Skip to main content

अहो आण्णा ...

लेखक विश्वेश यांनी शनिवार, 20/08/2011 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
आण्णा, उपास करून करून एक होईल तुमची मान पाठ पिझ्झा खात उपोषण लाइव्ह बघाणार्यांशी तुमची गाठ ... फेसबुक वर लाईक करून तुम्हाला पाठींबा देणारी हि जमात निवडणुकीच्या लॉंग वीकएंडला पळते सहकुटुंब रानावनात ...

तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन- "मेड इन सिंगापूर"

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 20/08/2011 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १३ आणि १४ औगस्ट २०११ रोजी सिंगापुरात तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. त्या संमेलनात सादर केलेली ही माझी कथा. मोलकरीण- ही एक मोठ्ठी समस्या आहे असे जगातल्या सगळ्याच गृहिणींचे मत असते. समस्येचे नाव जरी तेच असले तरी, प्रत्येक ठिकाणची डोकेदुखी मात्र वेगवेगळी असते. सिंगापूरला मोलकरीणीला ’मेड’ म्हणतात. भारतातल्या सारख्या ह्या मेड्स दोन चार तासापुरत्या येऊन आपापली कामे करून जात नाहीत. तुमची मेड ही कुटुंबातलाच एक मेंबर होऊन तुमच्या घरात रहाते. ही गुणी-अवगुणी मेड मिळविणे जेवढे कठीण, तेवढेच झेपणे आणि संभाळणे देखील. जाऊ द्या झाले!

रानफुल

लेखक आनंदयात्री यांनी शनिवार, 20/08/2011 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
रानफुलाच्या पिवळसर पिंगट पाकळीला मी भुललो, तोच क्षण त्याचं अन माझं आयुष्य जोडणारा. मंतरलेल्या रानात रानफुल आणी मी, बघत होतो, प्रतिबिंबं, आमच्याच डोळ्यात तरारलेली. "तू आणि मी, आपण दोघं सारखेच !" उमलतो पण गंधाला पारखे. रानफुल सुखावलं .. रानफुल सुखावलं तेव्हा दिसली होती, माझ्याच प्रतिबिंबाची हलकी काळसर बेगडी किनार. रानफुलं रानातच उमलतात .. फुलतात .. असे म्हणत एकेदिवशी, मी परतलो .. जनरितीनुसार. जातांना फुल म्हणाले होते, सुकले तरी चालेल, पण ठेवशील ना मला डायरीत ? .. जनरितीनुसार ? - आनंदयात्री

अध्यात्मातून समाधीकडे : काय चाललय आजकाल ?

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 19/08/2011 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसात आपल्या सर्वांची खबर नाही म्हणून लिहित आहे सर्वांना कसे काय चालू आहे ? कोण कोण कुठे कुठे आहे ? सकाळपासून रात्रीपर्यंत काय करता. वेळ कसा घालवता, सगळं व्यवस्थित चालू आहे ना परवा एवढे कावला का होतात ? राणे भेटले होते परवा कांद्याचा भाव पुन्हा चढणार म्हणत होते पण या ७.२० च्या लोकलला आज काय झालं? आम्ही घरी कसं जायचं जाऊदे तूम्ही बोला, कसे आहात घरी बंटी, स्वीटी बरे आहेत ना ? पावसाळ्यापूर्वी नवे पत्रे घालून घ्या, गणपतीला कोकणात का... राजीव गांधी, नेहरू, अरुण नेहरू, वी पी सिन्घ, अझरूद्दीन, सारेगामापा लिल चेम्प. लाईफ बोय लुक्स निरमा.

सातवाहन आणि नाणेघाटातील शिलालेख. आता पूर्ण येथेच केला आहे.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 19/08/2011 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
नाणेघाटातला शिलालेख – आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्‍या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात.

शब्दांचे पारतंत्र्य

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 19/08/2011 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
अडकले शब्द अर्थांच्या साखळीत जीवन त्यांचे झाले तसे अर्थहीन नसून वजन तयांसी - वेढले अनर्थांनी जडले असे वादास - झाले पराधीन कुणी उचलले अर्थ - केले शब्दांचे शस्त्र जखम भरण्यास गेले आयुष्य - झाले अर्थहीन कुणी सडवले - न-वापरता - वाटे तयांसी हे धन अभाव भावनेचे - दोष कुणाचा - शब्द मात्र स्वातंत्र्यहीन!

हॅलो.....हॅलो.....

लेखक गजा गाजरे यांनी शुक्रवार, 19/08/2011 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो..आबा , अव किती येळ लावलाय फोन उचलायला" "अरॅ दादा होय , अर बार लावला व्ह्ता. तू आमच लेका सगळच बंद करुन टाकलस. मंग असं गुमान खाव लाग्तया" "आवो पन कुठ अहात तुम्ही ? " "काय लेका एका माग एक लचांड माग लाव्ता तुमी..पार डोक्याची मंडई झाली . म्हून येऊन बसलोय हिकड म्हाबळेश्वरला आपल्या फार्म हाउस वर" "काय आबा तुमी बी..एव्हढ मनाला लाउन घेताय.