मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही क्षण टिपलेले... ४ पशु आणि पक्षी.

मदनबाण · · कलादालन
आई ला घट्ट कवटाळुन बसलेले पिल्लु. तुरेवाला बुलबुल... १ हा चिंटु कोण आहे ते माहित नाही,गवतात शांत बसुन होता. चला उन आले, जरा अंग शेकुन घेउ म्हणतो... ;) ह्म्म्म... ;) चहाच्या मळ्यात फिरण्याची मजा काही औरच असते... अशाच एका चहाच्या मळ्यात फिरताना, मला कसलासा पालापाचोळा चरण्या सारखा आवाज आला... पाहतो तर समोर हे महाराज उभे ! जरासा घाबरलो,पण मग हिंमत करुन अजुन पुढे जायचा निर्णय घेतला. मी जवळ येतोय हे पाहुन महाराज जरासे वैतागले असावेत...डोक वर करुन च्यामारी हिथ कोण तडमडले असा विचार "त्यांच्या" टाळक्यात आला असावा ! ;) मला भूक लागली आहे,आणि मी चरणारच ! :) हल्ली एकांत मिळणे मुश्किल झाले आहे ! जिथे तिथे ही माणसं येउन "रसभंग" करतात ! धड मनसोक्त चरुन सुद्धा देत नाहीत. ;) चला, टाईम अप. घरी लवकर जावे, नाही तर ! ;) तुरेवाला बुलबुल चहाच्या मळ्यात परत दिसला. :) मान डावीकडे वळवुन हळुच त्याने हवेतच उडणारा एक किडा चोचीत धरला. आता मान उजवीकडे फिरवली आणि मला एक मस्त पोझ दिली,ती देखील चोचीतल्या किड्या सकट. ;) (हौशी फोटुग्राफर) मदनबाण..... कॅमेरा :--- निकॉन पी-१०० ***फोटो फक्त रिसाईझ केले आहेत,सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही. ============================================================================ माझे मनोगत :--- जयंतकाकांचा मैत्र ! हा धागा पाहताना, मी हे वरचे क्षण टिपले होते ते आठवले.मोठ्या आकाराचे फोटो टाकण्याची इच्छा झाल्याने त्यांच्या धाग्यात हे फोटो न टाकता वेगळा धागा टाकला आहे.

वाचने 15991 वाचनखूण प्रतिक्रिया 24

प्रचेतस 27/08/2011 - 11:33
मस्त रे बाणा. सुरेख फोटू आले आहेत. केरळ मध्ये काढलेले फोटू आहेत का ?

अनंत छंदी 27/08/2011 - 12:14
त्या चरणार्‍या राजकीय पुढार्‍याचे फोटो फारच काढलेत;) पहिले मायलेकरू जास्त आवडले.

अत्रुप्त आत्मा 27/08/2011 - 15:51
त्या मायलेकरांच्या फोटोवरुन ह्याच ओळी अठवतात---''भय इथले संपत नाही..."

सहज 27/08/2011 - 18:46
काही क्षण बरा वेळ मिळाला.... :-)

27/08/2011 - 19:41
मस्त आहेत सर्व फोटू. आवडल्या गेल्या आहेत.( हल्ली मिपावर असंच लिहीतात म्हणे. )

स्पंदना 29/08/2011 - 06:49
हेअरकट भारी महाराजांचा !! वरच पिल्लु कस लटकलय आईला. छान फोटो अन जयंत काकांचा धागा हाय्जॅक न करता नविन काढाय्ची कल्पना (सज्जन कल्पना) आवडली.

मदनबाण 29/08/2011 - 20:31
मृत्युन्जय तुमचे फोटो देखील फार सुंदर आहेत... :) मुख्य म्हणजे त्याच्यावर तुम्ही तुमची सही उमटवली नाही हे फार बरं झाल. ;) ज्या प्रमाणे एखाद्या सौदर्यवतीच्या गालावरील तिळ किंवा सहज हास्य करताना तिच्या गालावरची खळी लगेच नजरेस पडते, तसेच फोटो पाहताना त्याच्यावर उमटवलेली सही माझ्या नजरेत येते. ;) जाता जाता :--- जर तुम्ही व्यावसायिक फायद्यासाठी फोटो काढत नसाल तर त्या फोटोंवर स्वत:ची सही उमटवु नये या मताचा मी आहे.च्यामारी इतकी महिनत घेउन फोटु काढायचा आणि त्याच्यावर स्वतःच्या नावाचा ओरखडा का उमटवायचा ! ज्याला वापरायचा असेल त्याला वापरु द्या की... स्वतःच्याच धाग्यावर अवांतर :--- इजिप्तचे राजे मोठ मोठे पिरामिड उभारुन गेले, स्वतःचे प्रेत परलोकीच्या प्रवासाठी रहावे म्हणुन नीट जतन करुन ठेवले ! काय फायदा झाला ? त्यांच्या ममीजची पावडर करुन औषध म्हणुन विकण्यात आले होते ! ;) ( आता सांगा मला कसा करेल तो ममी परलोकची यात्रा ? ;) ) थोडक्यात :--- गीता सार :--- तुम्ही काय घेउन आला होतात, जे तुम्ही तुमच्या बरोबर परत घेउन जाणार आहात ? माझा नेहमीचाच फंडा :--- स्वतः आनंद घ्या,अन् दुसर्‍याला तो आनंद घेउ द्या.;) परत सर्व प्रतिसादकांचे आभार मानुन मी माझे ४ शब्द इथेच आटोपते घेतो. ;)

In reply to by मदनबाण

पाषाणभेद 30/08/2011 - 05:49
बाणा एकदम मनातलं बोलला बघ. तुम्हा दोघांचे फोटो मस्त आहेत. अन तुझी खालची अस्टेरीक मला नेहमी आवडते. ***फोटो फक्त रिसाईझ केले आहेत,सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही.