Skip to main content

ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व

लेखक JAGOMOHANPYARE यांनी सोमवार, 24/10/2011 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व स्वातंत्रवीर सावरकर यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर ( क्रांतीवीर श्री गणेश दामोदर सावरकर) यानी ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व या नावाचे एक पुस्तक लिहिले होते. येशू ख्रिस्त हा हिंदु, तमिळ ब्राह्मण होता असे त्याना संशोधनात आढळले म्हणे. या पुस्तकाचे डॉ. पी व्ही वर्तक यानी इंग्रजीत भाषांतरही केलेले आहे. जिसस द ख्रिस्त वॉज अ हिंदु या नावाने .jesus the christ was a hindu http://www.drpvvartak.com/photogallery.asp यात अदर फोटो गॅलरीत त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे.

डॉक्टर 'क्ष'

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 24/10/2011 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, प्रत्येकजण आयुष्यात उतारचढ, आनंद, दु:ख आपापल्या परीने अनुभवत असतो. पण काही उतारचढ असे असतात की माणसाचा कस लागतो, सत्वपरीक्षा घेतो काळ. असे अनुभव न यावेत तेच बरे. नाहीतर सामान्य विचारसरणीचा माणूस गवताच्या वाळलेल्या पात्याप्रमाणे हरवून जातो त्या वादळात. ही कहाणी आहे डॉक्टर 'क्ष' यांची. माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत हेच माझे फॅमिली डॉक्टर. सत्तरच्या दशकात डॉक्टरांनी 'प्रॅक्टीस' सुरु केली. त्यावेळी डॉक्टर म्हणजे फारच प्रतिष्ठित आणु दुर्मीळ कौशल्य असलेले व्यक्ती. डॉक्टरांचा जम बसला, पुण्यात त्यांची प्रॅक्टीस चांगली सुरु झाली.

आकाशकंदिल!!!

लेखक उदय के'सागर यांनी सोमवार, 24/10/2011 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! आकाशकंदिल बनवणे हा एक अवघड प्रकार असतो असं नेहमीच वाटत असल्यामुळे मी आकाशकंदिल बनवण्याच्या भानगडीत कधीच पडलो नाही. पण काही दिवसांपुर्वीच मिपावर प्रिया-ताईंचा "पारंपारीक आकाशकंदिल" हा धागा वाचला (http://www.misalpav.com/node/19394) आणि वाटलं "अरे!

चला छतावर

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/10/2011 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
चला छतावर
पुनवची रात आज आली तुमी आला चला राया चला छतावरती झोपायला ||धृ|| चांदणं पडलंय ह्या रातीचं पाहू लुकलुक तार्‍यांनी शेज ती सजवू वरतीच राहू दोघं तिसरं न्हायी कुनी पहायला चला राया चला छतावरती झोपायला ||१|| हातामधी सरळ धरा अत्तरदानी हळूच खाली सोडा मच्छरदानी इश्काच्या मैदानी उडवा तुमच्या जोरदार तोफेला चला राया चला छतावरती झोपायला ||२|| पाटंला थोडी थंडी गुलाबी पडल अंगावर पांघरून म्हणून तुमाला ओढल तुमीबी जवळ ओढा मला, होईल उबार्‍याला चला राया चला छतावरती झोपायला ||३|| गाठ चोळीची आत्ताच तटली साडी अंगाची क
काव्यरस

दिवाळीतील रांगोळी - १

लेखक प्रिया ब यांनी रविवार, 23/10/2011 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा !!! मी आज काढलेली रांगोळी : १० * १० ठिपक्यांची :

प्रतिमास्फोट

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 23/10/2011 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
धनंजय यांच्या चित्रावरुन मला 'गती' या प्रकारातील प्रतिमास्फोट हा चित्रणप्रकार आठवला. या चित्रणप्रकारातले चित्र पाहताना त्या प्रतिमेचा किंबहुना विषयाचा केंद्रापसारी स्फोट होउन चित्रकण वेगाने सर्व दिशांना फाकत आहेत असा आभास निर्माण होतो आणि वेगाची जाणीव होते. चित्रणातील वस्तू (विषय) आकाशात उंच गेल्यावर बाण फुटुन सर्वत्र रंगीबेरंगी प्रकाश पसरतो तशी केंद्रापासुन बाहेर झेपावत आहे असा आभास होतो. हे चित्रण करताना भरारीभिंग वापरावे लागते. अनावरण काल जरा वाढवुन किरण साधताच कळ दाबताना अनावरण कालावधीतच फरारीभिंगाचे नाभीय अंतर बदलावे लागते म्हणजे प्रतिमादर्शन लांबुन जवळ व जवळुन लांब करावे लागते.

प्रसारमाध्यमांचा बेजबाबदारपणा..

लेखक श्रीरंग यांनी रविवार, 23/10/2011 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुणे मिरर पान क्र.२ वरील बातमी वाचली आणी तळपायाची आग मस्तकात गेली. काही महिन्यांपूर्वी हिंजवडी येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्या तीघांना जन्मठेप झाल्याच्या बातमीबरोबरील फोटो पाहून कोणत्याही सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय राहणार नाही. शिक्षा झालेला गुन्हेगार एखाद्या ऑलिंपिक विजेत्याच्या थाटात हात उंचावून, जमलेल्यांना निगरगट्टपणे अभिवादन करत होता. मुळात, बलात्कारासारखा नीच गुन्हा करून एका स्त्रीच्या व तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याची राखरांगोळी करणार्या हरामखोरांना अतिशय निर्घ्रुण शिक्षेची तरतूद असायला हवी.

दोन बडबडगीते

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/10/2011 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
दोन बडबडगीते
१) ढग वाजले ढम ढम ढम ढग वाजले ढम ढम ढम विज चमकली चम चम चम पाऊस पडला छम छम छम नाच नाचूनी भिजले कोण? भिजले कोण? २) चिमणे चिमणे चिमणे चिमणे हे दाणे घे हे दाणे घे आमच्या बाळाला खेळायला ने खेळायला ने काऊदादा काऊदादा भुर्रकन ये भुर्रकन ये आमच्या बाळाला युक्ती दे युक्ती दे ईकडे ये रे भु भु बाळाशी खेळतोस का तू? हम्मा हम्मा शेपूट हलव आमच्या बाळाला पाळण्यात झुलव - पाषाणभेद