माननीय सोकाजीरावांची माफी मागून हा छोटासा धागा काढत आहे ... कारण आम्ही पेठेतले, द्राक्षासवातील मद्यार्काच्या प्रमाणावर चर्चा करणारे 'पुणेकर' ...
परवा झुरिचच्या मुख्य रेल्वेस्टेशनवर (हा "मी सध्या झुरिचला राह्तोय" हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न नाही) एका घरगुती वाईन चा स्टॉल पाहिला. धुंद करून टाकणारा त्या वाईनच्या सुवासामुळे आणि हे घरगुती प्रकरण काय आहे ते बघावे ह्या नसत्या चौकसपणामुळे नकळतच तिकडे गेलो.
स्टॉलजवळ अनेक रसिक त्या वाईनचा स्वाद घेत गप्पा मारत उभे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या प्रत्येकाच्या कपमधून चक्क वाफा बाहेर पडत होत्या. स्टॉलच्या काउण्टरवर 'साखर' भरलेली बाटली होती आणि लोक त्यातील साखर त्या वाईनच्या कपात घेवून चक्क 'गरम' आणि 'गोड' वाईन घेत होते.
हा प्रकार माझ्या पेठेतील वाईटमनावर चांगलेच बाल परिणाम करणारा ठरला. मग मीदेखील त्या रसिकांच्या गर्दीत सामील होवून थोडे गोड आणि गरम मद्यप्राशन केले ... आणि काय सांगू महाराजा .... ती वारूणी त्या थंडीत एकदम एक सुखद ऊब देऊन गेली. आता एव्हढी उच्च वाटणारी ती वाईन घरी घेऊन आलो.
तेव्हाच सोकाजीरावांची आठवण येत होती, म्हटलं रावांकडून ह्या "ग्ल्युवाईन" बद्दल थोडं ज्ञानार्जन झाल्यास बरं
वाचने
3321
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
चिरोटा, स्पेलिंग Zurich आहे,
In reply to वा by चिरोटा
मल्ड वाईन?
मुआफ किया .... :)
मस्त प्रकार आहे तो महाराजा!!
In reply to मुआफ किया .... :) by सोत्रि
फोटो टाकले असतेत तर अजुन मजा
फोटो टाकायचा अयशस्वी प्रयत्न
In reply to फोटो टाकले असतेत तर अजुन मजा by सोत्रि
Gluhwine चा फोटो
ग्लु वाईन....
रेडवाईन + ग्लु वाईनचे विशिष्ट
In reply to ग्लु वाईन.... by स्वाती दिनेश
+१
In reply to रेडवाईन + ग्लु वाईनचे विशिष्ट by गणपा
वाह... सहीच !!!