Skip to main content

तुम्ही गप्प (शांत) रहायचे कधी ठरवता. ?

लेखक नरेशकुमार यांनी शुक्रवार, 15/04/2011 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सगळ्याना आयुश्यात कधितरी गप्प राहूशी वाटते. लहान पनि आईचा मार खाल्यावर, मोठेपन कमी मार्क मिळाल्यावर, जॉबमध्ये बॉसने रागवल्यावर, बिजनेस लॉस झाल्यावर, लग्न झाल्यावर बायकोशी भांडन झाल्यावर, पोरे मनाविरुद्ध वागायला लागल्यावर. आजुबाजुला मनाविरुद्ध काही होत आहे असे वाटु लागले तर अश्या वेगवेगळ्या विचित्र परिस्थितित मनुक्ष्य गप्प (म्हनजे शांत) रहाने पसंत करतो. माझे उदाहरन देतो, लग्ना अगोदरचे काही विशेश आठवत नाही, लग्न झाल्यावर एकदा बायकोसाठि काही गिफ्ट घेन्यासाठि माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा मला खुप वाईट वाटले होते, म्हनुन मि ३-४ दिवस गप्प होतो. कामवर पन जास्त कोनाशी बोललो पन नव्हतो.

कॅमेर्‍याची निवड

लेखक शरद यांनी शुक्रवार, 15/04/2011 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
निवड कॅमेऱ्याची जालावर सर्व कॅमेर्‍यांची माहिती सहज उपलब्ध असतांना या लेखाची गरज काय ? असे तुम्हाला वाटेल. पण इथे मी कुठल्याही कॅमेर्‍याची माहिती किंवा त्याचे फायदे तोटे सांगणार नसून तुमच्या गरजेप्रमाणे खरेदीच्या वेळी आपल्याला पाहिजे असलेला कॅमेरा कसा निवडावा एवढेच सुचवणार आहे. पूर्वी बरे होते.कॅमेरा निवडावयाचा म्हणजे आपला खिसा तपासावयाचा. हलक्या दर्जाचे [रु. १५०० पर्यंत], मध्यम दर्जाचे [रु १५००ते ३०००] व भारी [३००० च्या वर]. हे देखील सेकंड हॅंड. मी सुरवात कोडॅकच्या डबड्याने [मामाने दिलेला] केली, नोकरी लागल्यावर पैसे जमवून एक जूना फ़ॉगलॅंडर घेतला. फ़ारा वर्षांनी निकॉन एफ़-३.

मलबारी एग रोस्ट.

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 15/04/2011 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
दुबईला लग्ना आधी आम्ही ऑफिस मधले ४ बॅचलर मित्र, पेइंगेस्ट म्हणुन एकत्र रहायचो. ४ खोल्यां पैकी २ खोल्या घरमालकाने भाड्याने दिल्या होत्या. त्या आम्ही चार मित्रांनी पटकावल्या होत्या. किचन वापरायची मुभा होती. पण शक्यतो ते जुम्मे के जुम्मेच वापरल जायचं. (नाही म्हणायला घर मालक जेव्हा सुट्टीत महिनाभर गोव्याला जायचा तेव्हा आमची चंगळ असायची.) त्यामुळे रोजच्या जेवणासाठी आम्ही मलबारी, पंजाबी, नेपाळी,पाकिस्तानी,मद्राशी अश्या वेग वेगळ्या होटेल्समध्ये वार लावले होते. (गोवन हॉटेल फक्त विकांतासाठी फिक्स असायच.

धंद्याची स्वप्ने बघणारा ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 15/04/2011 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
जख्ख असा म्हातारा झाडाखाली गाडी लावून वाट बघत बसतोय गिर्‍हाईकाची ठेवतोय कसले कसले रंग ढकलगाडीवर.... गुलाल ,रांगोळ्या ,उटणे ,उदबत्त्यांचे पुडे , हेयर पिन्स ,बांगड्या,फुगे जे हवे ते ,जे लागेल ते आकर्षित करतोय बायका -मुलांना त्याला वाढवायचाय धंदा भरपूर ....!! स्वप्ने बघतोय श्रीमंत होण्याचे हातावरच्या फुगलेल्या निळ्या शिरा वाटतात भीतीदायक...!! वय सरकल्याच्या खुणा शरीरावर ठाण मांडून .... तरी स्वप्नाची हाव लंपटपणे जिवंत ठेवतेय त्याला काहीतरी करून दाखवायची हिमंत अजून तेवतेय त्याच्या मनात वाट बघत बसलाय गिर्‍हाईकाची तो आशाळभूतपणे ….. कोणीतरी येईल नि काहीतरी घेईल लुकलुकून जातात त्याचे गढूळ ड
काव्यरस

मिठीतली रात्र

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 15/04/2011 04:17 या दिवशी प्रकाशित केले.
आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझ्या आज पाहा रे आवरे मोह मज न अधिक आता पडदा तारकांचा पडू दे ना रे... निजले जग, निजले तारे अंतर असे हे मिटले सारे माझ्या कुशीत तु उजळला अधिकच तुझ्या आलिंगनात मज लाज ना रे विझले कधी मी मलाच कळेना तुझ्या कुशीतुन पदर सुटेना उलगडली वेणी, उलगडले अशी मी तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे आले विरह ते किरणांचे मज कलह मनाचा काही शमेना दरवळते अजुनी तुझ्या श्वासांचे गंध, पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे? आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझ्या आज पाहा रे न आवरे मोह मज अधिक आता पडू दे तारकांचा पडदा ना रे...

एका पाणीपुरीवाल्याची (ना)पाकक्रिया!

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 15/04/2011 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm ठाण्यातील एका परप्रांतीय पाणीपुरीविक्रेत्याने आपण कसे बारा गावचे पाणी प्यायलो आहोत हे एका अनोख्या पद्धतीने समजावयाचा प्रयत्न केला! पाणीपुरीत मानवनिर्मित पाणी घालायची नापाक पाकक्रिया (बहुधा) पहिल्यांदाच ऐकली. आशा आहे की ही शेवटचीच असेल. त्याची ही "शूक्रिया" अदा करण्याची कृती एका जागरूक मुलीने कॅमेर्‍यात बंदिस्त केली आणि चव्हाट्यावर आणली. त्यामुळे मोठीच खळबळ उडाली. रस्त्यावरील पाणीपुरी खाणे काही दिवस तरी अवघड होणार बहुधा.

एकलाच (ओवी-गीत-गझल-कविता)

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 14/04/2011 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
१. (ओवी) प्रश्न प्रश्नांचे उत्तर दु़:ख सुखाचे आधार माझ्यासाठी मीच आता एकलाच दारोदार || चांदण्यास चंद्र भार नेत्रातुनी संथ धार परका आप्तजनात एकलाच मुक स्वर || भावनांचा कोरा पुर स्वप्नांचाच स्वैर धुर मनास अनोळखी मी एकलाच दूर दूर || कोण कोणाचा इश्वर माणुसकीचा संहार कुरवाळत दु:खास एकलाच जातो दूर || २. गीत ( राग लक्षात नाहिये, कारण त्यातील मला कळत नाहीच काही.. पण या गाण्याला 'दयाघना' या गाण्यास जो राग आहे तो राग वापरलेला आहे असे मित्राने गाताना सांगितले होते..
काव्यरस

महिलांचे आरक्षण विधानसभेत पास अभिनन्दन

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 14/04/2011 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
समाजाच्या जडणघडणीत स्त्रीयांचा वाटा किती महत्वाचा हा नेहमीच चर्चास्पद विषय आहे. पुरूष प्रधान समाजात जरी कायद्याने स्त्री पुरुषांना एकच स्थान दिलेले असले तरी प्रत्येक क्षेत्र स्त्रीयांसाठी खुले होत नाही. पुरुषप्रधान समाज स्त्रीयाना पुढेच येवू देत नाही. महाराष्ट्र सरकारने या बाबत एक पाऊल उचलले आहे महापालिका आणि जिल्हा परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याच्या ऐतिहासिक विधेयकाला बुधवारी विधानसभेत मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे हे विधेयक फारसा विरोध न होता मंजूर झाले आहे.यापूर्वी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण होते.

कॉमनसेंस आणि पालीचं पिल्लू

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 14/04/2011 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी साधासुधासा विचार करणं आणि तसं वागणं आपल्या हातात नसतं. म्हणतात नं "कॉमनसेंस इज अ सेंस विच इज नॉट सो कॉमन!". मुळातच लग्न झाल्यावर आणि पोरं बाळं आल्यावर कॉमनसेंस वापरणे दुर्मिळ होत जाते हे आपण सर्वच खाजगीत मानतो. अर्थातच मुलांचा अभ्यास घेताना एखाद दुसऱ्यावेळेस हा सेंस कामी येत असेलही, पण त्याबाबतीत पालकांपेक्षा मुलंच जास्त सरस ठरत असतात हेही तितकेच खरे. त्यात पुन्हा स्त्री किंवा मुलगी असल्याचा एक आभिशाप... एमसीपी म्हणजे मेल च्शॉविनिस्ट पिग्स, अर्थात मराठीत, पुरूषत्व हेच प्रगतीचं अन बुद्धिमत्तेचं प्रमाण मानून चालाणारे पुरूष भोवताली असले की अधिकच...