Skip to main content

मारिओ मिरांडा

लेखक ए.चंद्रशेखर यांनी सोमवार, 12/12/2011 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
1970 च्या दशकातील काही वर्षे मी मुंबईला नोकरी करत असे. अंधेरीला राहून रोज सकाळी लोकल ट्रेन पकडायची. मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाल्यांमार्फत आलेला डबा लंच टाईम मधे खायचा व संध्याकाळी परत एकदा लोकल ट्रेनमधला गर्दीचा प्रवास करायचा असा माझा मुंबईच्या इतर हजारो किंवा लाखो चाकरमान्यांसारखा दिनक्रम असे. त्या वेळी करमणुकीची काही फारशी साधनेच उपलब्ध नव्हती. सिनेमा म्हणजे बहुधा हिंदी सिनेमे, ते सुद्धा ठराविक ठशाचे, हिरो, हिरॉइन, खलनायक, गाणी शेवटी ठिश्यां ठिश्यां! आणि गोड अखेर, या धर्तीचे! मासिके सुद्धा फारशी नसत. आणि जी काय मिळत त्यांची छपाई तितपतच असे. याच काळात नंतर इंदिरा गांधीनी आणीबाणी लागू केली.

सुकट-मसाला

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 12/12/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी सुकट (सुकी-करंदी) डोके काढून, पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवावी.

ब्रजवासी जगन्नाथ

लेखक हरिकथा यांनी रविवार, 11/12/2011 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर जगात जितकी म्हणून ठिकाणं आहेत ती सगळी त्रिलोकपति भगवंतांचीच आहेत आणि आपल्या परमात्मस्वरूपात तेच सर्वत्र विराजमान असतात. असं असलं तरीही त्यांना जितकी ब्रजभूमी प्रिय आहे तितकी बाकी कोणतीही जागा नाही. ते स्वतः जगभरात त्यांच्या निरनिराळ्या रुपात उपस्थित असतात पण त्यांच्या अशाच एका ब्रजभूमीपासून दूर असलेल्या विग्रहरुपामध्ये ब्रजवासाची तीव्र इच्छा जागृत झाल्यास ती काही आश्चर्याची बाब म्हणताच येणार नाही. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी यमुनानदीकाठच्या ब्रजवासाची - ब्रजभूमीमध्ये निवास करण्याची इच्छा झाली पुरीच्या जगन्नाथांना!

मराठी ज्ञानसागरात मोलाची भर आणि मिनी कट्टा अर्थात परीकथेतील राजकुमार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन १० डिसेंबर २०११

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 11/12/2011 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपले लाडके मिपाकर परिकथेतील राजकुमार (परा) ऊर्फ प्रसाद ताम्हनकर यांच्या 'संगणकावर मराठी कसे लिहावे' या पुस्तकाचे प्रकाशन काल संपन्न झाले. मनसेचे स्थानिक नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी 'महाराष्ट्र धर्म' हे प्रदर्शन आयोजित केले होते, त्यात पुस्तक प्रदर्शन, बोधनकरांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन स्टॉल होते. कार्यक्रमाला कोणकोण येणार याची फोनाफोनी ३-४ दिवसांपासून चालू होती. कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ठरला होता पण तेव्हा गर्दी असेल म्हणून ६ वाजताच जमायचे ठरले होते.

सुंदर चित्र ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 11/12/2011 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
खूप सुंदर चित्र काढले होते तिने आजुबाजुला मस्त हिरवळ भले भरलेले वृक्ष गिरक्या घेत होती पाखरे कधिपण चिवचिवाट करतील ईतकी जिवंत सुरेखशी पायवाट नि आजुबाजुला दोन घरे खूप आवडून गेले म्हणालो :एक घर माझे एक घर तुझे तिने हसून बघितले नि म्हणाली ओ.के.
काव्यरस

गरम करून साखर घालून प्यायची 'वाईन' ?

लेखक sagarparadkar यांनी शनिवार, 10/12/2011 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय सोकाजीरावांची माफी मागून हा छोटासा धागा काढत आहे ... कारण आम्ही पेठेतले, द्राक्षासवातील मद्यार्काच्या प्रमाणावर चर्चा करणारे 'पुणेकर' ... परवा झुरिचच्या मुख्य रेल्वेस्टेशनवर (हा "मी सध्या झुरिचला राह्तोय" हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न नाही) एका घरगुती वाईन चा स्टॉल पाहिला. धुंद करून टाकणारा त्या वाईनच्या सुवासामुळे आणि हे घरगुती प्रकरण काय आहे ते बघावे ह्या नसत्या चौकसपणामुळे नकळतच तिकडे गेलो. स्टॉलजवळ अनेक रसिक त्या वाईनचा स्वाद घेत गप्पा मारत उभे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या प्रत्येकाच्या कपमधून चक्क वाफा बाहेर पडत होत्या.