Skip to main content

तंदूरी खेकडे / क्रॅब्स्

लेखक गणपा यांनी शनिवार, 10/12/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
काय, तोंडाला पाणी सुटलं की नाही नाव वाचुनच? :) माझंही असच होतं खेकड्याचं नाव काढलं की. काल मस्त मोठ्ठे खेकडे मिळाले. म्हटल नेहमीच्या कालवणापेक्षा आज काही वेगळं करुन पहावं. मागे एका जालीय मैत्रीणीच्या जालनीशीवर तंदूर खेकड्याचे फोटो पाहिले होते. म्हटलं चला हेच करुन पहावं. मंडळी तस ही पाककृती करायला एकदम सोप्पी कमी वेळ काढू आहे. पण तरी तुमच्याकडे वेळ मुबलक हवा. अहो चवीने खायचं तर तेवढी फुरसत हवीच.

पाकिस्तानींनाही आहे नरेंद्र मोदींचे आकर्षण

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 10/12/2011 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
अहमदाबाद - चीन आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एशिया इंटर-डाय-एग्झिबिशनमध्येही नरेंद्र मोदींची लोकप्रियता दिसून आली. येथे उपस्थित पाकिस्तानी उद्योगपतींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत उभे राहून फोटो काढण्यासाठी चढाओढ दिसून आली. यावेळी मोदींनी आपल्या कोणत्याही चाहत्याला निराश होऊ दिले नाही.

दृष्टी...समाज...

लेखक मन१ यांनी शुक्रवार, 09/12/2011 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
डर्टी पिक्चर च्या धाग्यांवर विचार करताना जाणवलं:- स्त्री च्या निव्वळ शरीराचं हपापलेल्या पुरुषांना आकर्षण असतं असं म्हटलं जातं. हरेक जाहिरातीत स्त्री लागतेच. शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीतही स्त्री हवीच. अशाच काही विशेष गोष्टी पुरुषांनीच वापरायच्या असूनही त्याच्या जाहिरातीत फक्त स्त्री आणि केळ वापरून जाहिरात केली गेली होती.

का?

लेखक गोमटेश पाटिल यांनी शुक्रवार, 09/12/2011 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या ओटान्वरति आहे पण तु अशी अबोल का? जणु नदि भरून वाहुन त्याचे पाणि खोल का? डोळ्याने बोलतेस ओट तुझे बन्द का? जणु पारिजात खुलुन त्याचा सुगन्ध मन्द का? तुझ्या मनामध्ये आहे पण मन असे सुन्ध का? जणु पहिला पऊस मतित पडून त्याचा असा दुर्गध का? तुझ्या ह्रदयामध्ये आहे पण तुझा हा नकार का? जणु इतका उजेड असताना अन्धराचा आधार का?

वैषम्य

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 09/12/2011 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
मळक्या; उरात जखमा; ते लेकरू अडाणे शामल अशांत वेळी मातेस बिलगलेले माता-कुशीत दूजे त्याचे अकांत रडणे पोटात कोंब तोही; सारे कसे भुकेले डोळ्यात खोल करुणा स्वामित्व लोपलेले ना गोत; ना किनारा आशेत हरवलेले व्याकूळ काळजाचे; हे; रोप दीनवाणे परसात वेदनेच्या बांधून शकट गेले अस्वस्थ मी भिडस्त माझेच गाइ गाणे ओठी चणे दयेचे, अवघे दुरून पाही डोहात आंसवांच्या चंद्रसवे नहाणे देहास ज्ञात नव्हते निर्वस्त्र हे रहाणे ही जात माणसांची कैसी अशी विखारी बांधे कुणी मनोरे कोणी न पायरीही मातीतले स्वरूप मातीस ना विचारी देठास विषम काटे सुमनेहि पाठमोरी ........................अज्ञात
काव्यरस

"पारंबी" एक वेगळा चित्रपट

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 09/12/2011 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझा मित्र सतिश सलागरे यांनी दिग्दर्शित केलेल्या " पारंबी" या चित्रपटाचा प्रिमिअर शो पाहाण्याचा योग आला.. अंधेरीच्या फन रिपब्लिक मध्ये या चित्रपटाचा प्रिमिअर शो होता..अतिशय साधे पण तितकेच विचारप्रवणीय कथानक..खेडेगावातील एक गरिब तरूण शिक्षण घेउन आल्यावर , गावाची परिस्थीती बघून आपलच गाव सुधारण्या प्रयत्न सुरू करतो.. हे करत असतांना त्याला काय अडचणी येतात, त्यातून तो नायक कसा मार्ग काढतो.. अशी साधी कथा.. भूषण प्रधान.