॅकेजचे नाव आहे "ट्यार्पीचे शिलेदार". आम्हाला खात्री आहे हे पॅकेज तुमच्यापैकी सर्वांना उपयोगी पडेल, ते कसे याची झलक आम्ही खाली दिलेलीच आहे. ही फक्त झलकच आहे. संपुर्ण पॅकेज ज्यांना हवं आहे त्यांनी व्यनीने संपर्क करणे. पहिल्या पाच गिर्‍हाईकांना १०% डिस्काउंट दिला जाईल. हे पॅकेज डेव्हलप करण्यामागे काही स्फुर्तीस्थानं आहेत त्यांच्या विसर पडायला नको. पहिले स्फुर्तीस्थान म्हणजे अर्थातच ३% वाले कुंदनसेट. त्यांनी (हवे तितके) ३%ने देण्याचे कबुल केले नसते तर हे पॅकेज डेव्हलप करणे शक्यच नव्हते.

सहवास

लेखक निनाव यांनी रविवार, 27/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजा वर मावळतांना तु मज वर प्रेम करशील का? श्वासांमधल्या अंतरामधुनी शोध माझा घेशील का? समोर दिसून लांब किती तु जवळ मज येशील का? अंतर मिटता मिटता मज तु उमजशील का? प्रत्येक प्रहर अशी अनोळखी तु ही मज विसरशील का? न संपणार्या वाटा कधी ह्या पलीकडे मज नेशील का? तुझ्या स्पर्शानं विणलेला शालू नेसतात लाटा उठणार्या मनी तारका लाजवतात मज बघुनी कुशीत मज तु लपवशील का ? तीच वाट अन तेच प्रवास न तु इथे, न तुझे सहवास शोधत तुला फिरते नजर पुन्हा मज तु दिसशील ना? क्षितिजा वर मावळतांना तु मज वर प्रेम करशील का? श्वासांमधल्या अंतरामधुनी शोध माझा घेशील का?

स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo.

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 27/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण. स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल. चॅनेल : स्टार माझा TV मराठी दिनांक : २७-०३-२०११ वेळ : सकाळी ९ वाजता