Skip to main content

जातकुळी

लेखक पेशवा यांनी सोमवार, 07/11/2011 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापूर्वी बार्न्सच्या पुस्तकभांडारात आवडतीच्या सिंगलशॉट मोका सकट मी. दिशाहीनतेचे डर्टी हॅरी फोर्टी फोर मॅग्नम खेळवत... आजूबाजूची टेबले एकटेपणाच्या गर्दीने व्यापलेली तेव्हा भेटले होते पहिल्यांदा दहा तोंडाचे ते मूल लॅगरांज बिंदूचा रोग झालेले... लहानपणी आईने सांगितलेली धृवाची कथा... अढळपदातला अध्याहृत बंदिवास... डर्टि हॅरी रोखल्यावर आत्मभानाला सुटलेली घाण ह्यांच्यात बुडवून घेतले होते सारे वेडेबागडे शब्द दहा तोंडाच्या मुलाने रचलेल्या रचना रोशोमान सावल्यांचा खेळ... माझे हरवलेले डर्टी हॅरी, विभक्त झालेले एकटेपण आणि फोस्टर केअर मध्ये असलेले ते मूल माझा अढळपदाकडाचा बुर्ज्वा प्रवास कालच्या पानाव
काव्यरस

पैशाचे पावित्र्य

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 07/11/2011 04:10 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्राध्यापकाने एका अमेरिकन विद्यापीठाच्या हॉस्टेलमधे एक प्रयोग केला. प्रत्येक हॉस्टेलमधे प्रत्येक मजल्यावर एक सार्वजनिक फ्रीज असतो. विद्यार्थी आपापले अन्नपदार्थ त्यात ठेवतात. ह्या प्रा. ने अशाच एका शीतकपाटात डझनभर कोकच्या (कोका कोला) बाटल्या ठेवल्या. रात्री उशीरा, जेव्हा कुणी विद्यार्थी आसपास नव्हते अशी वेळ साधून त्याने हे काम केले. ह्या बाटल्या कुणाच्या आहेत हे फक्त त्यालाच ठाऊक होते. त्याने ह्या बाटल्यांची नोंद ठेवली. आणि त्याला असे आढळले की ७२ तास उलटायच्या आत सगळ्या बाटल्याचा फन्ना उडला. अर्थातच ह्याचा अर्थ विद्यार्थ्यांनी खुल्या दिल्याने ह्या बाटल्या "आपल्याशा" केल्या.

फळा

लेखक लीलाधर यांनी रविवार, 06/11/2011 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक फळा... प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांची ऊधळण करणारा........ रंग माझा काळा नांव माझे फळा, घर माझी शाळा, जीथे पिकतो उद्याच्या सुजाण नागरीकांचा मळा, हेडमास्तर इथले मालक विद्यार्थी त्यांचे बालक, आई वडीलांनंतर हेच आमचे पालक, ह्याच फळ्यावर गीरवतो अनेक विषयांचे धडे, त्याचमुळे जीवनात प्रत्येकाचे पाऊल पडते पुढे.... असा मी असलो जरी काळा तरी जीथे पिकतो उद्याच्या सुजाण नागरीकांचा मळा सुजाण नागरीकांचा मळा.......

सुखी संसाराची सोपि वाटचाल

लेखक किचेन यांनी रविवार, 06/11/2011 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
समोर २५ वर्षांची मुलगी बघितल्यावर बरेचदा चेहेर्यावर अविश्वासच दिसायचा! हिच्याकडून जमणार आहे का आपली मुलाच /मुळीच लग्न? मुळात हि आपल्या मुलापेक्षा वयाने लहान, हिला कितीस कळणार आहे? हाच अविश्वास माझा आत्मविश्वास बनला.समोर आलेल्या अनेकांनी माझ्याकडे नोदणी करायचं टळल, पण एकदा का त्यांच्या मुलाला अनुरूप मुली मिळवून दिल्या कि मग आपोआप नोंदणी करायचे आणि दुसर्या पालाकानाही घेऊन यायचे.मला कधी कधी गम्मत वाट्याची.पहिल्या भेटीत आणि आत्ताच्या भेटीत किती फरक झालाय या माणसात!जशी जशी लग्न ठरत गेली तसा तसा आत्मविश्वास आणखीन वाढला.माझ्यातही बराच बदल होता !

कोण तू ?

लेखक शरद यांनी रविवार, 06/11/2011 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
आठ वर्षांचा पोरगेला शंकर गेले दोन दिवस गुहेसमोर हात जोडून बसला होता. आंणखी किती वेळ प्रतीक्षेत जाणार हेही त्याला माहीत नव्हते.पण ज्याकरिता आपण घर सोडून इतके दूर आलो ते आपले आराध्य समोरच्या गुहेच्या तमांत आहेत व तेच आपणाला प्रकाशाची वाट दाखवणार आहे याची त्याला खात्री होती. त्याला आपल्या खेडेगावातील बालपणाची आठवण झाली. त्या खेड्यात त्याचे बालपण खेळापेक्षा शिक्षणातच गेले म्हणावयास हरकत नव्हती. पाच वर्षांचा होण्याआधीच वडील निर्वतले. आईने धीराने त्याची मुंज करून गावातील गुरूजींकडे ज्ञानोपासनेकरता पाठवले.

वारकरी होऊ -

लेखक विदेश यांनी रविवार, 06/11/2011 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
वारकरी होऊ पंढरीस जाऊ पाहुनिया विठ्ठला आनंदात न्हाऊ |१| टाळ चिपळ्यांचा घुमवीत नाद एकमुखे घालू माऊलीस साद |२| मालदार कोणी झोळीवाला कोणी पताका उंचावून विठू एक जाणी |3| जनी नामा गोरा चोखा रोहिदास नाही दुजाभाव सर्वामुखी घास |४| ओळख ना पाळख नका दूर लोटू जीव लावूनिया पंगतीत भेटू |५| भेटू एकमेका जाऊ देवळात संत सज्जनासंगे दंगू कीर्तनात |६| लोभस मुद्रा कर कटीवर मूर्ती विठ्ठलाची शांत विटेवर |७| विठ्ठल विठ्ठल गजर टाळ्यात चंद्रभागा वाहते माझिया डोळ्यात |८| विठ्ठल विठ्ठल जप मनीध्यानी कर्तव्यात लाभ मन समाधा

!! पेढे !!

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 06/11/2011 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गोडघाशा मिपाकरांसाठी ही एकदम सोपी पण वेळखाऊ पाककृती आमच्या सौंकडून साभार. ईकडे खवा मिळत नाही, त्यामुळे ह्या प्रकारे पेढे बनवले. चला तर मग घ्या साहित्य. १. रिकोटा चीज (२५० ग्रॅम) २. स्वीटनड् कंडेंसड् मिल्क (१५० ग्रॅम) ३. बदाम ७-८ (पावडर करुन) ४. वेलची (३-४ बारीक वाटून) ५. स्कीम मिल्क पावडर ४ मोठे चमचे (नाही टाकली तरी चालेल) यात साखर घालण्याची अजिबात गरज नाही. :) रिकोटा चीज आणि कंडेंस्ड मिल्क कृती: १.