Skip to main content

मोहोर

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 19/06/2011 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
नियतीच्या सहस्त्रभुजांत अजस्त्र विक्राळ जोर आहे विधीलिखितावर अटळपणाची उमटलेली मोहोर आहे टेबलाशी, खुर्चीत एकेक खिडकीशी बसला चोर आहे उपोषणांवर वांझपणाची उमटलेली मोहोर आहे आग्रा कधी अमृतसर कधी मोहाली कधी लाहोर आहे मूक थडग्यांवर अहिंसेची उमटलेली मोहोर आहे जन्मानंतर तोडती नाळ जणू कापलेला दोर आहे अंतापर्यंतच्या भटकण्यावर उमटलेली मोहोर आहे भरल्या पोटी गातो गाणे निरंजन भाव विभोर आहे झगड्यावरती रोज लाखोंच्या उमटलेली मोहोर आहे

Intrepid Sea, Air & Space Museum, New York

लेखक येडा अण्णा यांनी रविवार, 19/06/2011 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
न्युयॉर्क मध्ये येवुन जवळपास दिड वर्ष झाले होते तरीही Intrepid Museum ला जायचा योग काही येत नव्हता. अखेर या शनिवारी तो योग आला.

सर (भाग दोन)

लेखक शैलेन्द्र यांनी रविवार, 19/06/2011 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या प्रसंगानंतर आमच्या विभागाची गाडी हळुहळु रुळावर यायला लागली. ऑफीस स्टाफचे सहकार्य वाढले. आणी आम्हालाही सर थोडे जास्त समजायला लागले.. सर जबरदस्त अ‍ॅडमीनीस्ट्रेटर होते. कोणतं काम कस करुन घ्यायच, त्यासाठी कोणाला भिडायच, कोणाला कसली लालुच दाखवायची, कोणाला पोकळ दम मारायचा हे त्यांना अचुक कळायचं. त्यांना रिझल्ट हवा असायचा, साधन शुचीतेबद्दल फार आग्रह कधीच नव्हता. एंडोक्रायनोलॉजी (अंतस्त्रावीग्रंथीशास्त्र) व रिप्रोडक्टिव बायोलॉजी(जननशास्त्र) या विषयाचे ते तज्ञ होते.

फोटोग्राफी

लेखक nishant यांनी रविवार, 19/06/2011 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी रात्री काढलेले काही फोटो १. Kosice मधील एक संध्याकाळ jhj २. St. Elizabeth Cathedral कडे जाणारा रस्ता jkhk ३. St.

२०११ अ हेरीटेज(एन्फ्लुरेज) वॉक

लेखक चेतन यांनी शनिवार, 18/06/2011 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ अ एन्फ्लुरेज वॉक १८५७ अ हेरीटेज वॉक आणि रावण हे लिहणारे विजुभाउ एकच का? असा प्रश्न पडला असताना एक नवीन बातमी मिळाली - "स्लटवॉक". नावावरुन काहीतरी वेगळचं वाटतय ना? हे काथ्याकुट काढायचं कारण म्हणजे २५ जुन २०११ चं दिल्ली मधिल आयोजित प्रदर्शन तर याची सुरवात झाली ""women should avoid dressing like sluts in order not to be victimized." या टोरांटो पोलिसांमधिल Constable Michael Sanguinetti च्या वक्तव्यावरुन. हा माणुस अपराध थांबवणे (सुरक्षितता) या मुद्यावर यॉर्क युनिवर्सिटीमध्ये बोलत होता. नंतर त्याने माफी मागितली ही वेगळि गोष्ट. पण तो चुकीच बोलला का?

लेबनिज मेझे हमूस,ताबुले

लेखक दीविरा यांनी शनिवार, 18/06/2011 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
लेबनिज मेझे हमूस,ताबुले (Lebanese Mezze Hummus, Tabbouleh) आज मी तुम्हाला लेबनिज मेझेची ओळख करून देणार आहे .मेझे( Mezze are starters which can be served as full meals) हमूस साहित्य : १. काबुली चणे १ कप २. ताहीना पेस्ट २/३ चमचे( तिळ पेस्ट रेडीमेड) ३. एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल २ चमचे ३ लिंबू चवीनुसार ४. मीठ चवीनुसार ५.लसूण २/३ पाकळी सजावटीसाठी पार्सले,लाल तिखट. कृती : १.काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवून ,कुकरला शिजवून घ्या . २. आता लसूण, शिजवलेले चणे ,ताहीना पेस्ट मिकसर मध्ये बारीक वाटून घ्या . ३. त्यात चवीनुसार मीठ,लिंबू व एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल घाला . ४.

यम बोलला वडाला

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 18/06/2011 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
यम बोलला वडाला वटपौर्णिमेच्या भल्या सकाळी बायकांच्या आधी यमच आलेला पाहून वडाला विस्मय वाटला. पानांची सळसळ करत बोलला यमाला काय रे यमा, कलियुगात सत्यवान शोधतो आहेस का सावित्री? यम लाजत लाजत बोलला मला वटसावित्रीचं व्रत बघायचं आहे. वड त्राग्याने म्हणाला, बाबारे, आजचा एकच दिवस माझ्या धंद्याचा तू इथे बसलास तर बायका आणि भटजी कशाला येतील इथे? यम बोलला वडाला पूजा तर बघेनच आणि फांदीही दे एक मला. वड खो खो हसत म्हणाला, तू फांदी घेऊन करणार काय? तुला नवरा म्हणून मागणारी आहे तरी कोण? यम बोलला...
काव्यरस

सर (भाग एक)

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 18/06/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
" डॉ. डी ए गुणगाडे, डी एस्सी., विभागप्रमुख, बायोटेक्नॉलोजी" दरवाजावर चकाकती सोनेरी पाटी होती. जितकी पाटी नवी होती तितकाच माणुसही नवा होता. मुळात हे डीपार्ट्मेंटच नव्याने सुरु झालेल.. जगात सगळीकडे बायोटेकचे नगारे वाजु लागल्यावर आपणही काहीतरी कराव अशी कळ आमच्या विद्यापीठाच्या कुलगुरुंना नको त्या ठीकाणी आली अन त्यांनी जीवशास्त्र विभागातीलच अर्धा मजला या नव्या विभागासाठी दीला. बर त्यात गम्मत अशी करुन ठेवली की या विभागाला वेगळा विभागप्रमुख नेमला. हे म्हणजे नव्या नवरीला दोन दादले देण्यासारख होतं कारण या विभागाकडे विभागप्रमुख सोडुन काहीच नव्हतं. प्रोफेसर सगळे व्हीजिटींग..