Skip to main content

मदत हवी आहे

लेखक धनुअमिता यांनी बुधवार, 09/11/2011 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्या कुणाला माहिती आहे का मराठी जुनी व नविन गाणी कुठल्या वेबसाइटवर मिळतील. कृपया कोणी सांगेल का ?

!! मोरया !!

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 09/11/2011 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्‍यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या.

मैत्री……

लेखक विनीता देशपांडे यांनी बुधवार, 09/11/2011 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
कधी गुंतलेले,कधी गुंफलेले मनामधे खोल रुतलेले अधे मधे न उमगणारे.......मैत्रीचे नाते कधी अव्यक्त्,कधी अवास्तव तरीही शाश्वत अन विश्वस्त अधे मधे निशब्द...........मैत्रीचे नाते कधी बेभान्,कधी बेधुंद निसटलेला तोल सावरणारे अधे मधे अलिप्त..............मैत्रीचे नाते कधी पाण्यात, कधी आरश्यात प्रतिबिंबासारखे अधर दुधसागरासारखे शुभ्र........मैत्रीचे नाते ( विनीता देशपांडे)

शब्द ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 09/11/2011 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द कसे अलगद उतरत असतात मनामध्ये कधीही ,केव्हाही अचानक ....! तेव्हाच त्यांना बंदिस्त करावे लागते नाहीतर ते उडून जातात पाखरासारखे त्याना बघावे मनात पसरताना हलके हलके फुलताना शब्दाना अनेक अर्थ फुटत जातात तेव्हा ते काळीज कोरून जातात काळजात ते जपून ठेवावे लागतात नाहीतर ते हरवून जातात .... कसे रुमझुमत येतात शब्द ..... जेव्हा मन असते फक्त निशब्द शब्द शब्द झेलून घ्यावा जेव्हा वाटतो शब्द नवा तेव्हाच शब्दांच्या सरीत भिजून जावे जमले तर गाणे गावे गाता गाता एक होईल एखादी कविता गिरकी घेऊन गाणे गाईल .....!!
काव्यरस

दोन 'नमुन्यांचे' निबंध

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 09/11/2011 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील अशीच एक शाळा. इयत्ता ९ वी च्या प्रथमसत्र परिक्षेतील हिंदी विषय. निबंधाचा प्रश्न- मेरा प्रिय नेता. निवडलेल्या दोन 'नमुन्यांचे' निबंध खाली देत आहे. नमूना क्रं. एक- प्र.

काय बाई हौस ही !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 08/11/2011 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
" चंद्रकांत तुकाराम कुंजीर (वय 51, रा. भारती विद्यापीठामागे, कात्रज) हे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. 2004 मध्ये याच महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. एका खासगी कंपनीत नोकरीस असलेली ही तीस वर्षीय तरुणी सप्तरंग आकाश, भेकराईनगर, फुरसुंगी येथे राहते. कुंजीर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडल्यामुळे तिने टेस्ट ट्यूब बेबी तंत्राद्वारे त्यांच्या मुलाची कुमारी माता होण्याची इच्छा व्यक्त केली. कुंजीर व तरुणीच्या नातेवाइकांनी समजूत काढूनसुद्धा ती बधली नाही.

सुपर जंबो ए ३८० , जणू इंद्राचा ऐरावत.,

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी मंगळवार, 08/11/2011 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकन बोईंग च्या एकतर्फी साम्राज्याला शह द्यायला सुरवात म्हनुन युरोपियन युनियन च्या एरबस ने केली. ह्याचा एक भाग म्हणून बोईंग च्या ७४७ चा टक्कर देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या विमान निर्मितीची योजना केली. नकटी च्या लग्नाला विघ्ने का काय म्हणतात तसे ह्यांचा उड्डाणाला विलंब झाला.( काही प्रसारमाध्यमांनी हा पांढरा हत्ती उडणार कधी अशी त्याची कुचेष्टा सुरु केली.) पण ह्या ऐरावताचे पहिले उड्डाण पेरीस वरून लंडन च्या हिथ्रो वर आगमनाची तारीख पक्की ठरली. ते वर्ष २००६ चे होते..

पु.ल एक आठवण!

लेखक किसन शिंदे यांनी मंगळवार, 08/11/2011 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज ८ नोव्हेंबर! उभ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या पु.ल.देशपांडे उर्फ भाईकाका यांचा ९१वा जन्मदिवस. आपल्या विनोदी साहित्याने संपुर्ण महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा हा अवलिया!! चि.वि.जोशी, आचार्य अत्रे यांसारख्या दिग्गज विनोदी साहित्यीकांच्या साक्षीने आपल्या विनोदी लिखानाची सुरूवात केलेल्या पुलंची साहित्य संपदा उत्तरोत्तर आणखीनच बहरत गेली. हरितात्या, नारायण, सखाराम गटणे, बोलट, अंतू बर्वा त्यांनी रेखाटलेल्या या व्यक्तीरेखा मराठी साहित्य विश्वात अजरामर झाल्या.