Skip to main content

क्रांतीतै चे अभिनंदन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 28/11/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील सदस्या क्रांतीतै हिला विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक साहित्य पुरस्कारांत नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार 'असेही-तसेही' या गझलसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ५०००/- आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

एक बीचारे आण्णा

लेखक लीलाधर यांनी सोमवार, 28/11/2011 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक बीचारे आण्णा, पोटात घेत नव्हते अन्नाचा दाणा, भ्रष्टाचार मुक्त करिन म्हणाले देश माझा शाहाणा. आण्णांच्या सभेला माणसं यायची खूप, भ्रष्टाचारी मात्र प्यायचे एसी मध्ये बसुन हॉट सूप, पीउन झाल्यावर सूप बोलायचे खूप, फोन आहे, वीज आहे, दूध आणि पाणी आहे, ह्या सार्र्या कारभाराचं मंत्रालयातच मंत्र्यांच मंडळ आहे, म्हणून आण्णा आमची इथे चंगळ आहे, आमच्या द्रूष्टीनं मात्र तुमचं बोलणं वंगाळ आहे. भर सभेतून उठला एक शाहाणा, अहो आण्णा देश होईल शाहाणा, पण कोण वीकत घेईल मी बनवलेल्या चांदीच्या वाहाणा? कोण जाईल शिर्डीला, कोण जाईल तिरुपतीला, मी मात्र जाईन लवकरचं, वैकुंठाला. आण्णा तुम्ही करताय सारं काही नीट, पण मला
काव्यरस

सेलीब्रीटी वॅक्स म्युजीयम, लोणावळा

लेखक कपिलमुनी यांनी रविवार, 27/11/2011 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
आज रविवारी दुपारीच न मागता चहा चा कप ४ .३० ला मिळाला तेव्हाच समजला आज 'सरकार' फिरायच्या मूड मध्ये आहेत ..पुण्याच्या ट्राफिक मध्ये गाडी घालायची नव्हती मग लोनावाल्याच्या दिशेने जाऊ असा विचार केला ..तिथल्या म्युजियम बद्दल ऐकला होता.. पुण्याकडून लोणावळाचा टोल नाका ओलांडला की लगेचच डाव्या बाजूला सेलीब्रीती वाकस म्युजियम चा बोर्ड दिसतो .. सुनील कांडलोर या केरळी युवकाने हे म्युजियम सुरु केले आहे .. सकाळी ९:३० ते रात्री १० अशी वेळ आहे..आणि १०० प्रती व्यक्ती प्रवेश फी आहे..फोटोग्राफीला मान्यता आहे प्रवेश द्वार :

खांब, मार आणि मी

लेखक सोत्रि यांनी रविवार, 27/11/2011 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दुपार, मस्त मटण आणि रेड वाईन रिचवून तंगड्या वर करून, इंद्राच्या दरबारात रंभा, उर्वशी सारख्या कमनीय, रमणीय रमणींच्या घोळक्यात गप्पांचा फड लावून टवाळक्या करणार्‍या नशील्या स्वप्नात गुंग झालो होतो. तोंड उघडे पडून लाळेची एक तार गळायला लागली होती. ही लाळ रमणींच्या घोळक्यात असल्यामुळे नव्हती हा, ती माझी सवय आहे, भरपेट जेवण अंगावर आल्याची ती खूण आहे. तर, मस्त अशा नशील्या माहोल मध्ये असतानाच अचानक ठॅण... ठॅण... ठॅण... ठॅण... ठॅण... असले आवाज ऐकू येऊ लागले. एकदम गलका ऐकू येऊ लागला. भयंकर कुजबुजणारे आवाज प्रचंड वेगाने जवळ येऊ लागले. मी एकदम बावचळून गेलो की अचानक झाले काय?