Skip to main content

आईस क्रीम की.....????

लेखक छत्रपति यांनी मंगळवार, 14/06/2011 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आईस्क्रीम खायला तसं सगळ्यांनाच आवडतं. आणि आता तर उन्हाळाच काय पण १२ महिने आईस्क्रीम खायची एक संस्कृती तयार झाली आहे. मधुमेही रुग्णांसाठी देखील शुगर फ्री पर्याय उपलब्घ झाले आहेत. बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कद...ाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत. मध्ये एका मिटींगसाठी आमच्या एका सरांनी मला हॉटेलमध्ये बोलावलं होत. तेव्हा माझ्या आधी सरांची अजून एका माणसाबरोबर मिटींग चालू होती. मी त्यांच्या मिटींगचा प्रेक्षक झालो गेलो.

वेताळ आणि वेताळिणीचा संवाद...

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 14/06/2011 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेत पुन्हा झाडाला लटकू लागले आणि विक्रमही घरी निघून गेला. इतकावेळ प्रेतात बसून विक्रमाची बडबड ऐकून कंटाळलेला वेताळही अन्य काहीच टाईमपास नसल्याने नाईलाजाने घराकडे वळला. खरे तर घरी जाणे त्याच्या अगदी जीवावर आले होते कारण घरी त्याला वेताळिणीची बडबड ऐकून घ्यावीच लागणार होती. नेमके हेच टाळण्यासाठी वेताळ रोज त्या झाडावरच्या प्रेतात वेळ घालवत बसायचा. 'वेताळिणीपेक्षा विक्रम परवडला. तो निदान लागट आणि तिरकस तरी बोलत नाही,' या विचाराच्या नादात वेताळ घरी पोचला. 'या! आलात एकदाचे गावभर उंडारुन.

आहे का कोणी ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 14/06/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
अमरजीतसींग हा आर्थिक क्षेत्रात फार मागे, मात्र बौद्धिक क्षेत्रात नवनवी शिखरे पादाक्रांत केलेला आणि नव्या शिखरांची स्वप्ने रंगवणारा विद्यार्थी. ह्या वेळच्या बारावीच्या परीक्षेत ह्या विद्यार्थ्याने ६०० पैकी ५७८ गुण मिळवले. येवढेच करून न थांबता आज लागलेल्या CET च्या परीक्षेत त्याने २०० पैकी १९२ गुण पटकावून घवघवीत यश संपादन केले. पण आता पुढील शैक्षणिक खर्चाचे काय? घरच्या आर्थिक अडचणीतून मार्ग काढून तो पुढे शिकू शकेल ? का हि बुद्धिमत्ता झाकोळून जाणार ? हे प्रश्न मनात उभे राहतं असतानाच तुमच्या आमच्यातूनच एक मदतीचा हात पुढे येतो आणि त्याच्या पुढील चार वर्षाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलतो.

' वर्षा सहल - ०१ - जुन २०११

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 14/06/2011 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
चिंब भिजलेले.... तुम्हाला हे गाणं माहितच असेल ना, चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. काय नाही माहीत, असं कसं होईल, एवढं फेमस गाणं अन माहीत नाही, बघा बघा आठवा, छान पाउस पडतोय, आणि आजुबाजुला हिरवाई आहे, पाना पानातुन थेंब टपकताहेत आणि लांब कुठंतरी नदीच्या उफाणाचा आवाज येतोय, नेहमी करपट वाटणारे दगड पण जिंवत वाटतात, आणि त्यावेळी मनात हे गाणं घुमायला लागतं.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. नाही आठवलं अजुन, अवघड आहे मग...

रावण

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 13/06/2011 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
१) रामायणातील लढाई संपवायची रावणाला इच्छा होती . त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता. पण एक प्रश्न पडल्यामुले समेट होऊ शकला नाही. माफी कुठल्या तोंडाने मागायची? २) रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे. कारण पुढच्या बाकावर रावण बसला की कोनालाच फळ्यावर लिहीलेले दिसायचे नाही ३)रावणाचे डोके दुखू लागले. त्याला डॉक्टरानी झेन्डू बाम दिला.

मासे २८) करंदी

लेखक जागु यांनी सोमवार, 13/06/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यात करंदी भरपुर आणि चांगली येते. त्यामुळे करंदी आणि आंब्याची कढी हे कोम्बीनेशन चांगले जमते. करंदी म्हणजे छोटि कोलंबीच. पहिला कोलिम मग जवळा मग करंदी असा ह्यांचा क्रम करंदीचे कालवणही करतात. त्यातही कांदा घालतात. आळुवडीतही करंदी घालतात. करंदी पुलावही चांगला होतो. ही आहे करंदी.

Android फोन वर मराठी वेबसाईट्स कशा पहाव्या?

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 13/06/2011 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्याच्या माझ्या फोन मधे देवनागरी फाँट दिसत नाही. सद्ध्याचा फोन कुठला ह्याला महत्व नाही. लवकरच Android फोन घेणार आहे. त्यावर मराठी साईट्स, ब्लॉग्स वाचता यावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी काय करावे लागेल? कुणाला अनुभव आहे का? कुणी ह्या बाबतीत मदत करू शकेल का?