Skip to main content

थोडे मजला कळाया लागले.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 27/11/2011 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे मजला कळाया लागले. तव रुप छळाया लागले. काजलनेत्र वा पिन पयोधर दोघेहि मला खुणवु लागले. गंधित मादक केश संभार मन त्यात अडकू लागले.. पहाताच तव यौवन रुप सारे आईने तडकु लागले. पहाता रसाळ अधर फोडी मन कविता प्रसवू लागले. निरखता मादक आक्रुति बंध द्वैताद्वैत रहस्य उकलू लागले. अविनाश

शब्द हे अबोल

लेखक स्वर भायदे यांनी रविवार, 27/11/2011 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल नविन काही सुचतच नाही... कुणी काही बोलल तर रूचतच नाही आता पाहत बसतो एकटाच मी शुन्यात... तिच्या शिवाय मला काही सुचतच नाही ती असेल समोर तर बोलून जातो बरच काही... पण शब्द तिच्या पर्यत कधी पोहचतच नाही
काव्यरस

किरकोळ विक्रीक्षेत्रामध्ये बड्या कंपन्यांचा शिरकाव!

लेखक ए.चंद्रशेखर यांनी रविवार, 27/11/2011 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
खाद्यपेये, धान्ये, भाजीपाला, या सारख्या उपभोग्य, ग्राहकोपयोगी व जीवनोपयोगी वस्तूंची किरकोळ विक्री केवळ छोट्या व्यापार्‍यांच्या आणि भारतीय कंपन्यांच्याच हातात असावी की त्यात परदेशी बड्या कंपन्यांना शिरकाव करू द्यावा या गेली 5 वर्षे गाजत असलेल्या व त्यावर अनेक उलट सुलट विचार मांडले गेलेल्या मुद्यावर अखेरीस भारताच्या मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आहे. काही अटीसह या क्षेत्रात परदेशी कंपन्यांना शिरकाव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयावर काही राजकीय पक्ष किंवा अडते बाजारातील दलाल, व्यापारी हे साहजिकच नाखुष असणार हे स्वाभाविक आहे.

बनाना लीफ ग्रीन चिकन

लेखक गणपा यांनी शनिवार, 26/11/2011 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. दिवाळीच्या सुट्टी नंतर आमची ही पहिली पाककृती. महिनाभर आयतच गिळायला मिळत होतं. त्यामुळे किचनकडे जास्त फिरकण्याची गरज पडली नाही. आता परत येरे माझ्या मागल्या. आज ग्रीन मसाला चिकन बनवलं होते. चांगलं लागल. मग म्हटलं तुम्हा सोबत शेअर करावं. फार काही कटकटीचं नाही. ४-५ मोठे चमचे हिरवं वाटण.

( चापट गालाले लागते )

लेखक जीएस यांनी शनिवार, 26/11/2011 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेचा वस्तुस्थितीशी काही संबंध आढळल्यास, एकाच नेत्याचे नाव सर्व घोटाळ्यांमधे वारंवार येणे हा जसा, तसाच तो ही एक योगायोगच समजावा. [चाल : "काळ्या मातीत मातीत" या कवितेच्या पहिल्या २ ओळी.] त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते साखर स्वस्तात पाठविते, साखर महागात आणिते साखर मध्यात साठविते, साखर तिजोरी भरिते \\१\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत.... प्याकेज कोनाला असते, प्याकेज कोनाला मिलते साहेब 'शहर' बांधिते, साहेब 'धरण' चोरिते \\२\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत.... जमीन कोनाची असते, जमीन
काव्यरस

का असे हे घडले ?

लेखक navinavakhi यांनी शनिवार, 26/11/2011 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा मी रडले, का असे हे घडले ? खरंच का ती इच्छा होती, का मनाची भीती ? का नाही मज उमगली, ही नात्यातील प्रीती कसे समजवू मी मनाला ? का मुकले मी आनंदाला ? खरेच का सर्व दोष फक्त माझा होता ? यास्तव प्याला का माझाच रिता होता ? वाटे एकदाच परत जावे कुशीत शिरून पुन्हा रडावे का नाही ही ओढ त्याला ? का न उमगे मजला ? काळही सरला, ना वेळही उरला संयम माझा पुन्हा ढळला
काव्यरस