Skip to main content

"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा" आणि "चांदोबा"

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 27/08/2011 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा" हे विष्णुशास्त्री व कृष्णशास्त्री चिपळूणकर या पिता-पुत्रांनी (यातील वडील कोण व मुलगा कोण, हे विसरलो - कृपया सांगावे) अनुवादित केलेले पुस्तक माझ्या लहानपणी घरात होते. ते नेहमी वाचायचो. फारच अद्भुत वाटायच्या त्या गोष्टी. मुख्य म्हणजे त्या आवृतीत कुणा इंग्रज चित्रकाराची फार छान चित्रे होती.

पाऊसगोष्ट तुझी माझी

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 27/08/2011 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
तू मजसोबत येशील अशी शक्यता वाटत नव्हती. पण तू पटकन गाडीवर माझ्यामागे सावरून बसलीस. तेव्हा खरे तर माझ्या मनात कल्लोळ उठला होता. तुझं तसं मजसमीप असणं जगावेगळं वाटत होतं. त्यात मौसम ‘घन उतरू आलं...’ अशा झिम्मड पावसाचा. तुला कुठे सोडायचं हे ठरलं नव्हतं. मी तर थेट तुझ्या घरापर्यंत साथसोबत केली असती पण तुझ्या मनात ते जलतरंग होते कुठे? नव्हतेच. मीच आपला सप्तरंगी स्वप्नायुष्य भन्नाटवेगे पळवत चाललो होतो... रस्ते म्हणजे खड्डेच की. तू माझ्यावर मागून आदळली नाहीस असं होणार नव्हतं. तरीपण तुझाही तोल सावरीत मी बेताने गाडी घेतली आणि माझं ते संयत वागणं पाहून त्या वरच्या मसीहाला माझी दया आलीच.

....

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 27/08/2011 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
...

सही -

लेखक अभिजीत राजवाडे यांनी शनिवार, 27/08/2011 03:46 या दिवशी प्रकाशित केले.
तु काढलेल्या माझ्या चित्रांवर सही नको करु... मला त्या कॅनव्हास ला जखमी केल्यासारखे वाटते... तुला सही करण्याची गरज नाही... जर सही हि एकमेव असते तर, तु चित्र काढताना्च त्या चित्रावर तुझी सही झालेली असते... जर फारच वाटत असेल तर, रंगात बुडवलेला तुझा अंगठा लाव त्या चित्रावर... मी जपुन ठेवेन ते चित्र... आणि जेंव्हा केंव्हा तुझी आठवण येईल, तेंव्हा अलगद ठेवुन देईल माझा अंगठा, तुझ्या अंगठ्यावर...

कविता - आस्वाद

लेखक शुचि यांनी शनिवार, 27/08/2011 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
"कविता" हा माझा जीव की प्राण असा साहीत्यप्रकार आहे. कवितांमध्ये असलेली भावना चेतविण्याची क्षमता हाच पैलू नाही तर थोड्या शब्दांत खूप काही मांडण्याची आणि मनावर शाश्वत छाप सोडण्याची क्षमता हे कवितेचे अन्य पैलूदेखील अतिशय आकर्षक आहेत. अतिशय अर्थवाही असा हा साहीत्यप्रकार आपल्याला तर बुवा खूप आवडतो याचा अर्थ कळतोच असे नाही. वेड मात्र जबरदस्त आहे. मी आजवर वाचलेल्या सर्वोत्तम कवितांपैकी एका कवितेबद्दल हा धागा आहे.

...

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 27/08/2011 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
...

.

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 27/08/2011 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
.

मिसळपाव माझ्यासाठी

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 27/08/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक मिसळकरांना असे वाटते मिसळपाव ही माझ्यासाठी काय आहे ? यापेक्षा मिसळपाव काय नाही ! हे माझे घर आहे इथेच मुक्काम करावा हलूच नये, हे माझे अन्न आहे, ते खाल्ल्याशिवाय आमचे पोटच भरत नाही मिसळपाव काय आहे नेमके ---साध्य की साधन.... ? ?? काय आहे तुमच्यासाठी मिसळपाव म्हणजे ? काय दिलं मिसळीनी आम्हाला... -- ज्यांचे पोट ठीक आहे त्यांनीच रतीब घालावा बाकीच्यांनी १ दिवस विश्रांती घेतली तरी चालेल सगळ्यांना त्रास नको

जनलोकपाल बिल नापास झाल्यावर तुम्ही कुणाच्या नावाने बोटे मोडाल?

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 27/08/2011 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चेसाठी समजू या की तमाम विद्वान, "ठेविले अनंते तैसेची रहावे" ह्या वचनावर ठाम असणार्‍या विचारवंतांच्या रेट्यामुळे आणि निष्कलंक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने जनपाल बिल नापास झाले. सगळी मंडळी आपापल्या घरला गेली, अण्णा जिवंत असले तर राळेगणशिंदीला रवाना नाहीतर पंचत्त्वात विलीन झाले असे समजू . मला उत्सुकता आहे की पुढचा लाखो करोडोंचा भ्रष्टाचार उघडकीस येईल आणि परमपवित्र संसद आपल्या परमपूज्य सदस्यांच्या तोंडातून जेव्हा असे आश्वासन देईल की (नेहमीप्रमाणेच) चौकशी चालू आहे, निर्णय झाला तर आणि की शिक्षा होईलच. तेव्हा आपण कुणाच्या नावाने बोटे मोडाल? चर्चेच्या आधारासाठी काही मुद्दे १.