Skip to main content

पती पत्नी और वो आणि लॉंग ड्राइव्ह ....

पती पत्नी और वो आणि लॉंग ड्राइव्ह ....

Published on 24/07/2011 - 00:01 प्रकाशित मुखपृष्ठ
हा एक स्वानुभवाचा केलेला कल्पनाविष्कार आणि कल्पनाविस्तार आहे ... याचा कुठल्याही हयात व्यक्तीशी संबंध आढळल्यास मी तुमच्या दुख्खात सहभागी आहे आणि देव तुमचे भले करो .... "डाडू ..... मला डाडू पाहिजे ....भ्या ssssss" मी जरा पान घ्यायला गाडीतून खाली उतरलो आणि मागून आमचे चिरंजीव ओरडले .... झाले ... कधी नव्हे तो आज बायकोने हट्ट केला कि "लॉंग ड्राइव्ह ला जाऊ, पान खाऊ" शेवटी आला माझ्या मागे .... तिथे पान टपरी वर ... प्रत्येक गोष्टीकडे बोट करून ... "हे काय आहे ? हे कोण आहे ? हे काका शी शी आहेत का ? हे असं का बर करतात ?" असे न संपणारे प्रश्न सुरु झाले ... "भाऊ, लहान पोराला कशाला टपरी वर आणता ... आत्ता पासून सवय लावता कि काय ... काय राव तुम्ही पण ...", नेहमीच्या पानवाल्याने असा फालुदा केला ... आता तू दिलेले पान काय रंगणार ... श्या ! त्या नेहमीच्या झक्कास पानाला आज कडू लिंबाची चव लागली ... बर कार्ट्याने मस्त चेरी चा तोबरा भरला होता आणि जोर जोरात मी पान खाल्ले मी पान खाल्ले असा उदो उदो चालू होता ... आजू बाजूच्या लोकांच्या त्या घृणौतुक नजरा चोरत मी पटकन गाडीत शिरलो आणि गाडी भरधाव वेगाने पिटाळंण्यास सुरुवात केली. थोडे पुढे गेल्यावर पहिले तर चिरंजीव पुन्हा स्वतामध्ये गुंगले होते आणि बडबडगीते चालू होती ... "जिलेबी बाई कि काय ..." चला हा मौका साधून बायकोच्या तोंडात पान भरवावे म्हणून गाडीचा गेयर बदलला ... अलगद पानाची पुडी उघडली ... आणि पान भरवणार तितक्यात माझ्या बायकोला मागे टाकून तिच्यातली आई संचारली आणि म्हणाली ... "माझ्या पिल्लुने खाल्ले का पान? अजून पाहिजे ?" असे म्हणून माझ्या हातातून जवळ जवळ हिसकावून घेतले पान ... एक तुकडा पोराला भरवला आणि उरलेले स्वत खाल्ले ... झाल हा चान्स पण गेला. माफ करा पण अश्या रागारागात ते पान गुंडाळलेले कागद मी रस्त्यावर फेकतो हो ... एरवी ओला कचरा आणि सुका कचरा अगदी नेमून दिलेल्या बादलीत असतो ... पण तुमचा असा कचरा झाल्यावर .... काही गप्पा माराव्यात निवांत म्हणून कुठलाही विषय काढला ... कि त्यातले नको ते शब्द बरोबर पकडून ... "मम्मी ... कहर म्हणजे काय ? मम्मी ... च्यामारी म्हणजे काय ? डाडू अवसान म्हणजे काय ? ..." अरे देवा ! आमच्या कडे एक भली मोठी यादी आहे "कोणते शब्द कार्टे जागे असताना बोलायचे नाहीत" ह्याची !! ती यादी इथे देणे केवळ अशक्य आहे कारण ती अजून evolving आहे .... (कहर, आवरा, च्यायला, मायला तत्सम सगळे शब्द, जाब, जबाबदारी, कर्तव्य, सासू, सासरे, छळ, पळ, मळ इत्यादी इत्यादी ...), बायकोने एक नेहमीचा इशारा केला .... म्हणजे चला आता हे कार्ट झोपेपर्यंत वेळ, इंधन आणि इच्छा सगळे जाळत फिरत राहा ... च्यामारी लॉंग ड्राइव्ह ... !!
लेखनप्रकार

याद्या 4503
प्रतिक्रिया 24

फुकट ईंधन जाळण्यापरीस लोन्ग वॉक ला जा !!! पोरगा गप घरी बसेल....

वाचताना मजा आली...मस्त मस्त...अजून लीहा.

पोरं रोमान्सच्या रंगाचा भंग कसा करतात हा मस्त विषय आहे. या लेखाचं पान झ्याक रंगणार असं वाटेवाटेतो संपलं. अजून लिहा.

In reply to by राजेश घासकडवी

>>>>पोरं रोमान्सच्या रंगाचा भंग कसा करतात हा मस्त विषय आहे. या लेखाचं पान झ्याक रंगणार असं वाटेवाटेतो संपलं. अजून लिहा. असेच म्हणतो. पोरं सोरं न कळत्या वयाची असतात तो पर्यंत सालं बरं असतं. पण एकदा का पोर-सोरं कळत्या वयाची झाली की, आपल्या 'स्पेशल' अशा 'आनंदाच्या' गोष्टींना मर्यादा घालाव्या लागतात असे वाटते. बाय द वे, अमेरिकेत कसं असतं ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोरं सोरं न कळत्या वयाची असतात तो पर्यंत सालं बरं असतं. पण एकदा का पोर-सोरं कळत्या वयाची झाली की, आपल्या 'स्पेशल' अशा 'आनंदाच्या' गोष्टींना मर्यादा घालाव्या लागतात असे वाटते. अगदि अगदि. बाय द वे, अमेरिकेत कसं असतं ? अमेरिकेत पान खात नाहित व खाऊन रस्त्यावर पचापच थुंकत नाहीत... असे वाचल्याचे स्मरते. ;) अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

>>>> अमेरिकेत पान खात नाहित व खाऊन रस्त्यावर पचापच थुंकत नाहीत अमेरिकेचं कौतुक राहूद्या तुमच्या जवळ. :) -दिलीप बिरुटे (देशस्थ)

कुरमुरा शिस्टीम माहीत असलेल्यांना असे त्रास होत नाहीत.

मस्त !! -------------------------------------------------------------------------------- रोगावर ईलाज करण्यापेक्शा रोग होउ नये म्हणुन ईलाज करा !! (फुकट्चा सल्ला) -------------------------------------------------------------------------------

पोरं नको त्या वेळेला झोपेतून उठली तर तुम्ही काय करता ?

पुढच्या वेळेस हात आखडता घेणार नाही म्ह्मंजे, पोराच्या कानाखाली एक ठेवुन देता का काय, नको नको असं नका करु, त्याच्या पुढच्या वेळेला एकट्यालाच लांग ड्राईव ला जावं लागेल. मस्त लिहिलं आहेस रे.

लैभरी.कॉम
पान भरवणार तितक्यात माझ्या बायकोला मागे टाकून तिच्यातली आई संचारली
:~ :* - (नेहमी आई संचारणारी बायको असणारा) सोकाजी

(नेहमी आई संचारणारी बायको असणारा)