Skip to main content

(गाववाले आणि मुंबैकर)

लेखक धन्या यांनी रविवार, 24/07/2011 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका संध्याकाळी आमच्या गावच्या चावडीवर, गाववाले आणि मुंबईकर अशी चर्चा चांगलीच रंगली विषय तसा वादाचा, आणि सारे मुद्दे असेच कळीचे आमच्या सार्‍या गावाची शांतता या चर्चेने भंगली त्याचे झाले असे की, पूर्वापार वाद शेजारच्याच गावाशी त्यांनी आमच्या गावच्या गंज्यांना आगी लावून दिल्या जळलं मेलं ते गावाचं लक्षण, सगळे बाप्ये मेले नामर्द मुंबैकर वाणीन काकू गावकीत भावनाभरात बोलून गेल्या वाणीन काकूंच्या या बोलण्याचा गावकर्‍यांना खुपच राग आला गाववाल्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार मुंबैकरांस कुणी दिला बिर्‍हाड गावी असणार्‍या चाकरमान्यांचं बोलणंही एकवेळ योग्य मुंबैचं राशन कार्ड काढून मुंबैकर झालेल्यांनी बो

पती पत्नी और वो आणि लॉंग ड्राइव्ह ....

लेखक विश्वेश यांनी रविवार, 24/07/2011 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
हा एक स्वानुभवाचा केलेला कल्पनाविष्कार आणि कल्पनाविस्तार आहे ... याचा कुठल्याही हयात व्यक्तीशी संबंध आढळल्यास मी तुमच्या दुख्खात सहभागी आहे आणि देव तुमचे भले करो .... "डाडू ..... मला डाडू पाहिजे ....भ्या ssssss" मी जरा पान घ्यायला गाडीतून खाली उतरलो आणि मागून आमचे चिरंजीव ओरडले .... झाले ... कधी नव्हे तो आज बायकोने हट्ट केला कि "लॉंग ड्राइव्ह ला जाऊ, पान खाऊ" शेवटी आला माझ्या मागे .... तिथे पान टपरी वर ... प्रत्येक गोष्टीकडे बोट करून ... "हे काय आहे ? हे कोण आहे ? हे काका शी शी आहेत का ? हे असं का बर करतात ?" असे न संपणारे प्रश्न सुरु झाले ... "भाऊ, लहान पोराला कशाला टपरी वर आणता ...

आसूड

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 23/07/2011 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
नाही भय लाज सारे सत्तातूर देशाचा विचार कवडीमोल लोभालोभ सारा सत्तेचिये पायी आपापल्या सोयी लाघव भावे आज वाटे त्यांसी ब्रम्हांड ठेंगणे टेकीता ढुंगणे खुर्चीवरी सुखाचिया राशी त्यांच्यांच पायाशी मग जनतेशी काय पुसावे? मतीमंद झाला आज बुद्धीवंत नाही बलवंत कोणीच येथे उठ माझ्या लेका आता नको चुका नाहीतर भिका मागशील हातामध्ये घेरे सत्तेचा आसुड भडव्यांच्या ओढ पाठीवरी हिच माझी इच्छा पुरी कर बाबा देशाचा या ताबा तुझे हाती ..!!!

4 GB पेनड्राइव आणि रक्तदान

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 23/07/2011 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्यातच काही संस्था संघटनांनी एका राजकीय नेत्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सहभागी झालेल्या रक्तदात्यांना 4GB पेनड्राइव देखील भेट देण्यात आला. 4 GB पेनड्राइव देऊन रक्तदात्यांप्रती आयोजकांनी जी कॄतज्ञता दाखवली आहे तिचे खरोखरच करावे तितके कौतुक कमी आहे. आपल्याही अशाच भावना असतील असे वाटते. धन्यवाद !

चित्रपटातील बहुतेक गाणी

लेखक सुनिल पाटकर यांनी शनिवार, 23/07/2011 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटातील बहुतेक गाणी थोड्या फार फरकाने सारखीच असतात.शब्दांची जागा बदलून अनेक गाणी लिहिली जातात पण त्यांचे अर्थ सारखेच असतात.आता हे गाने पहा शिशा हो या दिल हो आखिर टूट जाता है,,,,,आणि हे गाने पहा दिल दिल है कोई शिशा तो नही ईक ठेस लगी और टूट गया आहे कि नाही गंमत .तुम्हाला आठवतात का अशी गाणी ?

सृष्टीविज्ञान मासिक. ८५ वर्षे पूर्ण. हा १००० वा अंक

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 23/07/2011 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, हे आवाहन जर कोणाला इ-मेल ने आले असेल किंवा मिपाच्या धोरणात बसत नसेल तर उडवायला माझी अजिबात हरकत नाही. खाली दिलेल्या मासिकाला आज ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत यासाठी ते अभिनंदनास पात्र आहे. आपण सर्वजण त्यांचे अभिनंदन आणि आभारही मानूयात. या मासिकाचे संस्थापक श्री. गो.रा. परांजपे आपल्याला माहीत असतीलच. त्यांनी आकाशातल्या ग्रह तार्‍यांबद्दल जे पूस्तक लिहीले आहे तेच हे थोर गृहस्त. मराठीत एवढी वर्षे विज्ञानाला वाहिलेले मासिक चालवायचे सोपे नसावे. आपण सर्वांनी याची वर्गणी ( वा्र्षिक रु.

माझी बाग.

लेखक ज्योति प्रकाश यांनी शनिवार, 23/07/2011 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागात काही फुले बघीतली.बागेत काही न फुलणारी पण बागेची शोभा वाढवणारीही झाडे असतात. आज त्या झाडाबद्द्ल थोडे. १)विविध प्रकारचे क्रोटन.

दोन कविता ... श्री. महानोर

लेखक शरद यांनी शनिवार, 23/07/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
दोन कविता .. श्री. महानोर. आज श्री महानोर यांच्या दोन कविता एकदम घेत आहे. एक कवी म्हणून ही निवड नव्हे तर एकच कवी दोन निरनिराळ्या व्यथा कशा उलगडवून सांगतो ते पहाण्याकरिता. पहिली व्यथा आहे एका खेडेगावातल्या मध्यमवयीन स्त्रीची. दुसरी आहे वृद्ध आईवडिलांची; ते खेडेगावातील असतील वा शहरातील, भारतातील वा अन्य कुठल्याही देशातील. या दृष्टीने दुसरी कविता/व्यथा जास्त व्यापक, जागतीक आहे असे प्रथमदर्शनी वाटते. पण ते खरे आहे कां ? ते तर बघूच.

स्लेजिंग झिंदाबाद

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 23/07/2011 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वाईट गोष्टीची सुरुवात चांगाल्यातुन होते म्हणे. उदाहरणार्थ माफिया. माफिया सुरुवातीला शेतकर्यांची संघटना होती. असहाय्य, लुबाडल्या जाणार्या शेतकर्यांनी आपल्या बांधवांच्या हितरक्षणासाठी आणि संरक्षणासाठी सुरुवातीला हत्यार हातात घेतले आणि मग रक्ताची चटक लागलेल्या बाघाप्रमाणे हळुहळु ही प्रामाणिक संघटना गुन्हेगारीकडे वळली. मूळ उद्देश विसरला गेला आणि लोकांना लुटणे हा धर्म बनला. स्लेजिंगचे थोडेफार असेच झाले. सुरुवातीला हा खेळ खेळीमेळीच्या वातावरणातच पार पाडायचा. नंतर स्लेजिंगच्या राक्षसाने उग्र रुप धारण केले. आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे.