Skip to main content

शशक'२०२२ - पेच

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 12/05/2022 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
शुभमंगल वधू वर सूचक केंद्राच्या संचालिका, प्रमिला ताई यांचे फार नाव होते. वक्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका अशी अनेक बिरुदं त्या मिरवीत होत्या. ऑफिस बंद करायच्या गडबडीत त्यांनी सेक्रेटरीला हाक मारली, मुग्धा, ती मंगळी मुलामुलींची यादी, अमेरिकेतील वरवधू, अपंग वर वधू, पत्रिका पाहणारे, न पाहणारे सगळे नीट सॉर्ट करून ठेवलेस नं? नाहीतर खूप गोंधळ उडतो बघ क्लायंट्स समोर! 'आत येऊ का मॅम ..? ' एक गोरटेली, नाजूक मुलगी विचारत होती. 'ये, ना. कुणाचं नाव नोंदवायचे आहे?' प्रमिला ताईंनी विचारलं. 'अं....माझंच..म्हणजे....'. ती चाचरत म्हणाली. 'पण..तुमच्याकडे LGBTQ ची स्वतंत्र यादी असेल ना..?

शशक'२०२२ - हाऊ डिड यू डाय?

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 12/05/2022 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
“आर्टीफिशिअल इंटेलिजन्सची कमाल आहे” “पण हे सॉफ्टवेअर कसं काम करतं?” “भूतकाळातल्या व्यक्तीचं लेखन आणि त्या व्यक्तीचा मूळ आवाज या सॉफ्टवेअर मध्ये फीड करायचा” “ओके मग?” “हे सॉफ्टवेअर ती सर्व माहिती प्रोसेस करतं” “आणि त्या व्यक्तीचा मूळ आवाज शोधून काढतं?” “फक्त शोधून काढत नाही, तर त्या व्यक्तीच्या मूळ आवाजात बोलतं सुद्धा” “महाराजांशी सुद्धा बोलता येईल?” “नाही, मूळ आवाजाचा नमुना फीड करावा लागतो” “ओह.. आता मग कोणाशी बोलता येईल?” त्या सायंटिस्टने कॉम्पुटरच्या स्क्रीनच्या पहिल्या नावावर क्लिक केले “हॅलो हाय.. सर... इज धिस मिस्टर बोस?” “येस” “सर..

शशक'२०२२ - बाप

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 12/05/2022 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको? रात्री दोन वाजता बापाने छाती धरली, हार्टेटॅक!