Skip to main content

आले आले आमचे स्वामी बाबा आले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 01/05/2011 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
आले आले आमचे स्वामी बाबा आले
जय महाराष्ट्र! कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा! llपुण्याचे पेशवेll यांनी या प्रतिसादात (http://www.misalpav.com/node/17833#comment-310480) बाबा-महाराज लोकांच्या प्रवृत्तीवर काहीतरी जागृती होण्यासाठी काहीतरी लिहीण्याचे सांगितले होते. त्यांची आज्ञा आम्हास मान्य असल्याने खालील काव्य लिहीण्यात आले.

पालकाची पातळ भाजी

लेखक शुचि यांनी रविवार, 01/05/2011 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पालक - मध्यम गड्डी लसूण पाकळ्या - ४/५ चण्याच्या डाळीचे पीठ - २ मध्यम वाट्या हळद - चवीनुसार मोहरी - चवीनुसार जीरे - चवीनुसार हिंग - चवीनुसार गूळ - चवीनुसार चिंच - चवीनुसार तिखट - प्रकृतीनुसार मीठ - चवीनुसार कृती: १. पालक धुऊन बारीक चिरून घ्यावा. २. लसणाचे बारीक काप करावे. ३. डाळीच्या पीठात पाणी घालून हाताने एकजीव करून घ्यावे किंवा सरळ मिक्सरमधून डाळीचे पीठ-पाणी हे मिश्रण काढावे. ४. चिरलेला पालक कुकरमध्ये घालून, वर हळद घालून एक शिट्टी करावी. हळदीने हिरवा रंग कायम रहातो. ५.

सुखाचा शोध

लेखक ajay wankhede यांनी शनिवार, 30/04/2011 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी हि जन्मा पासून फिरतो आहे सुखाच्या शोधात दरया,खोरयात, झाडांच्या सळसळणारया पानात, नदीच्या संथ वाहणारया पाण्यात पण दुक्खः जणू पाठच सोडत नाही, दरया,खोरयात, झाडांच्या सळसळणारया पानात, नदीच्या संथ वाहणारया पाण्यात. दररोज कित्येक मरण यातना भोगतो स्वप्नांचे जड ओझे घेऊन जगण्याची उभारी देणारे कुणी तरी भेटेल काय ? दरया,खोरयात, झाडांच्या सळसळणारया पानात, नदीच्या संथ वाहणारया पाण्यात.

फलाफल सँडविच

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 30/04/2011 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य फलाफल: १ वाटी काबुली चणे १/४ वाटी मैदा मुठभर कोथिंबीर मुठभर पारस्ली २-३ हिरव्या मिरच्या चिरून १ टेस्पून जिरे आल्याचा छोटा तुकडा बारीक चिरून मीठ चवीनुसार . पाकृ: काबुली चणे रात्रभर भिजवुन सकाळी कुकरमध्ये शिजवुन घेणे. नतंर त्यातील पाणी निथळून चणे किचन टीश्युवर पसरवुन कोरडे करावेत.

दोन मी

लेखक शरद यांनी शनिवार, 30/04/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. धनंजय यांची कविता वाचल्यानंतर कै. आरती प्रभू यांच्या एका जुन्या कवितेची आठवण झाली. दोन मी तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो तरिही मी कां चालतो ?

जंक फूड चं घातक जाळं

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 30/04/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी मी माझ्या मैत्रिणी बरोबर जवळच्या मॉल मधे खरीदी करायला गेले होते. सोबत तिचा ३ वर्षाचा मुलगा- रोहन पण होता. मॉल च्या दारातच एक मोठा विदुषक होता जो सर्व मुलांना फुगे देत त्यांच्या 'फास्ट फूड' रेस्टॉरन्ट मधे यायचा आग्रह करत होता. ते बघताच रोहन 'मम्मा फ्राईज' 'मम्मा बर्गर' 'मम्मा आईस्क्रीम' अश्या बऱ्याच विनवण्या व मग हट्ट करू लागला. तिथून त्याला कसं बसं समजावून पुढे निघालो तर तो 'कुकीझ' म्हणून ओरडला. आई तशीच पुढे निघून जातीये हे लक्षात येताच, त्याने तिथेच फतकल मारून चांगलाच गोंधळ घातला. शेवटी वैतागून माझी मैत्रीण त्याला फूड कोर्ट मधे घेऊन गेली आणि त्याचे हट्ट पुरव्ल्यावरच तो शांत झाला.

दोन मी

लेखक शरद यांनी शनिवार, 30/04/2011 15:18 या दिवशी प्रकाशित केले.

बाय बाय क्लिक क्लॅक डिंग!!!!

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 30/04/2011 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
क्लिक क्लॅक डिंग!!!! एकेकाळचा अनेक ऑफीसातून येणारा सगळ्यात नेहमीचा आवाज. टाईपरायटरचा आवाज. टाईपरायटर तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल. मीही लहानपणापासून पाहत आलो आहे. हा टाईपरायटर घरात कधी आला हे नक्की आठवत नाही मात्र तो घरी होता. तेव्हा आमचं दहिसर हे मुंबईचं एक उपनगर असलं तरी त्याला एक गावपण होतं. गावातून एक 'वाहती' नदी होती. (माझ्या कळत्या वयापर्यंत तिचं पाणी दुषित व्हायला लागत असलं तरी निदान वाहतं होतं.) गावठणाबाहेर असलेलं विठ्ठलाचं कौलारू मंदीर ही गावातली महत्त्वाची जागा होती.

आला पहा कवी तो -

लेखक विदेश यांनी शनिवार, 30/04/2011 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
आला पहा कवी तो - आला पहा कवी तो - उलट्या दिशेस पळतो पाहून त्यास जो तो ! इकडून सिंह आला ; तिकडून बघ कवी तो सिंहासमोर जो तो जबड्यात शिरु पहातो ! का वाटते कवीचे भय फार सज्जनाला वाळीत का कवीला तो टाकण्यास बघतो !
काव्यरस