Skip to main content

सही -

सही -

Published on 27/08/2011 - 03:46 प्रकाशित मुखपृष्ठ
तु काढलेल्या माझ्या चित्रांवर सही नको करु... मला त्या कॅनव्हास ला जखमी केल्यासारखे वाटते... तुला सही करण्याची गरज नाही... जर सही हि एकमेव असते तर, तु चित्र काढताना्च त्या चित्रावर तुझी सही झालेली असते... जर फारच वाटत असेल तर, रंगात बुडवलेला तुझा अंगठा लाव त्या चित्रावर... मी जपुन ठेवेन ते चित्र... आणि जेंव्हा केंव्हा तुझी आठवण येईल, तेंव्हा अलगद ठेवुन देईल माझा अंगठा, तुझ्या अंगठ्यावर...
लेखनविषय:

याद्या 1283
प्रतिक्रिया 4