Skip to main content

पाचवी खोली

लेखक आदिजोशी यांनी मंगळवार, 29/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगावातल्या चाळीत वाढलेल्या आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त. जास्त अपेक्षा नाहीत. मजल्यावरच्या ४ बिर्‍हाडात मिळून एक असलेल्या सार्वजनीक संडासाला आम्ही प्रेमाने पाचवी खोली म्हणत असू. काही लोक त्याला 'मालकाची खोली' असंही म्हणत. संडासाला 'मालकाची खोली' म्हणण्यामागे चाळ मालकाला नावं ठेवणं इतकाच हेतू नसून त्या बोलण्याला 'फक्त खोलीचं भाडं देऊन संडास फुकट वापरता' असं मालकाने ऐकवल्याची पार्श्वभूमी असे. चाळीतला संडास हा क्लिओपात्राच्या बाथ-टब सारखा लेख लिहायच्या लायकीचा जिन्नस नाही.

मज्जा आहे बुआ ....

लेखक विश्वेश यांनी मंगळवार, 29/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मुलाची एक मैत्रीण आहे खास, एका कामवाल्या बाईची गरिबाघरची पोर आहे ... दोघांचे छान जुळते . मला नेहमी वाटायचे कि काय बोलत असतील हे एकमेकांशी ?

कधी सरणार ही सांज

लेखक निनाव यांनी मंगळवार, 29/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कधी सरणार ही सांज कधी निजणार मन आज मंद सुलगते आहे ओल्या धुराखालची आग वाहते आहे भरुन इतुके मनी झरेच झाले आज पाउल पुढे पडतांना दिशा गुंतत आहेत आज धुकेच धुके आहे समोर न दिसते आहे काही आज अशी हरविले आहे मी न ओळखे आज मज कुठली वाट न मावे पदरात माझ्या आज एकटीच वाढे हि अंधारी रात्र सरकते आठवणींचे थेंब अलगद काजळ पुसते मी पसरते आज कधी सरणार ही सांज कधी निजणार मन आज मंद सुलगते आहे ओल्या धुराखालची आग

कारवाई

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 28/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेल्या काही काळात मिपावर असभ्य वर्तन केल्यामुळे मिपासदस्यं Nile यांचेवर आठ दिवसांची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्य काही लोक याच यादीत आहेत त्यांनी आपले वागणे ताबडतोब सुधारावे.ही विनंती. १) टारझन २) निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी ३) लंबुटांग या सदस्यांनी आपले वागणे वेळीच सुधारावे असे म्हणतो. - सरपंच

चटपटीत भेळ

लेखक स्पा यांनी सोमवार, 28/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मिपावरची पहिली वहिली पाक्रु (गणपा, निवेदिता तै, स्वाती तै आदी प्रभूतींनी सांभाळून घ्यावे ;) ) थोडक्या कष्टात दाबून काही खायचं असेल तर भेळेला पर्याय नाही चटपटीत भेळ (४ माणसांसाठी) साहित्य : कुरमुरे - ८ वाट्या फरसाण - २ वाट्या बारीक शेव - १ वाटी कोथिंबीर , पुदिना - २ वाट्या लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या - ५,६ टोमाटो, उकडवलेले बटाटे, २ कांदे (बारीक चिरलेले) खजूर - १ वाटी चिंचेचा कोळ - अर्धी वाटी गुळ - १ चमचा जिरं, मीठ , चाट मसाला चवीपुरता

स्वित्झ्रलंड-स्वप्नांच्या देशात भाग -१

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 28/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
स्वित्झ्रलंड-स्वप्नांच्या देशात भाग -१ झर्मित-मॅटरहॉर्न : जगातील सर्वोच्च ग्लेशियर पॅलेस जिनिव्हा मधे येऊन आठवडा होत आला होता तरी माझ्या कॅमेर्‍यामधे एक सुध्दा फोटो नव्हता. ऑफिसच्या कामामुळे स्टुडीओबाहेर पडायला पण वेळ मिळत नव्हता. शुक्रवारी सकाळी मी आणि माझ्याच बरोबर युनायटेड नेशन्स साठी काम करणारा कोल्हापूरचा प्रशांत सुर्यवंशी आम्ही दोघांनी शनिवारी झर्मितला जाण्याचा बेत आखला.

अंडा भुर्जी आणि चपाती

लेखक कुंदन यांनी सोमवार, 28/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ पासुन लाईट नव्हते ( नाही अर्थ अवर नव्हता) , म्हटले आता लाईट्या आल्यात तर काही तरी खायला बनवावे... साहित्य : २ मध्यम कांदे २ अंडी ( कोंबडीची ) ३-४ हिरव्या मिरच्या १ टी स्पुन हळद. मिठ चवीनुसार. लाल तिखट झेपेल तेव्हढे. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . Bhurji Chapati