Skip to main content

निधर्मी देशात ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 17/10/2011 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या निधर्मी देशात धर्माचे अड्डे खूप आहेत शंभर कोटीच्या देशात देवळे भरपूर नि देवपण महामूर आहेत महाराज अगणित प्रत्येकाचे तंबू मस्त आहेत भक्त खेचण्यास जो तो आपला आपला तरबेज आहे महाराज होण्यास शिक्षण नको फक्त तरबेज अशी जीभ हवी नजरेत लगामाची ताकद नागासारखी तेज हवी जाती भरपूर नि जातीत सुद्धा पोटजाती सगळेच गणित अवघड आहे सुटता सुटत नाही असे हे सगळे अवघड आहे ह्या निधर्मी देशात धर्माचे अड्डे खूप आहेत देव धर्म कर्मकांड येथे खूप आहे जो तो दलालाला दक्षिणा देऊन देवाला पटवतो आहे देव बिचारा गप्प आपलाच आपल्यात मग्न आहे ह्या निधर्मी देशात धर्माचे अड्डे खूप आहेत एवढे धार्मिक असून सुद

छंदपिसाट

लेखक रम्या यांनी रविवार, 16/10/2011 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
पाचवी सहावीला असताना भुगोलाच्या पुस्तकातील शेवटचा पाठ खगोलशास्त्राचा असे. त्यामध्ये आकाशातील ग्रह तारे यातला फरक कसा ओळखावा, गुरू, शनी यांच्या रंगामध्ये कशा वेग वेगळ्या रंगांची झाक असते, ध्रुव तारा, सप्तर्षी कसा ओळखावा, अशी बरीच माहीती होती. मुंबईच्या सदानकदा फटफटल्या सारख्या दिसणार्या आकाशात मी हे सगळे पाहण्याच्या प्रयत्न करत असे. पण काहीच ओळखता येत नसे. कधी कधी कुठल्याही तार्याला हा गुरू, तो शनी असा गैरसमज करुन घेत असे. एका रात्री तर उंच विजेच्या तारांवर अडकेल्या पंतंगाच्या तुकड्यावर प्रकाश पडला होता त्यालाच गुरू ग्रह समजलो होतो! एकदा वडिलांनी मला सप्तर्षीची ओळख करून दिली.

माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११

लेखक कौन्तेय यांनी रविवार, 16/10/2011 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११ रामराम! सप्टेंबरात मिपा.करांकडून माझ्या माळशेज सहलीबाबत कौल मागितला होता ( http://www.misalpav.com/node/19017 ). त्यावेळी शैलेन्द्र, अजितजी, वल्ली, विक्षिप्त अदिती, योगप्रभू, परीकथेतील राजकुमार नि सुनील यांच्या उद्बोधक तर बाकी बऱ्याच जणांचा रंजक प्रतिक्रीया आल्या. त्यां सगळ्यांवर विसंबूनच आमची सहल सुरू केली आणि सुफ़ळ संपूर्णही झाली. सर्वांना धन्यवाद! मुंबई - नाणेघाट रस्त्यावरचा जलविहार - माळशेज - मुक्काम - शिवनेरी - माळशेज - विश्रांती - मुंबईप्रस्थान असा कार्यक्रम केला.

हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 16/10/2011 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
जखमेस तेल मागू, कितिदा जगास अजुनी? हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी? हे शीड फाटले अन्, तुटले जरी सुकाणू क्षितिजा तरी तुला का, माझाच ध्यास अजुनी? ज्योती फुकून टाकू, ही वल्गना कशाला? वणवा उठेल गगनी, नियतीस आस अजुनी! उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का? उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी! ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी? कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी (इतरत्र पूर्वप्रकाशित)

आला पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 16/10/2011 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
आला पाऊस
गर्जत वर्षत आला पाऊस हर्षत नाचत आला पाऊस कुंद नभ मोकळे करूनी धरेवरती कोसळला पाऊस विद्यूल्लता तेजाने चमके कडकड करूनी झळके सवेत येवूनी थेंब जलाच्या आक्रंदून पडला पाऊस अतीवेगाने तुफान वाहते तरूवेलींचे पर्ण हालते भांग शाखीय शिस्तीचा विस्कटून गेला पाऊस झरे नद्या तलाव सागर जलाशयांची रुपे अगाध एकात दुसरे दुसरे एकात मिसळूनी गेला पाऊस कोठे पडला छतावरी कोठे आला माळरानी कोठे पडूनी शेतामध्ये धान्य पिकवूनी गेला पाऊस उष्णउसासे देवूनी अंगी शहार्‍यांची टोचूनी नांगी अमृतमय जीवन देवूनी गेला पाऊस - पाषाणभेद १

न्याय दर्शन आणि बिग बॅंग

लेखक शरद यांनी शनिवार, 15/10/2011 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
न्यायदर्शन आणि बिग बॅंग न्याय दर्शनात अणुवादाचा (दार्शनिक विवेचनाचा) उगम दिसतो. प्रत्येक प्राकृत पदार्थ हा अणूंचा बनलेला असतो, हा सिद्धांत. " अंत्यावयवत्वम् अणुत्वम् " (ज्या पदार्थाचे पुढे आणखी अवयव पाडता येत नाहीत),त्याला अणु म्हणावे अशी अणूची व्याख्या आहे. सृष्टीच्या आरंभी चार प्रकारचे अणु असतात. परमेश्वराच्या इच्छेने त्यांच्यात हालचाल उत्पन्न होते व मग दोन अणूंच्या एकत्रीकरणाने द्व्यणुक, मग त्यणुक व नंतर चतुर्णुक उत्पन्न होतात. अशा रीतीने स्थूल पृथ्वी, स्थूल जल, स्थूल तेज व स्थूल वायू ही द्रव्ये अस्तित्वात येतात.

चिकन लिवर (कलेजी) मसाला

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 15/10/2011 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः चिकन कलेजी साफ करुन त्याला आले+लसुण+कोथिंबीर+पुदिना+हिरवी मिरची पेस्ट लावून मॅरिनेट करुन ठेवणे १ छोटा कांदा उभा चिरलेला ३-४ टेस्पून सुके खोबरे ३-४ लवंगा १ टेस्पून आले+लसुण पेस्ट १ टेस्पून लाल तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त) १/२ टेस्पून गरम-मसाला १ टीस्पून धणेपुड १/२ टीस्पून हळद मीठ चवीनुसार तेल . पाकृ: प्रथम एका नॉन-स्टीक पॅनमध्ये १ चमचा तेल तापवून कांदा व लवंगा परतून घ्या.

मदत हवी आहे..

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 15/10/2011 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
खुसखुशित चिरोटे बनवायचे आहेत , वरुन साखर पेरलेले...कसे बनवायचे ?? हे कोणी सांगेल काय?? जागुताई...सानिका, मॄणालिनी, आणी इतरही सर्वजण सांगाल काय??