Skip to main content

पर्सनल अकाऊंट

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 13/06/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
खरच...?मी आहे स्वतंत्र?... की,मी मालक आहे,एका बंद खोलीचा?॥ आपल्याच भींती,आपल्याच खिडक्या... आपलीच दारे,आणी कुलुपही आपलेच... प्रश्न आहे,हे सर्व उघडण्यासाठी लागणाय्रा चावीचा। आत राहायचे,निवारा हवा म्हणुन... आणी प्रेमाची माणसे असावी म्हणुनही... पण माणसं असुनही प्रेम नसेल,तर कुठुन कौल घ्यावा विवेकाचा?। कंटाळुन,वैतागुन मी बाहेर जातो,माळरानावर हुं-दडण्यासाठी... पण पुन्हा परतण्याची ओढ का लागते?... काळ येउन ठेपलाय,हे सगळं एकदा तपशिलवार शोधण्याचा। आजकाल मी समजतो,ही खोली आपलं पर्सनल अकाउंट आहे... आणी आपला हिच्याशी...मरेपर्यंत एक बाँड आहे... खरा मार्ग आहे,तो अकाउंट एक्टिवेट ठेवण्याचा। पराग दिवेकर...
काव्यरस

जय जय लंबोदरा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 13/06/2011 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय लंबोदरा
जय जय लंबोदरा आदीदेव तू विद्यासागरा लवकरी ये संकटहरा जय जय लंबोदरा ||धृ|| विनंती आमची तुझीया ठायी करीतो आर्जव नमीतो पायी सकल कार्य नेई सिद्धीस आशिर्वाद देण्या त्वरा करा ||१|| रूप अन गुण तुझे कितीक वर्णू मुढ बालके आम्ही, तू कृपासिंधू फळ द्यावया कष्टास आमच्या करीतो आम्ही तुझा पुकारा ||२|| जय जय लंबोदरा आदीदेव तू विद्यासागरा लवकरी ये संकटहरा जय जय लंबोदरा ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १३/०६/२०११
काव्यरस

चबुतरा

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 13/06/2011 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्यागर्द झाडीत, जुन्या चबुतऱ्यावर उन्ह पाऊस झेलीत, उभी आहे दगडी छत्री पायथ्यात विसावलेल्या कोण जाणे कुणाची महानिद्रा सांभाळीत, वखवटातात जीवनाच्या तिच्या आजुबाजुला, निर्मितीचा नंगा नाच चालू आहे अव्याहत, मरणाच्या एकटेपणावर हिरवे काळे बुळबुळीत लिंपण लावीत जीवनाने पाय रोवले आहेत छत्रीच्या माथ्यावर उडणारे पक्षी मधूनच कधी टेकतात अस्वस्थ माना वळवून शोधतात शोधतात मागे राहिलेल्या कुणाला तळात छत्रीचा कुणीतरी, नेहमीसाठी जवळ. हंबरत येवून एखादी गाय पळभर विसावते छत्रीच्या दगडी चबुतऱ्याशी घासून मान थोडी शमवते रुखरुख तो शांत आतमधे, नाही कसलीच बोच कॅमेरा रोखून कोणी प्रवासी घेतो फ़ोटो खांबाशी रेलत्या हस
काव्यरस

एक प्रतिसाद - "बोगस अध्यात्माची सुरसकथा-१" ला

लेखक धन्या यांनी रविवार, 12/06/2011 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख श्री. ईश आपटे यांच्या "बोगस अध्यात्माची सुरसकथा-१" या लेखाचा प्रतिसाद आहे. माझा प्रतिसाद लिहिता लिहिता मूळ लेखापेक्षा मोठा झाल्यामुळे स्वतंत्र लेख म्हणून देत आहे. १. गेल्या शतक भरात, साधारण १८९३ पासुन भारतभरात नव्या आध्यात्मिक गुरुंची मोठी लाट आली. अगदी खरंय. नव्हे, तुमचा "लाट आली" हा शब्दप्रयोग खुप काही सांगून जातो. ईंग्रजीमधील "फॅड आलंय" हा शब्दप्रयोग सुद्धा चालला असता. पण... लाट किंवा फॅड हे हे खुप अल्पजीवी असतं. ते येतं, थोडा वेळ राहतं आणि निघून जातं. अध्यात्मिक गुरूंच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही.

पाऊस

लेखक सामान्य वाचक यांनी रविवार, 12/06/2011 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी संध्याकाळी पाऊस भुरभुरत होता, भान विसरून मी मनानं पावसात भिजत होते तेवढ्यात तू आलास. " छे, काय हा पाऊस! वैताग नुस्ता चिकचिक, चिखल, बाप रे" मी पाहीलं तुझ्याकडे, नवलाने. "तुला नाही आवडत पाऊस? झिमझिमणारा पाऊस, भुरभुरणारा पाऊस, कोसळ्णारा पाऊस..... "हं, त्यात काय आवडायचं? समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती आकाशात जाते, तिथे त्याचं हे होतं, ते होतं, आणि पाऊस पडतो. मी हसले, दुखावून "तुझी नावड ही ठीक आहे, मला तरी कुठे आवडतात, पावसाची शास्त्रिय कारणे? तू एकदम गप्प झालास. जाताना टेबलावरचा चाफा उचलून म्हणालास, "ही नेऊ?" मी पाहीलं तुझ्या डोळ्यात, तुला पाऊस आवडायला लागला होता. ...........

मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली (भाग २)

लेखक चिंतातुर जंतू यांनी रविवार, 12/06/2011 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय पूर्वपीठिका: लेख जरा लांबलचक होतो आहे अशी जाणीव लिहिताना झाली होती. त्यामुळे तो शेवटीशेवटी थोडक्यात आटपला होता, हे कबूल करतो. पण शेवटचा भाग त्रोटक करण्यामागे त्याशिवाय अजून एक विचार होता: अखेर चित्रं ही डोळ्यांनी पहायची असतात. त्याविषयीचं विवेचन हे फार फार तर जरा मदत एवढ्यापुरतंच यावं असं मला वाटतं. असो. काही लोकांची तशी इच्छा दिसल्यामुळे थोडं अधिक विवेचन देत आहे.

बोगस अध्यात्माची सुरसकथा-१

लेखक ईश आपटे यांनी रविवार, 12/06/2011 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
सदर विषयावर लेखन करायच अनेक दिवसांपासून मनात होत. पण आधीच आध्यात्मिक गुरुंची प्रतिमा चांगली नाही, त्यात मी स्वतः आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य आहे . त्यामुळे हा विषय माझ्यासाठी थोडा नाजूक बनला होता. पण मग जे आपण निष्कर्ष काढले आहेत, विचार केला आहे (तो १००% बरोबर आहे अशी खात्री आहे) तो मांडला पाहिजे अस मला वाटल. मी इथे काही मुद्दे वार निष्कर्ष मांडणार आहे, म्हणजे थोडक्यात काय म्हणायचे आहे ते सर्वांना कळेल.