Skip to main content

सवयीच्या तऱ्हा

लेखक अनिल आपटे यांनी गुरुवार, 28/04/2011 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
सवयीच्या तऱ्हा सगळी माणस सारखीच म्हणजे हाती पायी सारखीच दिसायला पण प्रत्येकाचा चेहरा वेगळा, त्याच अंतरंग वेगळं, त्याचा स्वभाव वेगळा, त्याच रंगरूप वेगळ इतकच काय प्रत्येकाच्या सवयीहि वेगवेगळ्या, माणूस एक सवयी अनेक व्यक्ती तितक्या प्रकृती तद्वत व्यक्ती तितक्या सवयी. आणि या सवयीतरी किती प्रकारच्या.सवय म्हटलं कि ती त्या माणसाच्या अंगवळणी पडते.   म्हणजे त्या माणसाची इच्छा असो अगर नसो ती गोष्ट त्याच्या हातून घडून जाते.   सवयीच्या नाना तर्हा आपल्याला पहायला मिळतात.

आयुश्याचं गणित...

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 28/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या गणितात मी नेहमीच चुकलो... बघणं... तुला वजा केल्यावर स्वतासाठी सुद्धा नाही उरलो... हे गणित मांडताना एक महत्वाची गोष्टच विसरलो... साधे गोलाबेर्जेचे नियम लाऊन पुरता फसलो... शेवटी “तू” उत्तर याव म्हणून प्रत्येक त्रैराशिक मांडून पाहिलं... आणि उत्तर शोधता शोधता सुरवातच विसरलो... आता हे कळून चुकलय की आयुष्य गणिताएवढ सोप्प नसत... म्हणून शेवटी कितीही प्रयत्न करून हव ते उत्तर मिळतच अस नसत... ```पारिजात
काव्यरस

आलू टिक्की ......

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 28/04/2011 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
आलू टिक्की ...... बटाटा - 500 ग्राम (8-10) ब्रेड - 4 हिरवे मटर - 100 ग्राम धने पाउडर - एक छोटा स्पून अमचूर पाउडर - अर्धा स्पून गरम मसाला - अर्धा स्पून हिरवी मिरची तुकडे -2 , 3 कोथिंबीर मीठ ------ स्वादानुसार रिफाइन्ड तेल / देशी घी - 3 -४ स्पुन विधि बटाटा कुकर मध्ये शिजवून घ्या ,मटार गरम पाण्यात उकळून घ्या, मटार थंड झाले कि मिक्सी मध्ये बारीक करून घ्या कढईत २ चमचे तेल घाला त्यात धने पावडर आणि हिरवी मिरची

स्पीक एशिया : संधी की सापळा?

लेखक ज्ञानेश... यांनी गुरुवार, 28/04/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सध्या 'स्पीक एशिया डॉट कॉम' ची बरीच चलती आहे असे दिसते. उपलब्ध माहितीनुसार ही एक सिंगापूरस्थित सर्व्हे कंपनी आहे, जी लोकांमार्फत ऑनलाईन सर्व्हे कंडक्ट करते. कंपनीत नावनोंदणी करण्यासाठी ग्राहकाला आधी एका वर्षासाठी ११,०००/- रू. भरावे लागतात. त्याबदल्यात त्याला आठवड्याला दोन सर्व्हे करायला देतात. एक सर्व्हे केल्यावर ५०० रू. मिळतात. याप्रमाणे दर महिन्याला चार हजार रुपये कमावता येतात. म्हणजे ११ हजार भरायचे आणि वर्षभरात ४८ हजार कमवायचे अशी एकंदर स्कीम आहे. याशिवाय आपल्यासारखेच ११००० भरणारे दोन नग शोधून आणल्यास त्यांचेही कमिशन आपल्याला मिळणार.

सत्यसाईबाबांची ती भेट !

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 28/04/2011 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-1-2… आजच्या लोकमतमधील बातमी जशीच्या तशी खाली डकवित आहे. सत्यसाईबाबांची ती भेट ! (27-04-2011 : 12:43:11) (दिनकर रायकर)::- पुट्टपर्थीच्या सत्यसाईबाबांचे पार्थिव आज अनंतात विलीन होईल.

फ्रुट कस्टर्ड व चेरी व्हॅनीला शेक

लेखक प्राजक्ता पवार यांनी बुधवार, 27/04/2011 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रुट कस्टर्ड : साहित्य : दुध - अर्धा लिटर , कस्टर्ड पावडर - २ चमचे , साखर - ४ चमचे , फ्रेश क्रीम - ४ चमचे , फळे - सफरचंद , द्राक्षे , पपई , डाळींब , संत्रे इ कृती : प्रथम अर्धी वाटी दुध वेगळे काढुन घ्या व त्यात कस्टर्ड पावडर घालुन एकत्र करा. उरलेले दुध , साखर घालुन गरम करा . एक उकळी आल्यावर त्यात कस्टर्ड पावडरचे मिश्रण ह्ळुहळु घाला व चमच्याने मिसळा. दोन मिनिटे दुध गरम करुन नंतर ते थंड करायला ठेवा.

मर्कट फोटोग्राफीचा एक प्रयत्न

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 27/04/2011 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
शरद व स्पा यांच्या धाग्यामुळे मीहि खूप प्रभावित झालो, आणि नुकतेच माथेरानला काही काढलेले फोटो उकरून बघितले... ;) त्यात मला पण अस वाटल कि होय, मी सुद्धा काही हटके फोटो घेतलेले आहेत.. डकवतोय बघा आवड्तायेत का? माथेरानच्या लुईझा कडेटोकावर बसलेले हे मर्कट, उन्हातान्हाचे वैतागलेले, उदास भाव असलेले. हे एक छोटे कुटुंब. दंगा चालला होता यांचा.

काल रात्री

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 27/04/2011 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: पाऊस येणार असला तर त्याला एक घटनाक्रम असतो. प्रथम दाटून येते, मग हळूहळू गारठा जाणवायला लागतो, त्यानंतर पाऊस सुरू होऊन सगळं जलमय होत जाते, वाहायला लागते आणि वाहता वाहता विरघळायला लागते. या सर्व घटनाक्रमात क्रमाक्रमाने विरहात झुरणार्‍या नायकाच्या मनाची अवस्था आणि त्याचे विचार या रचनेत मांडायचा प्रयत्न आहे. ====================================== परत एकदा स्व:तास केले स्वप्नांच्या आधीन | .......... काल रात्री || परत एकदा जीवास केले सखेच्या स्वाधीन | ..........
काव्यरस