मागच्या प्रसंगानंतर आमच्या विभागाची गाडी हळुहळु रुळावर यायला लागली. ऑफीस स्टाफचे सहकार्य वाढले. आणी आम्हालाही सर थोडे जास्त समजायला लागले..
सर जबरदस्त अॅडमीनीस्ट्रेटर होते. कोणतं काम कस करुन घ्यायच, त्यासाठी कोणाला भिडायच, कोणाला कसली लालुच दाखवायची, कोणाला पोकळ दम मारायचा हे त्यांना अचुक कळायचं. त्यांना रिझल्ट हवा असायचा, साधन शुचीतेबद्दल फार आग्रह कधीच नव्हता. एंडोक्रायनोलॉजी (अंतस्त्रावीग्रंथीशास्त्र) व रिप्रोडक्टिव बायोलॉजी(जननशास्त्र) या विषयाचे ते तज्ञ होते. D Sc पदवी असलेले फार थोडे लोक मी पाहीलेत, सर त्यातले पहीले. ३५-४० जणांनी त्यांच्या हाताखाली डॉक्टरेट केली होती. सर कधीही आपल्या विद्यार्थ्यांचे नुकसान करायचे नाही आणि कुणाला करुही द्यायचे नाही. पी एच डी देण्यासाठी मुलांना पाच पाच - सात सात वर्ष रखडवणारे गाईड मी पाहिलेत. सरांकडे पी एच डी म्हणजे मॅक्झीमम ३ वर्ष.. त्यातही उगाच रडवायचे नाही, शक्यतो विद्यार्थी कसा लवकर मार्गाला लागेल याकडे त्यांचा ओढा असायचा. सरांचे सगळे विद्यार्थी चांगल्या ठीकाणी कार्यरत आहेत. एखाद्याला फर्स्ट क्लास मिळायला दहा पंधरा मार्क कमी पडत असतील, एखादा काठावर नापास होत असेल तर सर आधी मनोसोक्त शिव्या द्यायचे मग स्वत:च सांगायचे, "पेपर रिचेकींगला टाक, भगते मी".. हे रिचेकींग बहुदा त्या विद्यार्थ्याला स्वतःच करायला लागायच. कुठतरी, कमीत कमी खाडाखोड करुन मामला सेटल केला जायचा. काही गणंग असे होते की त्यांना हे ही जमायच नाही. अशांसाठी एक टिपिकल प्रश्न होता सरांचा.."जावई बनते का माझा?" पोरग भितीनेच सगळं नीट करुन दयायचं.
सरांना काही गोष्टींची प्रचंड आवड होती. त्यातली एक म्हणजे वेगवेगळे पदार्थ खावुन पाहणे. तेही शक्यतो महागड्या हॉटेलांत.. दुसर म्हणजे "गुण्गाडे स्पेशल इंग्लीश".. सरांना इंग्लीश अजीबात यायच नाही. स्वत:चा प्रबंधसुद्धा ते दुसर्याकडुन लिहुन घ्यायचे. पण इंग्लीश बोलायची आवड भयंकर.. त्यातही कुणी हाय फाय किंवा विदेशी व्यक्ती असेल तर विचारायलाच नको. एकदा असाच एक ब्रिटीश संशोधक आमच्या विभागात आला होता, १० -१५ मिनीट त्याच्याशी सलग स्वता:च्या इंग्लीश्मधे बोलल्यावर सरांची दमछाक झाली होती. इतक करुनही त्याला फारशी काही टोटल लागत नव्हती आणी तितक्यात फोन वाजला
" यस्स, गुण्गाडे बोलींग"
कॅबीनमधे जमलेले आम्ही तिघे- चौघे फिस्स्कण ह्सलो..
पण या सरांच्या इंग्लीशने आम्हाला एकदा खरच मार खायला लावला असता.
शैक्षणीक सहलीसाठी आम्ही बंगलोरला गेलो होतो. तिन दिवस संपले, सरांचे नेहमीचे किस्से चालुच होते. आम्हाला आता त्याच फारस काही वाटायच नाही. चौथ्या दिवशी सकाळी सरांनी जाहीर केल की आज लंच स्कीप करायचा आणी डीनर फायस्टारला करायच. सगळ्यांना प्लॅन आवडला, फक्त तिथे सरांबरोबर जायची मात्र भिती वाटत होती. हा माणुस कुठे कसा वागेल याचा भरवसा नव्हता. आदल्या दिवशीच एका हॉटेलमधे जेवण झाल्यावर, बिल वेळेवर आले नाही म्हणुन सर सरळ तसेच निघुन चालले होते. सर पुढे, आम्ही त्यांच्यामागे, व बिल घेवुन हॉटेलचा मॅनेजर धापा टाकत आमच्यामागे, अशी वरात बंगलोरच्या एम जी रोडवर सगळ्यांनी अनुभवली होती.
पण आता सरच म्हणतायत म्हटल्यावर कोणी फार खळखळ केली नाही. संध्याकाळी आमच काम संपल्यावर चहा घेताना सरांनी प्रस्ताव ठेवला..
"आपण पैला शर्व्हे केला पायजे, काय चांगला मिलत, प्राइज काय बघायला पायजे"
अमान्य होण्यासारख यात काहीच नव्हतं, विद्यार्थीदशेत इतके पैसे भरुन जेवायचय तर तो अनुभव सगळ्यांनाच आवडावा अस आम्हालाही वाटत होत. मग आम्ही दोन तिन जण आणि सर, अशी वरात बंगलोरच्या पंचतारांकीत हॉटेलांचा समाचार घ्यायला निघाली.
पहीले एक दोन हॉटेल सरांनी बाहेरुन बघुनच रिजेक्ट केले. शेवटी आय टी सीच्या एका मोठया पंचतारांकीत हॉटेलात आम्ही शिरलो. आत घुसल्या घुसल्या सरांनी दोन्ही हात आपल्या पॅन्टच्या खिशांत टाकले.. हा धोक्याचा सिग्नल होता. सर जेंव्हा नर्व्हस होतात तेंव्हा त्यांचे हात एकतर पॅन्ट्च्या खिश्यात जातात किंवा ते नाक खाजवायला लागतात.
"सर, मी विचारतो बफेटबद्दल, आपण वीस जण आहोत" एकाने पुढाकार घ्यायचा प्रयत्न केला..
"ह्येय श्टुपीड" सरांनी त्याला डाव्या हाताच्या तर्जनीने दाबले. " आय विल्ल डिश्कश"
एका भव्य काउंटरमागे एक सुंदर रिसेप्शनीस्ट उभी होती. हात परत खिशात घालत सरांनी तिच्याकडे कुच केले.. आम्हीही मागुन निघालो.
"वेलकम सर" सुहास्यवदनाने तीने स्वागत केले..
"थॅन्क्यु थॅन्क्यु" सरांनी आसपास नजर फिरवली, हॉटेलची भव्यता परत डोळयात भरुन घेतली, रिसेप्शनीस्टला नीट न्याहाळल.. चेहर्यावर रुबाब आला..
"गुड्ड"
वरचा ओठ खालच्या ओठावर दाबुन, मान खालीवर हलवत सरांनी एकंदर प्रकरणाला पसंती दर्शवली..
"यस सर" काहीतरी बोलायच म्हणुन ती बोलली.
"शो लेडी, व्हाट इज युवर रेट?"
आमच्यातला एकजण फस्स्कन हसला, तसा सर सोडुन इतर सगळ्यांच्याच डोक्यात प्रकाश पडला. ती मुलगी प्रचंड संकोचली. तिला काही बोलताही येईना.
"यु मीन रुम रेंट सर? यु वांट टु स्टे?" त्याही परीस्थीतीत ती सावरुन घ्यायचा प्रयत्न करत होती.
"नो ष्टे, ष्टॅन्डींग, इफ्फ ट्वेंटी पीपल कम अॅट अ टाईम, व्हाट इज युवर रेट?"
आता मात्र कंट्रोल करण कठीण झालं, ती मुलगी संकोच सोडुन संतापाकडे सरकायला लागली होती. सरांच्या वयाकडे बघुन ती थोडी शांत होती. पळायची वेळ आली तर जवळचा रस्ता कुठला आहे हे आम्ही शोधायला लागलो.
"अॅन्द वुई ऑल वॉन्ट तु कम टुगेदर, तो , व्हाट इस युवर रेट्ट?" सरांनी शेवटचा गोळा सोडला..
"जस्ट अ मीनीट सर"
काउंटर सोडुन ती मुलगी मागे निघुन गेली, नंतर आलेल्या बाब्याबरोबर आम्ही ते प्रकरण कसबस मीटवल..
सरांच्या निरागस इंग्लीशचा हा किस्सा आम्हाला कित्येक दिवस पुरला.
पण सर इतकेही निरागस नव्हते. एक नविनच पी एच डी झालेला मुलगा आम्हाला शिकवायला आला होता. पण त्याच्या वयामुळे तो शिक्षक कमी व मित्र जास्त वाटायचा. आमच्यातल्याच एका मुलीला तो आवडायचा.. हलकी चेष्टा चालायची.
एका रोज डे ला तिने त्याला गुलाब दिला, प्रकरणाची थोडी चर्चा झाली. आणि सरांनी त्या मुलीच्या पॅरेंट्सनां भेटायला बोलवल.. मुलीची आईही मुलीइतकीच बोल्ड होती. तो लेक्चरर, हे दोघ आणि सर अशी मीटींग झाली. " यस सर, नो सर " करत सगळ्यांनी प्रकरण संपवल. मुलगी आणि आई निघुन गेले..
कॅबीनमधे सर आणि तो लेक्चरर..
" ह्म्म मिष्टर.. ऐशा नही होता मिष्टर" सर खुशीत असले की हा डायलॉग मारायचे.
"बट् सर" त्याने सफाइ द्यायचा प्रयत्न केला.
" अच्छा है.. मां को देखा"..
लेक्चरर पुर्ण गोंधळलेला..
"तु भी ले, मै भी लेता.."
या ऑफरवर तो बिचारा काय बोलणार..
आमचे सर म्हणजे एक रत्न होते, आणि त्यांचे नशिबही फार जोरदार होते. योग्य वेळी हे रत्न योग्य जवाहीर्याला सापडायचे. हातावरच्या रेषा चांगल्या असणारे खुप असतील पण सरांच्या नाही नाही तिथल्या रेषापण चांगल्या होत्या.
सरकारी नोकरीत नाही म्हटल तरी त्यांच्या गुणांना पुर्ण वाव मिळत नव्हता. इतक्यातच एका शिक्षणसम्राटाची नजर त्यांच्यावर गेली. त्याने त्यांना आपल्या संस्थेत मोठ पद ऑफर केलं.
सरांनी ती ऑफर स्विकारली.. त्यांच्या तिकडच्या धुमाकुळाचा, किश्श्यांचा अध्याय परत कधितरी..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3357
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाम भारी प्रकरण आहे तुमचं सर
+१
In reply to जाम भारी प्रकरण आहे तुमचं सर by शिल्पा ब
झकास.
सर..
मस्तच
तुमचे मास्तर
लिखाणाची स्टाईल आवडली, ५
ही गोष्ट ९७-९८ सालातली आहे.
In reply to लिखाणाची स्टाईल आवडली, ५ by ५० फक्त
लय
मस्त!
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल
In reply to मस्त! by बिपिन कार्यकर्ते
लिखाणाची स्टाईल आवडली..
खरं सांगायच तरं बहुतेक
In reply to लिखाणाची स्टाईल आवडली.. by बहुगुणी
"नो ष्टे, ष्टॅन्डींग, इफ्फ
शप्पथ सांगतो, हास्य, भिती,
In reply to "नो ष्टे, ष्टॅन्डींग, इफ्फ by किसन शिंदे
अप्रतिम लेखन ... व्यक्ती
जबर्दस्त व्यक्तीमत्व... लय भाग्यवान राव तूमी.
पुढील भाग लवकर येउ दे
सध्या जरा अडकलोय, पण लवकरच
In reply to पुढील भाग लवकर येउ दे by RUPALI POYEKAR