Skip to main content

जंबो जेट -जंबोजेट

लेखक रामदास यांनी मंगळवार, 08/11/2011 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तर साली भारतात आलेल्या जंबोजेटने जंबो शब्द वापरात आणला. जंबोजेटच्या कहाण्यांनी-फोटोंनी पेपरांची पाने भरून वाहत होती. लांब पल्ल्याच्या ताफ्यातले एअर इंडीयाचे पहीले विमान. एअर पोर्टवर ते बघायला प्रचंड गर्दी व्हायची. सुरुवातीचे काही महीने पार्ला अंधेरी -सांताक्रुझ मध्ये लोकं गच्चीवर उभी राहून जंबो दिसायची वाट बघायची. मग जंबो सगळीकडेच दिसायला लागलं. अंधेरीला नविन सोसायटी आली तिचं नामकरण जंबोदर्शन - बाजूलाच दुसरी सोसायटी आली तिचं नाव विमान दर्शन मोठं मंत्रीमंडळ आलं ते पण जंबो मंत्रीमंडळ - मोठ्ठ्या थैल्या आल्या त्या जंबो बॅग - मोठा वडापाव जंबो वडापाव. सगळीकडे जंबो जंबो.

ती वाट

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 08/11/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
ती वाट गोकुळातून कुंजवनाकडे जाणारी आजही ती त्याच वाटेवर प्रतीक्षा करतेय कदाचित, तिचा प्राणसखा कधीतरी अवतरेल कुंजवनातील राधिकेला भेटायला आलाच तर तिचेही भाग्य उजळेल . त्याच्या पाऊलखुणांचा वेध घेत धूळभरल्या वाटेवर अजूनही त्या स्पष्ट होत्या पण फक्त आत जाणार्‍या बाहेर येणार्‍या काहीश्या विरळ झालेल्या . त्या कुंजवनातील तो डेरेदार कदंब अजूनही, चमचमत आहे त्या चांद्रवैभवाने त्याच्या पानापानात ते मंतरल्या मुरलीचे भारलेले स्वर अजूनही दाटून आहेत तिला तो कदंब दिसतोय, पण देवकीनंदन, तो नाही तिथे..... . क्षणभर डोळ्यांसमोर रासक्रिडेत दंग गोपीका अन्, गोपीकांमध्ये उजळून दिसणारी ती अल्लड राधिका मधोमध उभा, मुरली
काव्यरस

हातपंप

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 07/11/2011 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
हातपंप
ह्या दुष्काळानं लई ताण दिला ग बया मला हातपंपाचा आधार हाय ग बया ||धृ|| घरचा नळ नाय कामाचा सार्वजनीक हाय नळ गर्दीचा वाही रातंदिस पानकाळ्याचा त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१|| खालीवर दांडा करावा बरं थोडं कष्टांचं काम हाय सारं पानी येतंयं हापसून न्यारं बाकी ठिकाणी माझी घागर रिकामी र्‍हाती ग बया मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||२|| सार्‍या बायांनी याची चव घेतली एकजात सार्‍यांनी पसंती दिली हंडेगुंडेकळशांची रांग मोठी लागली त्यांनी हातपंपाचा ताबा घेतला ग बया मला हा

चारुकेशी

लेखक पेशवा यांनी सोमवार, 07/11/2011 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
कसे सांग पाय थकले, वाटेतच रंग विटले श्वासातच माझ्या उतरले घन काळे हृदय मागते मागते मागते दे रे कान्हा उन्मळून टाकणारी लखलखती ज्वाला आर्त माझी हाक जीभ सोलून नटली हरेक उपकाराबरोबर रात्र-बेरात्र झोपली सोसण्याचे बळ खिळ्यासारखे ठोकताना कान्हा चोरशील का ह्या अस्तित्वाचा काला? हे काही स्वर डोळ्यांमध्ये राहिलेले स्वप्नांचे अनौरस क्षण त्यांच्यामागे वाढवलेले आशिषांच्या भोगतो घडाभर जखमा कान्हा माझ्या झोळीत एक सुदर्शनी शिवी घाला! ---- ह्या चारुकेशी बरोबर वाचा ------
काव्यरस

काही दिवसच असे असतात

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी सोमवार, 07/11/2011 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसच असे असतात विस्कटलेल्या घरात गोंगाटाच्या घेरात उधाणलेल्या भरात तरीही सुरात आपण म्हणतो दिवसभरात काहीच नाही झाल सरळ त्याला मात्र पडत राहते अशाच अनवट क्षणांची भुरळ आपण त्याला बसवत राहतो वेळापत्रकाच्या चौकटीत त्याला मात्र नसत अडकायचं रोजच्या घोटीव कटकटीत धावत राहतो आपण त्याच्या मागे, हातात ताट आणि बोटात घास घेवून, कातावत तो मात्र पळतो अंगणात अर्ध्या चड्डीत, बरबटलेल्या तोंडाने खट्याळ हसत , वेडावत त्याला असत भिडायचं आभाळाच्या गाण्याला आपल्या मुठीत भरायचं चांदोबाच्या नाण्याला डोळ्या पुढचं धुक आपल्या सरतच नाही निरागस आर्जव त्याचं दिसतच नाही झपाटलेल्या क्षणांनी विणलेला दिवस दिवसभर उनाडू
काव्यरस

बी.रघुनाथ- एक काव्यप्रवास

लेखक विनीता देशपांडे यांनी सोमवार, 07/11/2011 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
बी.रघुनाथ-एक काव्यप्रवास आधुनिक काव्यप्रवाहातील एक अभिनव कवि म्हणजे बी.रघुनाथ. कथा,काव्य आणि कादंबरी हे तीनही साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळलेत. बी.रघुनाथ यांनी सन १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला.त्यांची पहिली कविता हैद्राबाद येथिल "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिध्द झाली.

म.न.पा.स एक पत्र

लेखक चाफा यांनी सोमवार, 07/11/2011 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
म.न.पा.स एक पत्र प्रती म.न.पा., सादर प्रणाम, सध्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आपल्यावर होणारे कामचुकारपणाचे आरोप रोज ऐकतो. ते मला फारसे रुचत नसल्याने आपणास आपल्या दिव्य कार्याची जाणीव करून देण्यासाठी मुद्दाम हा पत्रप्रपंच करत आहे. सर्वप्रथम मी वैयक्तिकरीत्या आपले आभार मानू इच्छितो कारण केवळ आपल्या कर्तव्यनिष्ठेमुळे माझे दंतवैद्याकडे खर्ची पडू शकत असलेले रु. २०० मात्र बचत झाले.