(एकांत....)
... पोरांनी पार धुडगुस घातला होता. येणार येणार म्हणून आम्ही पोरं ज्या मोठया विकांताची वाट पाहत होतो, तो विकांत एकदाचा आला होता. मी, चिंटू, अम्या, रव्या, जग्या आणि सम्या अशी सहा टाळकी केव्हाच ब्यागा भरून तयार होती. एंटरप्राईजमध्ये जीएमसी युकॉन बुक करुन झाली होती. गाडी कसली म्हणा, एक अजस्त्र धुडच होतं ते. अंगात नुसती सुरसुरी भरली होती. साहजिकच होतं म्हणा. कारण आम्ही सारे लाँग विकेंडला डिझ्नेलँडला जाणार होतो.
यथावकाश ती शुक्रवारची संध्याकाळ आली. आणि आमचा लॉस एंजेलिसच्या दिशेने प्रवास सुरु झाला. सम्या व्हीलवर बसला होता. आधीच सम्याला वेगाचं भयानक वेड त्यात हातात युकॉनचं व्हील. मग काय विचारता.
मिसळपाव