दोन प्रश्न - शरद पवार आणि बालाजी तांबे.
दोन प्रश्न -
१) शरद पवार हे कधी चेंडू-फळी हा खेळ खेळले आहेत काय? आमच्या माहितीप्रमाणे ते अधिकृतपणे (रणजी, एक दिवसीय, २०-२० वगैरे सारखे सामने) कुठल्याही सामन्यात खेळलेले नाहीत. मग त्यांच्याकडे बी सी सी आय च्या अध्यक्षासारखे महत्त्वाचे पद कसे आले? आपल्यापैकी कुणाला या संदर्भात काही टिप्पणी करायची असल्यास स्वागत आहे.
२) बालाजी तांबे यांच्याकडे नक्की कुठली वैद्यकीय पदवी (अॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपथी, युनानी वगैरे) आहे? आमच्या माहितीप्रमाणे अशी कुठलीही अधिकृत पदवी त्यांच्याकडे नाही. इथे या बद्दल कुणाला काही माहिती असल्यास कृपया खुलासा करावा.
कॉमॅ.
केळीचे उपजे
साहित्य:
पिकलेलं केळं - १, भरड दळलेला तांदूळ किंवा तांदुळाची कणी - १/२ वाटी, दलिया - १/२ वाटी, दाण्याचं कूट - ३-४ चहाचे चमचे, नारळाचा चव - १/४ वाटी, केळीचं पान, मिरची - १ किंवा चवीनुसार, कढीपत्ता - १०-२० पाने, लिंबू १/२, तेल - १/४ वाटी, पाणी, मोहोरी, जिरे, हळद, हिंग, मीठ
कृती:
१. तांदुळाची कणी, दलिया आणि दाण्याचं कूट एकत्र करून पाण्याने धुवावे. पाणी निथळून घेतल्यावर मिश्रण एका भांड्यात झाकून ठेवावे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालून पुन्हा एकत्र करून ठेवावे. ५-६ तास भिजवणे शक्य नसल्यास पाणी निथळून घेतलेल्या मिश्रणात सुरुवातीलाच मीठ, लिंबूरस घालून तासभर झाकून ठेवावे.
२.
मोक्ष
आज मोक्ष मिळायला हवाच... उगीच ह्या मृगजळात अडकलोय... दरदिवशीची कटकट, साडेसातची लोकल, ऒफिसचा ऊशीर, मोठ्या साहेबांचं तणतणणं. घरी गेल्यावर मुलांच्या मागण्या, सौ ची कैफियत. आज हे महाग तर उद्या ते. छ्या किती सहन करायचं? किडामुंगीशी जवळीक साधायची ती अशी?
एवढं राब राब राबून विरंगुळ्याचे क्षणच दुर्मिळ झालेत ... मोबाईलच्या रेडियोवर एकशेसातवर जाऊन जुनं मदन मोहन ऎकावं... आयुष्य सार्थकी लागावं असं काहीतरी... तो तर गेला त्याच्या स्वरलता सोडून... पण आम्ही काय सोडलं? आमचं नाव? की आडनाव? आमची सौ की ती पिल्लावळ? ...
'शांताराम' नावाचे गारूड !
"I was a revolutionary who lost his ideals in heroin,
a philosopher who lost his integrity in crime,
and a poet who lost his soul in a maximum security prison."
-Lin.
कुठल्याही चांगल्या पुस्तकाचा एक असा निकष असतो की ते वाचून संपवल्यावर तुम्हाला कुठेतरी थकवा जाणवला पाहिजे. तुमच्यातून अचानक काहीतरी कमी झाल्याचे रितेपण जाणवले पाहिजे.
पावसाचा दरोडा
पावसाचा दरोडा
आला सोसाट्याचा वारा
उठलं धुळीचं रिंगण
झाडझाडोरे हालता
गेल सारं रान पिंजून ||
बांधावर आम्ही उभे
आधार एकमेकांना दोघे
तवाच ढग आले दाटून
गेलं आभाळ फाटून ||
थेंब पावसाचे मोठे द्वाड
अंगावर बसे वादीचा चाबूक
जवा पाहिजे तवा नाही
जवा नको तवा यायची खोड ||
विजा चमकून भिती घालती
काही आगाव भुईला टेकती
वंगाळ भिती मनाला खायी
जिवासाठी आसरा शोधू पाही ||
उघडा सारा रानमाळ
नव्हतं कुणाचं छप्पर
ठिपक्यावानी झाड लिंबांच
सावली देत उभं र्हातं ||
तेवढा तोच आधार
तेचा आडोसा घेतला
त्याखाली वल्ले होतो
थेंब जोराचे चुकवत ||
एकाएकी आक्रीत झालं
सन्नकन आला
काव्यरस
पाटेश्वर - अजुन एक शाक्तपंथीय देवस्थान.
श्रावणाच्या पहिल्या रविवारी भुलेश्वर ते शेवटच्या रविवारी पाटेश्वर असा शाक्तपंथीय शिवालयांचा प्रवास घडला, भुलेश्वराचे फोटो आधीच टाकलेत म्हणुन हे पाटेश्वराचे.
आला आला रे आला महिना भादवा
आला आला रे आला महिना भादवा
आला आला रे आला महिना भादवा
वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ ||धृ||
श्रावणात घडले फार उपास,
हड्डी नळीसाठी केले नवस खास
पुर्ण जेवणाने उपास आता रे सोडवा
आला आला रे आला महिना भादवा ||१||
गल्ली गल्लीत आपण आता फिरू
टोळी टोळीने एकत्र खेळ खेळू
मोत्या, टिप्याला
कुणीतरी राणी, डॉली भेटवा
आला आला रे आला महिना भादवा ||२||
सरला आता सारा पावसाळा
सुरू झालाय गुलाबी हिवाळा
मस्त थंडीतच वाढतो गोडवा
आला आला रे आला महिना भादवा ||३||
लाज बाळगू नका दिवसा उजेडाची
सुरू व्हा रे सारे वेळ आहे रात्रीची
नव्य
क्षण एक पुरे जगण्यास खरा
क्षण एक पुरे जगण्यास खरा
जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा
लपवून व्यथा रडतोय मनी
दिसतोच सदा मुखडा हसरा
जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा
मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा
श्रमतो, दमतो, शिणतो पुरता
परिहार जणू जुळता नजरा
दिसतात इथे जन सज्जन हे
अपुलाच स्वभाव नसेल बरा
रुळताच मनी भलतेसलते
पुसतात कशास हवा नवरा
वरदान मिळो "अभया"त जगा
दररोज घरात जणू दसरा
- गंगाधर मुटे
----------------------------------
वृत्त :तोटक
फेसबुक आणि मास्लोची चढती भाजणी
नीलीमा चहाचा कप खाली ठेवत पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारती झाली - "पण शुचि मला एक कळत नाही तुला जिम आहे, पुस्तकं आहेत,रुममेट आहेत मग फेसबुकची गरजच काय?"
माझ्या प्रश्नार्थक चेहेर्याकडे पाहून ती उत्तरली "अगं म्हणजे "किलींग टाईम इज नॉट अ प्रॉब्लेम."
यावर परत परत तक्रार काय करायची म्हणून मी अचूक भावनिक मुद्दा शोधू लागले - "हे बघ नीलू" मीदेखील चहाचा घुटका घेत म्हटले "प्रत्येक मित्र-मैत्रिणीचे माझ्या आयुष्यात काही एक स्थान आहे. काही जणांच्या कमेंट्स तर काही जणांनी टाकलेले व्हिडीओ तर काही जणांची विचारपूस मला ताजीतवानी करते, रोज नव्या दिवसाला सामोरी जायची उभारी देते.
मिसळपाव