Skip to main content

ओल

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 03/11/2011 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
ओल चुकवले वार शस्त्रांचे , सुकल्यात सर्व जखमा नाजूकशी फुलांची,पण्.....ती चीर चिघळती आहे ! थकली कधीच गात्रें , आता आधार लागे तरिही उरांत कुठली , ही धाव उधळती आहे? सांजावले कधीचे, बघ, पक्षी उडून गेले "घे,भरारी घे" ची पण साद हुरळती आहे ! शमवीत वेदनांना धन्वंतरी उगाच "होकार" ऐकण्याची सणक उसळती आहे ! सरणावरी कधीचे, अश्रू सुकून गेले फुटल्या घड्यांत मात्र.....ती "ओल" निथळती आहे.....ती "ओल" निथळती आहे ! ---------------------------------------------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे-----------------०३-नोव्हेंबर २०११, दु. २ वा.------

गरजूला मदत करावी का?

लेखक मन यांनी गुरुवार, 03/11/2011 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
गरजूला मदत करावी काय? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी काहीजण लगेच "हो" असे देतील. आता हा गरजू जर "पाकिस्तान" असेल, तर आपले धोरण काय असावे? http://72.78.249.107/esakal/20111102/5137155085083760384.htm इथे छोटिशी बातमी वाचायला मिळाली. पाकिस्तान आपल्याकडे वीजेची मागणी करु शकते. अर्थातच आपण वीज देणार म्हणजे निव्वळ जनहितार्थ देणार असे नाही. ती वीज"विक्री"च असेल. पण सध्या आपले आणि "त्यांचे" संबंध लक्षात घेता, हे करणे पटते का?

गजरा (३)

लेखक फिझा यांनी गुरुवार, 03/11/2011 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
3

रांगोळी डिझाईन !!

लेखक पूनम ब यांनी गुरुवार, 03/11/2011 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
२ वर्ष आधी दिवाळी ला अंगणात काढलेली संस्कार भारती रांगोळी.. :) कॉलेज मध्ये रांगोळी स्पर्धेत काढलेली रांगोळी..

ती

लेखक सन्जोप राव यांनी गुरुवार, 03/11/2011 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
तिची आणि माझी पहिली भेट अगदी अलीकडेच झाली. त्या आधी ती कोण, काय मला माहितीही नव्हते. काही कारणाने मी तिच्या वडीलांना फोन केला होता. तो तिने उचलला. "हॅलो, कोण बोलतंय?...." ती इतक्या जोरात म्हणाली की मला माझा फोन कानापासून जरा लांब न्यावा लागला. आवाज एकदम खणखणीत. भाषेला थोडासा हेल . थोडासा कोल्हापुरी, थोडासा अमराठीही. "हॅलो... बाबा.... आहेत का?" मी चाचरत विचारले. "ह्हो..." पुन्हा तसाच ठसकेबाज आवाज."बाबा, तुझा फोन आहे." मग मी तिच्या वडीलांशी वगैरे बोललो. नंतर लवकरच त्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. त्यावेळी मी तिला पहिल्यांदा बघीतले.