Skip to main content

खजुराचे लाडू

लेखक जागु यांनी गुरुवार, 18/08/2011 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः अर्धा किलो सिडलेस खजुर किंवा आख्या खजुराच्या बिया काढून दिड ते दोन वाट्या सुक्या खोबर्‍याचा किस. ५० ग्रॅम बदाम २ छोटे चमचे खसखस ३ चमचे तुप पाककृती: खजुराचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या. बदाम कापुन घ्या.

नानेघाटाचा पायथा.(फोटो दिसतात आता. :) )

लेखक शैलेन्द्र यांनी बुधवार, 17/08/2011 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात कुठे फारसं भटकण झालच नव्हतं, खरतर वेळाही नाहीये सध्या, पण बाहेर पाउस पडत असताना घरात बसुन रहायचं म्हणजे जरा अत्याचारच वाटतात स्वतःवर, सह्ज म्हणुन शुक्रवारी रात्री जुन्या मित्राला, जयंत भट्ला फोन केला. बोलता बोलता प्लॅन ठरला- सकाळी सहाला निघायचं, दोन वाजोस्तर परतु डोंबिवलीत.. जयंतला घेवुन सहाला निघायच हे जरा कठीणच होत, मी ५.४५ ला त्याला उठवायसाठी कॉल केला, फार अपेक्षा नव्हती पण फक्त ४५ मिनिट उशिरा म्हणजे, ६.४५ ला तो त्याची नवी मांझा घेवुन हजर झाला. गाडीत पेट्रोल भरुन कल्याण सोडता सोडता अर्धा तास गेला..

हे गणराज्य की धनराज्य?

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 17/08/2011 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
हे गणराज्य की धनराज्य? प्रजापतीही प्रगल्भ झाला, पक्व झाली जनशाही मतपेटीतून गेंडा जन्मला, धन्य झाली गणशाही...!! एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली - थैली नोटा कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा कोणी करिती लांगूलचालन, कोणी लोटांगण जाती भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती सदाचाराचा मुडदा पडतो, मदांध उन्मत्तशाही...!! डांबर खाती,सिमेंट खाती, जणू चरण्यासाठी सत्ता क्षणाक्षणाला टनाटनाने, वाढवीत नेती धनमत्ता किडूक-मिडूक दिल्या बिगर ना, कचेरी कार्यसिद्धा उद्दामाला दिवस सुगीचे, सत्याच्या माथी गुद्दा नेकी इमान पांचट झाले, भरात आली बलशाही ...!! विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतान

क्रांतीच हवी,मात्र

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 17/08/2011 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
(दै. कृषीवल मध्ये साप्ताहिक स्तंभ लिहितोय ..त्यातलाच हा या आठवड्याचा लेख ..स्वातंत्र्यदिवस, आण्णा आणि सारे वातावरण या सार्‍याच्या निमित्ताने .. ) ६४ वा स्वातंत्र्यदिन... जवळपास दिवसाला एक याप्रमाणे भ्रष्टाचाराचे एक-एक प्रकरण बाहेर येत आहे. गोळीबाराच्या बातम्या, राजकीय धुळवड, अतिप्रचंड महागाई, तुम्हा-आम्हा सामान्यांचे जीणेच हराम झालेले. दुर्दैवाने आज अशीच परिस्थिती आहे. अशात कोणीतरी झटकन म्हणून जातो, ‘आता क्रांतीच व्हायला हवी राव...’ बरोबर आहे ते. पातळी एवढी खालावली आहे सार्याचीच की, आता हे सगळं उलथवायला हवंच. खरंच गरज आहे क्रांतीची; पण कसल्या? अब्जावधी लोकांचा देश आपला.

वृद्ध मातापित्यांची समस्या

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 17/08/2011 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकत्र कुटुंबपद्धतीच्या घरांमधे वृद्धांचा प्रश्न फारसा त्रासदायक नव्हता. पणज्या, आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, मुलं, नातवंडं सगळीच मंडळी एका घरात रहायची. घरात अनेक माणसं असल्यामुळे वृद्धांना एकटेपणा काय ते माहित नव्हतं, घरातले कर्ते पुरूष पैसा कमावण्यासाठी घराबाहेर असायचे, स्त्रिया घर चालवण्याच्या (ज्याला आपण आता बॅकएंड किंवा पडद्याआडची कामं म्हणू शकतो) कामात गर्क असल्या तरी पोरांकडे लक्ष द्यायला आजी-आजोबा होतेच, अतिवृद्धांची काळजीही घरात घेतली जायची. औद्योगिकीकरणानंतर ही परिस्थिती झपाट्याने बदलत गेली.

वारी - सज्जनगड

लेखक स्पा यांनी बुधवार, 17/08/2011 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांपासून सज्जनगड ला जायचे मनात होते, पण योग जुळून येत नव्हता,योगिराणाकागदावर उतरल्यापासून तर हि इच्छा प्रबळ झाली, आता काही झाले तरी जायचेच, एकट जाव लागल तरी बेहत्तर. अशाच एका संध्याकाळी सूड शी याबद्दल बोललो, त्यानेही चक्क एका फटक्यात येण्याची तयारी दाखवली, धाग्यावर किसानाही येतो असे म्हणाला होता, त्याला फोन केला, तो हि यायला तयार झाला, मग फटाफट बाकी मिपाकर ट्रेकरमित्रांना बोलावण धाडल, पण नेमके सगळे कुठल्या न कुठल्या कामात अडकलेले होते, शेवटी आम्ही तिघच निघालो. ठाण्याहून सातारा पर्यंत बस च आरक्षण केल्या गेल होतंच :) रात्री १२ ची बस होती,

अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 17/08/2011 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट हे पुस्तक वाचलं. पाऊलो कोएलो यांच्या पुस्तकाचं जगभरात प्रचंड कौतुक झालेलं असून त्याच्या अनेक भाषांत कोट्यावधी प्रती विकल्या गेल्या आहेत (अशी माहिती सदर पुस्तकाच्या शेवटच्या पृष्ठावर होती). याचं अजिबात आश्चर्य नाही की अशी पुस्तकं लिहीली जातात. याचं देखील आश्चर्य नाही की अशी पुस्तकं छापली जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक अशी पुस्तकं पैसे (आणि त्याहून ही मुल्यवान असा वेळ) खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या या कादंबरीच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या कादंबरीच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला.