Skip to main content

महसूल वार्ता!

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 29/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - येऊ द्या आणखी महसूल वार्ता !! - (भाऊसाहेब) रामदास) एकदा इंद्राने सगळ्या सरकारी यंत्रणेला मेजवानी द्यायचे ठरवले. या पापी लोकांना अशी स्वर्गात पार्टी देण्यामागे इंद्राचा अंतस्थ हेतू बहुदा एखादा भूखंड लाटण्याचा असावा अशी दाट शंका बर्‍याच देवांना होती. पार्टीत इंद्र कुणा कुणाला कशी वागणूक देतो यावर बर्‍याच जणांचे लक्ष होते. संध्याकाळी सात पासून पाहुणे यायला सुरुवात झाली. स्वर्गीय संगीताच्या तालावर अप्सरा नृत्य करु लागल्या. त्रिभुवनातील उत्तमोत्तम आणि प्राचीनतम मद्यांचे चषक किणकिणत पाहुण्यांमधून फिरू लागले.

मोहाली सामना आणि राष्ट्रगीते

लेखक अलख निरंजन यांनी मंगळवार, 29/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
उद्याच्या मोहालीतील सामन्यात पाकिस्तानचे राष्ट्रगीत गायले जावे का? पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या येण्यावरुन तात्या वगैरेंनी निषेध नोंदवला आहे, उद्या त्यांच्या राष्ट्रगीताला मोहालीतील प्रेक्षकांनी उभे राहावे का? एक वडा दोन पाव लोकांचे मत काय आहे?

अंतर ठेवा...

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 29/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे सदस्यगण हो, कृपया मला एक सांगावे. मला काही सदस्यांकडून सांगण्यात आले आहे की मी लिखाणात अंतर ठेवावे. मी मिपावर टाकलेल्या माझ्या लिखाणांमध्ये एका दिवसाचे अंतर ठेवतोच. माझे हे लेखन आधीपासूनच तयार आहे. म्हणूनच मी ते इतक्या लवकर मिपावर टाकतोय. जर खरोखरच तुम्हाला जर माझ्या लिखाणात अंतर हवे असेल तर किती ते सांगावे ही विनंती. धन्यवाद विन्या. (मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्‍या सदस्यांना क्षमस्व. ;) मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.)

मेथीचे धिरडे

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 29/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ कप बारीक चिरलेली मेथी १ कप तांदुळाचे पीठ १ टीस्पून लसूण पेस्ट १ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून जीरे पावडर किंवा जीरे मीठ चवीप्रमाणे तेल पाकृ: एका पॅनमध्ये थोड्या तेलावर मेथी परतून घ्यावी. बाकीचे साहित्य आणी परतलेली मेथी सगळे नीट एकत्र करणे. धिरडे/डोश्याच्या पीठाप्रमाणे पीठ पातळ तयार करणे. नोन्-स्टीक तवा तापवून थोडे तेल घालणे. डावाने धिरडे घालून गॅस मंद करून झाकण ठेवावे. झाकण काढून , धिरडे उलटून दुसर्‍या बाजूने शिजवावे. चटणी, सॉस सोबत खायला देणे.

पाकसिद्ध बल्लवाचार्य गणपा..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 29/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
फाईन आर्टस्. कोणत्या? संगीत, क्रीडा, साहित्य, शिल्प, चित्र, नाट्य आणि सर्वात महत्वाची फाईन आर्ट म्हणजे पाककला..! या कला परमेश्वर सर्वांच्याच हाती देत नाही, देत नसतो. लाखोकऱोडोत एक लता होते, एक भीमण्णा होतात, एक सचिन होतो. त्याचप्रमाणे असंख्य मराठी ब्लॉग्जवर एक ब्लॉग जन्म घेतो - खा रे खा..! आणि या ब्लॉगचा कर्ता असतो माझा मित्र गणपा..! पाककला, पाककृती, किंवा पाकक्रिया या शब्दांच्याही वरचढ एक शब्द आहे आणि तो म्हणजे पाकसिद्धी..! गणपाचं पाककौशल्य पाहिलं की त्याला या कलेतील सिद्धी प्राप्त झाली आहे असंच म्हणावं लागेल.

मोहाली उपान्त्य सामना आणि मनमोहन सरकारची लाचारी..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 29/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
चेंडुफळीच्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक हा सामना उद्या मोहालीत होणार आहे त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. दोन्हीही संघ आयसीसीचे सभासद असल्यामुळे व हा सामना विश्वचषकातीलच एक असल्यामुळे त्याला आमचा विरोध नाही व तो करण्याचे काही कारणही नाही. आमचा मुद्दा वेगळाच आहे. भारतासारख्या सार्वभौम देशाच्या पंतप्रधानांनी पाकच्या राष्ट्रप्रमुखांना हा सामना पाहण्याकरता मोहालीत येण्याचे जे प्रेमाने आणि उमाळ्याने आमंत्रण दिले आहे त्याबद्दल आम्ही अतीतीव्र शब्दात आमचा निषेध नोंदवतो.

साखळीतल्या कुत्र्यावर -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 29/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
साखळीतल्या कुत्र्यावर - ते खूपच माया करती ; ' माया ' नसल्या नात्यावरती ते का डाफरती ? त्यांच्या भ्रष्ट संपत्तीची उधळण होते सगळीकडे ! माझी नजर मात्र वळते - माझ्या गळक्या खिशाकडे ? रस्त्यावरून जाताना , एक भिकारी दिसतो ; उपहासाने माझ्याकडेच पाहून का हसतो ? धडपड माझी चालू आहे - पतंग उडवण्यासाठी ! दोर राहू द्या - रीळहि साधे नाही , सध्या हाती ! एकेकटा 'मी ' रस्त्यामध्ये गर्दी करीत असतो ! गर्दीच्या खिजगणतीमध्ये कुठेच 'मी ' का नसतो ?
काव्यरस