Skip to main content

तू लिहिलेस नि मला सुचून गेले. ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 22/08/2011 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
[एका मित्राला सहज म्हणून डॉलरचा हिशेब पैशात सांगितला नि एका डॉलरमध्ये कमीत कमीत ३ किलो कांदे आले असते असे म्हणालो .नि येथे फक्त ३ कांदे आले. त्यावरून त्याने गमतीशीर पत्र लिहिले .त्यावरून खालील सुचले ] ह्या डॉलरच्या देशात रुपया चालत नाय आनंद घ्यायला पैसा लागत नाय . . मी एकडे तिकडे बघत चालतो पोरगाच खिशातून कार्ड काढतो काय करतो..? किती देतो..?
काव्यरस

विदुषक

लेखक अभिजीत राजवाडे यांनी सोमवार, 22/08/2011 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
बदल होतोय कित्येक दशक होत आहे अनुभवांचे लेणे आता विदुषक होत आहे. कळले हे कि "काळाचा महिमा अगाध", मद्याचा प्यालाही मानाचा चषक होत आहे आंधळ्या राजाची ही आंधळी प्रजा आहे चक्क मुकाही इथे उदघोषक होत आहे तिला हि सवय अन त्याला सवय आहे नजरेने ठार करणे बेलाशक होत आहे नम्र मांजरी माना झुकवत आहे आता घंटा गळ्यात बांधणारा मुषक होत आहे

पालक गोश्त

लेखक गणपा यांनी रविवार, 21/08/2011 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ मध्यम कांदे बारीक चिरलेले. २ जुड्या पालक बारीक चिरुन घेतलेला. ५०० ग्रॅम.

माहिती अधिकार कायदा : अण्णा

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 21/08/2011 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांच्या आंदोलानाच्या निमित्ताने काही चर्चा ऐकल्या आणि काही शंका मनात आल्या माहिती अधिकार कायदा काय आहे ? RTI Activist म्हणजे काय ? अण्णांना या कायद्याचे जनक म्हणतात ते का ? त्यांचे यामधे योगदान काय. दुसरी बात गेल्या आठवड्यात भोपाळला एका RTI Activist ची हत्या झाली मागील वर्षी पुण्यातही एकाची हत्या झाली असं काय आहे या कायद्यात की ज्याला एवढे घाबरावे ? माहिती मिळाली तर आनंद होइल टीप - ज्यांना माहिती असेल त्यांनीच इथे माहितीची भर घालावी बाकीच्यांनी इथे सकाळची कामे करू नयेत, ती इतरत्र उरकावीत)

राखेमधे लोळतो मी (हजल)

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 21/08/2011 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
राखेमधे लोळतो मी (हजल) मलिंदा मिळावा असे भाकतो मी जगावेगळे मागणे मागतो मी कशाला गडे रोज येतेस स्वप्नी? असा काय आमिर तुला वाटतो मी? जसे गुंग व्हावे नशीले पिताना तुला पाहताना तसा झिंगतो मी मला नेमक्या टाळती अप्सरा त्या बहूतेक त्यांना कवी भासतो मी! दिलेली फुले तू जमा खूप झाली अता गूळ, साखर, डबा शोधतो मी करा बंद कानात आकाशवाणी अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी समाजात चर्चेमधे राहण्याला अभय मस्त राखेमधे लोळतो मी                          गंगाधर मुटे -----------------------
काव्यरस

ज्यादा आकाराचे पोस्ट कसे करावेत?

लेखक विनीत संखे यांनी रविवार, 21/08/2011 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मी गेल्या काही दिवसांपासून "करण आणि फ्रेण्ड्स" ही कथा जनातलं मनातलं मध्ये पोस्ट करतोय. जेव्हा मी सुरूवातीला पोस्ट करायचा प्रयत्न केला तेव्हा मी ह्याचे "पूर्वार्ध" आणि "उत्तरार्ध" अशा दोन भागात मांडणी केली होती. पण नंतर कळले की मिपावर एक पोस्ट साठवताना काही शब्दमर्यादेपुढे सर्व्हर एरर देतो. वास्तविक ही सूचना "नवे ले़खन" पोस्ट करतानाच्या एडिटर वरच असायला हवी होती. कारण मिपाच्या एडिटरममध्ये तर सुरूवातीस माझी संपूर्ण कथा सुद्धा समावली होती. त्यामुळे मला वाटते की एका पोस्ट मध्ये कुठल्याही आकाराची कथा जाईल. पण तसे नाही आहे.