Skip to main content

साद रामेश्वरमची .... - भाग १

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 30/08/2011 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
साद रामेश्वरमची .... - भाग १
"शशिकांतजी आप को हमारे साथ रामेश्वरम आना है।"
असा हुकूम वजा आदेश मला फोनवरून आला व मी तात्काळ होकार कळवला. झाले. मी कामाला लागलो. तोवर हवाई प्रवासाची तिकीटे आली. मधल्याकाळात मला महर्षीं अत्रींच्या जीव नाडीत सांगण्यात आले, "तुला सांगून अजूनही अमुक अमुक ते सोपस्कार तू केलेले नाहीस.

माळशेज सहलीसाठी सल्ला हवा आहे -

लेखक कौन्तेय यांनी मंगळवार, 30/08/2011 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
२४ - २५ सप्टें.चं माळशेज घाट एम टी डी सी चं आरक्षण केलंय. घरच्या गाडीने बायको, दोन मुलं नि बाबांसोबत जायचं आहे. २४ला शनिवार दुपार पावेतो खोलीत सामान घुसवणे, दुपार संध्याकाळ आजूबाजूला टीपी करणे; दुसऱ्या दिवशी २५ सप्टें.ला दिवसभरात शिवनेरी आदि पुण्यस्थळदर्शन नि २६ सप्टें.ला सकाळी सकाळी मुंबई प्रस्थान असा कार्यक्रम आहे. मुलं वयवर्षे अनुक्रमे ४ नि ८. डोंगर बिंगर चढायला अडचण नाय (जानेवारीत रायगड, कर्नाळा झालेलंय). माळशेज-अनुभवी मिपाकरांकडून पुढील सल्ल्याची प्रार्थना आहे - १. मपविम.च्या निवासस्थानाची एकूण व्यवस्था कशी आहे, जेवण इ. संबंधी काही टिपा. २. शनि. दुपार / संध्याकाळ मोकळीच आहे.

'ओपनहायमर' पुस्तक प्रकाशन

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 30/08/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
आण्विक शस्त्रास्त्रांविषयीच्या मतांमुळे अमेरिकन सरकारच्या रोषाचा धनी ठरलेला सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ओपनहायमर याच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक पुस्तकाचं आज संध्याकाळी पुण्यात प्रकाशन होणार आहे. लेखिका: माणिक कोतवाल (यांनी पूर्वी गॅलिलिओवरही चरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं आहे.) प्रकाशकः राजहंस प्रकाशन, पुणे स्थळः एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक वेळः सं. ५:३० वा. अध्यक्षः अच्युत गोडबोले उपस्थिती: डॉ. शंकरराव गोवारीकर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. ओपनहायमरविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

'ओपनहायमर' पुस्तक प्रकाशन

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 30/08/2011 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
आण्विक शस्त्रास्त्रांविषयीच्या मतांमुळे अमेरिकन सरकारच्या रोषाचा धनी ठरलेला सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ओपनहायमर याच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक पुस्तकाचं आज संध्याकाळी पुण्यात प्रकाशन होणार आहे. लेखिका: माणिक कोतवाल (यांनी पूर्वी गॅलिलिओवरही चरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं आहे.) प्रकाशकः राजहंस प्रकाशन, पुणे स्थळः एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक वेळः सं. ५:३० वा. अध्यक्षः अच्युत गोडबोले उपस्थिती: डॉ. शंकरराव गोवारीकर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. ओपनहायमरविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

मासे ३२) पापलेट

लेखक जागु यांनी मंगळवार, 30/08/2011 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पापलेट हळद मसाला मिठ आल-लसुण्-मिरची-कोथिंबीर वाटण (ऑप्शनल) तळण्यासाठी तेल पाककृती: ताजे पापलेट ओळखण्यासाठी ते कडक आहेत का बघा. तसेच त्यांच्यावर सुरकुत्या पडलेल्या नसल्या पाहीजेत. पापलेट जर अगदीच मोठे असतील तर त्याच्या तुकड्या करुन घ्या. मिडीयम असतील आणि कमी जणांसाठी हवे असतील तर पापलेटचे शेपुट, बाजूची परे कापा.

पराठे वाला कट्टा

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 30/08/2011 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
एका तहात दुस-या तहाची बीजं असतात असं म्हणलं जातं,तसंच होतं, एका कट्ट्यालाच पुढच्या कट्ट्याच्या ठिकाण ठरवलं जातं, राहते ते फक्त दिवस आणि वेळ ठरवणं. २९ जुलैच्या कट्ट्यातच दोन ठिकाणांवर चर्चा झाल्या होत्या, एक दिल्ली किचन (प्रस्तावक-श्री.वपाडाव) आणि दुसरं शाजीज पराठा हाउस. व्यनि, फोन, एसेमेस इत्यादीच वापर मुबलक वापर करुन २७ ला संध्याकाळी शाजीज पराठा हाउस इथं जमायचं ठरलं,कट्ट्याला काहीतरी वेगळं करायचं होतं,दोन गोष्टी होत्या एक या हाटेलातलं च्यालेंज आणि दुसरी श्री.

() हजामांना मार्गदर्शन करता येईल का? ()

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 30/08/2011 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
हे वाड्मयचौर्य नाही, फारतर कल्पना आणि शब्द उधारीवर आणले आहेत. कुठून? करा थोडं खोदकाम. सर्वच छोट्या मोठ्या शहरखेड्यांत हजाम अस्तित्वात आहेत. वेळोवेळी नवीन हजाम आपापली दुकानेदेखील उघडतात. (त्यातल्या काहींचा हजामपणाचा धंदा बसला. काहींनी वयोपरत्वे राजीनामा दिला. काहींनी तर पुन्हापुन्हा राजीनामा दिलेला आहे. तर काही दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. काही हजामांच्या मते आपण त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिल्लक असलेल्या) सर्वच हजामांना बिनपाण्याने सफाई करण्याची इच्छा असते.