Skip to main content

प्रेयसी

लेखक विवेकखोत यांनी बुधवार, 30/11/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
किती नाजूक ती लाजते लाजत माझ्या कडे बगते तुझ्या हसण्याने संजीवनी मिळते तुझ्या असण्याने शांतता मिळते माझे आयुष्य आता बदलले सुंदर तैलचित्र मनी जाहले किती तू अशी दूर राहणार किती ह्या काळजा जाळणार तुझा दुरावा आता सहन होत नाही जीवाची घालमेल आता बघवत नाही
काव्यरस

जीवन असेच पुढे सरकत असते...!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 30/11/2011 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट झाली कोंबड्याने बांग दिली मग चिमण्या पाखरांचा कलकलाट ऐकू आलां सायकलची घंटी वाजली चला पेपर आला. हे रोजचेच असते सकाळ झाली की उठणे भाग पडते चहाचा गंधही झिरपत येत असतो चहा पितापिता पेपर चाळत बसतो संप ,अपघात ,उपोषण ह्यांच्या शिवाय तो काय वाचतो ...? सिनेमाची जाहिरात बघत नाही घरबसल्या सिनेमा बघता येतो कोणताही महागाई तर वाढत असते नको ईतकी खिशाला पडलेले भोक वाढत असते तिळातिळाने....
काव्यरस

वाट !!

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 30/11/2011 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
वाटा तश्या अनेक असतात. प्रत्येकाची आपापली वेगळी असते. वाटा फ़ुटतात, वाटा हरवतात, वाट मिळते, वाट सापडते. वाट पाहिली जाते, वाट दावली जाते, अन वाट लावलीही जाते. कधी कधी आपल्याआपण वाट लागतेही. वाटा चोखाळल्या जातात, जोखल्या जातात. वाट वळणाची असते, वाट निसरडी असते, कधी वाटा वेगळ्या होतात, कधी वाट वाकडी करुन येण होत, अन कधी वाकड्या वाटेला जाण ही होत. कुणी आपापल्या वाटेने जात असतो, कुणास वाट दाखविणारा भेटतो, कुणी वाट अडविणारा असतो. कुणी वाट राखतो, कुणी वाट मारी करतो. कधी कधी वाटेला जायच नसत.गप आपापली वाट धरायची असते. वाटेला धरुन चालायच असत. तश्या वाटा तुम्ही आम्ही खुप पाहिलेल्या असतात.

आसुया

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 29/11/2011 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीची किमया; सारे विवस्त्र वक्ष तरूंचे हे नक्षत्रांची नक्षी जणु की निळ्या अंबरी मय भासे डौल लास्य कमनीय विशाखा चित्र रमलतम रेषांचे चित्रकार अवघ्या विश्वाचा थबकल्यापरी आभासे प्राण प्रियेचे विरही झुरले; सुकले तट का पानांचे ?- की कात टाकली नवजन्मास्तव उबवित अंकुर पंखांचे ? मज दिसतो रजशृंगार कळीचा मी भृंगासम अवतरतो समक्ष बघतो तृप्त नहाणे अंतर्यामी उलगडतो गुणगुणतो गाणे स्वप्नांचे नवी आवरणे पांघरतो सृजनकल्प आसुया जगण्याची वाटेवरती अंथरतो ........................अज्ञात
काव्यरस

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -१

लेखक दशानन यांनी मंगळवार, 29/11/2011 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
  • # हाच लेख मीमराठी.नेट येथे प्रकाशित झालेला आहे.
  • # हा लेख लिहताना शास्त्रीय माहिती अथवा त्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न न करता माझ्या नजरेतून जे मी पाहिले ते लिहले आहे.
प्रस्तावना : एखाद्या गोष्टीचे वेड जर मनात घेतलं तर ते पुर्ण केल्या शिवाय माझा आत्मा शांत राहत नाही, असेच एक वेडं मला मागच्या सोमवारी/मंगळवारी टिम गोवा यांनी गोवाच्या इतिहासावर लेखन करण्यास सुरूवात केली व पहिल्या भागामध्ये, विचार करावे व शोध घ्यावे असे काहीतरी सापडल

फरिश्ते

लेखक फारएन्ड यांनी मंगळवार, 29/11/2011 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालसा करायचे राहून गेलेल्या एका संस्थानातील ही कथा आहे. सदाशिव अमरापूरकर तेथील राजा असतो. त्याचा रथ, ड्रेस आणि हेअरस्टाईल पाहून जे कोण त्याच्याशी वाटाघाटीला आले असतील ते बहुधा "नॉट वर्थ इट" शेरा मारून तेथून निघून गेले असतील. हा राजा जनतेवर कसलेही मोटिव्ह नसलेले अन्याय करत असतो. त्यात तो तेथे भारताचा झेंडा लावू देत नसतो. एका अन्यायानंतर तेथील जनता - म्हणजे ए के हनगल- खुदाकडे कोणीतरी पाठवण्याची विनंती करते. मग दोन रोलर स्केट आकाशातून खाली पडतात. नंतर हवेतून तरंगत विनोद खन्ना व धर्मेन्द्र येतात.

सुटका

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी मंगळवार, 29/11/2011 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्याची जरा अधिकच फाकलेली किरणं. जणू सुटकेच्या प्रयत्नात. पण ब-याचदा ती समाधानी दिसतात कैदेतल माफक स्वातंत्र्य उपभोगताना उमटत जातात खुणा कधी कधी त्यांच्या बंडाच्या प्रकाशाच्या सावल्या जशा, आणि मग संध्याकाळी घाई घाईने ती गोळा करतात सगळ्या सावल्या आणि बांधून नेतात पुन्हा , नकोच पुरावा त्यांच्या बंडाचा, किंवा साध्या कुजबुजण्याचा सुद्धा. त्या सगळ्या सगळ्या सावल्यांमध्ये माझी सुद्धा सावली दिसते माझ्यातून फाकलेल्या धगधगणा-या, पोळलेल्या, किरणांसकट तेव्हा समजते निरर्थक धडपड, किरणांची नव्हे तर सूर्याची स्वतःपासून सुटण्याची!
काव्यरस