Skip to main content

प्राचीन भारतः शेलारवाडी लेणी(घोरावडेश्वर)

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 21/11/2011 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
शेलारवाडीची लेणी-बौद्धधर्मातील हिनयान पंथीयांनी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात खोदल्या गेलेल्या ९/१० लेण्यांचा हा छोटासा समुच्चय. भाऊबीजेनंतर लगेचच दुसर्‍या दिवशी इथे सकाळी ७ वाजताच पोहोचलो ते भावंडांसह. शेलारवाडी तशी घरापासून-चिंचवडपासून अगदीच जवळ, जेमतेम १० किमी. इथे बरेचवेळा येणे झालेलेच होते. लेण्यांमध्ये असलेल्या शिवमंदिरामुळे तसेच येथून जवळच असलेल्या घोरावाडीमुळे या लेण्यांना घोरावडेश्वर असेच म्हणतात पण वास्तविक ही लेणी आहेत पायथ्याच्या शेलारवाडीला खेटून. समुद्रसपाटीपासून ४५० ते ५०० मी उंच असलेल्या या डोंगरात ही लेणी खोदलेली आहेत.

प्रकाशाचा वेग - नवसिद्धांत.

लेखक हैयो हैयैयो यांनी सोमवार, 21/11/2011 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाशाचा वेग - नवसिद्धांत. अन्वयार्थ : विनम्र शंका की सनातनपणा? संदर्भ:- लोकसत्ता, सोमवार, २१ नोव्हेंबर २०११.
भौतिकशास्त्रात दृढमूल असलेल्या गृहीतकाला धक्का देणारा निष्कर्ष सप्टेंबर महिन्यात जाहीर झाला. न्यूट्रिनो हे अतिसूक्ष्म कण प्रकाशाहून अधिक वेगाने प्रवास करतात असे आढळून आले. गेल्या आठवडय़ात पुन्हा केलेल्या प्रयोगातही हाच निष्कर्ष निघाला.

(( Sonar of Thoughts ! ))

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 21/11/2011 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/19646. धनाजीरावांच्या नायकाच्या मनातील भावना व्यक्त करणे हे तसे अवघडच आहे मात्र (( Sonar of Thoughts ! )) . समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि हे सगळं पाहायचं, अनुभवायचं सोडून बावळटपणे आपला फोटो काढणार्‍याकडे निर्विकार वृत्तीने पाहणारा हा धनाजीरावंचा नायक. त्यानी काढलेला एक फोटो, शेखाडीला*. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. असे आवाहन केले होते त्या तिथे जवळच नायकाने नुकत्याच खाल्लेल्या कागदावर या ओळी टंकलेल्या होत्या सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (बाकी शुन्य हे पुस्तक**).....

माणूस

लेखक विदेश यांनी सोमवार, 21/11/2011 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
चला चला चला गाढव पहायला माराच ओझ घेऊन फुकटच राबतय माणूस शोधतय ? चला चला चला पाहू गोगलगाईला शिंग वर दाखवी नि पोटात पाय - माणसाचं काय ! चला चला चला बैल बघायला मानेवर जूं नाही हूं की चूं माणूस ना तू ? चला चला चला कुत्रा पाहू चला शेपूट ते वाकडे इमानदार किती माणसाला भीती ! चला चला चला सापाला पहायला दूध पाजले तरी सवय चावायची - जात माणसाची ! चला चला चला माणूस पाहू चला - निघाले की सगळे ! घाई घाई करून स्वत:लाच विसरून ?

तहान !

लेखक चाफा यांनी सोमवार, 21/11/2011 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
बराच काळ लोटला तरी अजुनही ते त्याच जागी अडकलेले, काळाची अर्थात त्यांना पर्वा नव्हती पण ज्या साठी ते आतुरले होते ती गोष्ट.....? कधी सुटका होणार? कधी ? अनेक प्रश्न त्या अंधारात उमटले. उत्तरादाखल एकच वाक्य. `लवकरच, सुरुवात तर झालेलीच आहे माध्यम मिळण्याचाच अवकाश'........................ ********* मुंबई- गोवा महामार्गावर पनवेल आणि पेणच्या मधे डाव्या बाजुला एक नर्सरी दिसते ती पाहिलीत का कधी ? ती माझीच आहे.

शटर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 21/11/2011 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
1 मध्ये सपाट्याने काही हॉरर चित्रपट बघितले होते. त्यातील 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अ‍ॅकेशिआ' ची ओळख ह्या आधी करून दिलीच आहे. ह्याच यादीतला आणखी एक चित्रपट म्हणजे 'शटर'. 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अ‍ॅकेशिआ' हे काहीसे गडद गडद अंधारात घडणारे , मानसिक आंदोलने दाखवणारे चित्रपट होते, मात्र शटर ह्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आणि सतत तुमच्या मनावर एक दडपण ठेवून असणारा चित्रपट.

सोया-पालक टिक्की

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 21/11/2011 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः २ बटाटे उकडून कुस्करून घेणे साधारण १ वाटी पालक उकडून व पाणी निथळून घेणे १ वाटी सोया ग्रान्युल्स गरम पाण्यात १५ मिनिटे भिजवून, हाताने दाबून पाणी काढून घेणे २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून १ टीस्पून लसुण बारीक चिरून १ टीस्पून आले बारीक चिरून २ टेस्पून पंढरपुरी डाळ कोरडीच भाजून घेणे २-३ टेस्पून ब्रेड क्रम्बस १/२ टीस्पून चाट-मसाला १/२ टीस्पून जीरे मीठ चवीनुसार तेल

ट्रक धिना धिन!!

लेखक मोहनराव यांनी सोमवार, 21/11/2011 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला सगळ्यांना हे माहीतच असेल कि आपल्याकडे ट्रक चालक स्वताच्या ट्रकमागे काहीना काही लिहित असतात. मी या अशा लिखाणाचे खूप निरीक्षण करायचो. मला ते खूप आवडायचे. एकदा गोव्याला मित्रांबरोबर जाताना रस्त्यात एक ट्रक दिसला. त्यामागे ट्रकमधल्या साहित्यिकाने बरेच काही लिहिले होते. वरती तो फोटो लावला आहे. मला स्वताला हा ट्रक चालक नेहमीच एक भावनिक, विचारवंत आणि एक कवी मनाचा वाटत आला आहे.