खादाडांसाठी कुपोषितांचे रक्तदान
जागतिक अर्थव्यवस्था आज एका ऐतिहासिक वळणावर उभी आहे. युरोपातल्या सगळ्या देशांची एकत्र मोट करून एकच चलन असलेली एकत्रित अर्थव्यवस्था त्यातल्या अंतर्भूत दोषांमुळे टेकीला आली आहे. युरोपातल्या जर्मनीसारख्या देशांची स्वतःची परिस्थिती बरी असली तरी ग्रीस, स्पेन आणि इटली या दिवाळखोरांच्या धोंडी गळ्यात बांधल्या गेल्याने भलेभले देशही बुडायला लागले आहेत.
"युरोप बुडतोय आणि स्वतःबरोबर जगातल्या दोन सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था घेऊन बुडतोय" यावर सगळ्यांचंच एकमत झालंय. या दोन सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था म्हणजे अर्थातच अमेरिका आणि चीन.
मिसळपाव