Skip to main content

आता गरज पाचव्या स्तंभाची

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 28/06/2011 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आता गरज पाचव्या स्तंभाची सन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही.

सांगा मंडळी सांगा सांगा.........

लेखक इरसाल यांनी मंगळवार, 28/06/2011 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
खालील पैकी कोणाला जास्त प्रतिसाद मिळतील ? वैयक्तिकरित्या कोणावर जाऊ नये . १.हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद. २.मुसलमानांना एकत्र आणणारी तबलिगी जमात. ३.टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

हायकू -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 28/06/2011 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशी पक्षी उडतात मजेत शिकारी खिन्न हाती लपली चार फुले चाफ्याची शीळ वाऱ्याची निजरूपाचे कुतूहल बाळाचे आरसा खूष पुढे दगड पडलेले रग्गड मी का शहाणा उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा

टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 27/06/2011 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"! इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली. ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही.

आर डी: ७२

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 27/06/2011 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
पंचमदा असते तर आज ७२ वर्षांचे झाले असते. पण खरं सांगू? ७२ काय, किंवा १०० काय, मला व्यक्तिशः हा माणूस कधीच वृद्ध वाटला नसता. इतकं चिरतरूण संगीत प्रसवणारा जादुगार वयातीतच. वो जितना जिया, सही जिया! हा लेख खास तुमच्या आठवणींचा बांध उघडण्यासाठी, मी देतोय ती केवळ झलक आहे या किमयागाराची, तुमच्याही आवडीची गाणी येऊ द्यात प्रतिसादातः मला चटकन आठवणार्‍या चित्रपटांमधील प्रत्येकी एक सुंदर गीत देतो आहे (एकच गीत सुंदर? कसं शक्य आहे?

वैचारीक भिन्नता

लेखक शुचि यांनी सोमवार, 27/06/2011 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
लॉबसंग रांपा चं "यु फॉरेव्हर" पुस्तक बरेच दिवसांनी परत एकदा वाचनात आलं. यातील एक लेख आहे "ऑरा" या विषयावर. मानवी शरीराभोवती असणारे वलय जे सामान्य डोळ्यांना दिसू शकत नाही परंतु "कर्लियन फोटोग्राफी" ने दिसू शकते. लेखकाने एक मुद्दा मांडला आहे की - २ व्यक्तींचे ऑरा काही बिंदूंना अगदी व्यवस्थित जुळतात तर काही बिंदूना "टँजेन्शिअल" छेदून जातात. जितके अधिक ते जुळतात तितकी आपल्याशी समविचारी अशी ती व्यक्ती असते. आणि जितक्या अंशात छेदून जातत तितकी आपली मते फारकत घेतात. मला या मुद्द्यात तथ्य वाटते. अगदी निकटच्या व्यक्तींशी देखील १००% कधीच पटत नाही.

कौस्तुभ "आयर्नमॅन" राडकर

लेखक श्रीरंग यांनी सोमवार, 27/06/2011 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
नाईस - फ्रांस येथे २६ जून रोजी पार पडलेली "आयर्नमॅन" ही ट्राएथ्लॉन स्पर्धा ११ तास ४६मि. इतक्या वेळेत पूर्ण करून पुण्याच्या कौस्तुभ राडकर याने ५०७ वा क्रमांक मिळवला. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारा तो आजपर्यंतचा एकमेव भारतीय ट्राएथ्लॉनपटू आहे. एवढेच नव्हे, तर ही अत्यंत कठीण स्पर्धा पूर्ण करण्याची ही त्याची चौथी वेळ आहे. आयर्नमॅन विषयी : आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते.

अन... हात तुझा हातात.

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 27/06/2011 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
उधाणलेला समुद्र, बेफान लाटा, गार वारा, अन... अन... हात तुझा हातात. पौर्णिमेची रात्र, खिडकीखाली नक्षत्रांचा सडा पायी घेऊन उभा पारिजात, मंत्रमुग्ध सुगंध, अन... अन... हात तुझा हातात. पावसाची रिपरिप, अंगावर कोसळणाऱ्या सरी अथांग भिजलेलो मी, अन... अन... हात तुझा हातात थकलेला जीव, खोलीभर अंधार. एकटेपणाची बोचरी जाणीव, अन... अन... हात तुझा हातात घाबरलेलो मी, बिथर्लेलो मी, कुशीत डोकं ठेऊन रडणारा मी, अन... अन... हात तुझा हातात बागेत खेळणारी आपली छकुली, दुडक्या चालीने दवडणारी ती, कौतुकाने पाहणारा मी, अन... अन...
काव्यरस