Skip to main content

अवलिया विचारवंत - नरहर कुरुंदकर.

लेखक राजघराणं यांनी शुक्रवार, 10/02/2012 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
तीस वर्षापूर्वी एक प्रभावी वक्ता स्टेजवरच मरण पावला. तो मॅट्रीक पास झाला तेंव्हा त्याची पुस्तके बीए च्या अभ्यासक्रमासाठी लावली होती आणि बीए 'ना'पास झाला तेंव्हा एम ए चे विद्यार्थी त्याची पुस्तके अभ्यासत होते. त्यांची भाषणं जेव्हढी लोकांना चक्रावून टाकणारी असत तेव्हढाच त्यांचा म्रुत्यू ही होता. औरंगाबादेत भाषणाची सुरवात करताच रणांगणावरील योध्याप्रमाणे १० फेब्रूवारी १९८२ ला कुरुंदकर गुरुजी व्यासपिठावरच कोसळले. त्यावेळी त्यांच वय होतं पन्नास वर्ष.

सोडत धूर-चाचणी इंजिन झुक झुक करते ... (हझल)

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 10/02/2012 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
सोडत धूर-चाचणी इंजिन झुक झुक करते ... (हझल) सोडत धूर-चाचणी इंजिन झुक झुक करते सोसली नसे त्यांची छाती फुक फुक करते करून दाखविले, पण बघण्या कोणी नव्हते बाण सोडण्या दोरी आता चुक चुक करते घड्याळातले काटे आता थकले बहुधा म्हणून यांना त्यांना आता शुक शुक करते हातावरच्या रेषा आधी समजुन घ्या रे... नंतर म्हणू नका की, नशीब टुक टुक करते कमळावर दवबिंदू जमती चमकुन घेण्या देठ अजुनही चिखलामध्ये लुकलुक करते हत्ती इतकी माया त्याची कुठे वाढली ? निळा रंग माखून उगाचच पुक पुक करते कुणाशी नसे बांधिलकी पण सतत बोलतो खार जशी की पळत सारखी कुक कुक करते
काव्यरस

फरियाबाग ....

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 10/02/2012 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
"फरियाबाग " मागील भागात आपण भुइकोट किल्ल्याची माहीती घेतली आजच्या भागात जाणुन घेउया " फरियाबाग" या वास्तु/इमारती/महालाबद्द्ल :) या ईमारतीचा इतिहास थोड्क्यात :- हे आहे हेन्री कझेन्स या युरोपियन इसमाने, साधारण इ. स. १८८० च्या दशकात, काढलेलं फारिया बागेचं छायाचित्र. इतिहास : अहमदनगर हे शहर आताच्या आधुनिक भारतात, महाराष्ट्र राज्यात येतं. हे शहर निझामशाहीतलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं शहर होतं.

वातापिगणपतिं भजेऽहम् ॥

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 10/02/2012 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
#जालावर आधीच प्रकाशित केला होता हा लेख. आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्त इथे देत आहे. हंसध्वनी- एक प्रसन्न असा 'ओडव-ओडव' राग. (ओडव-ओडव म्हणजे ज्याच्या आरोहात आणि अवरोहात प्रत्येकी पाच स्वर येतात असा राग) अतिशय साधा, पण तितकाच प्रसन्न राग- हंसध्वनी! हंसध्वनी हा 'बिलावल' थाटातला राग. बिलावल थाट म्हणजे सगळे स्वर शुद्ध. असं म्हणतात, की बिलावल गात चालणार्‍या त्यागराजाचा पाय एका प्रेताला लागला, आणि ते प्रेत जिवंत झाले. (त्यागराज- कर्नाटक शास्त्रीय संगीताचा आधारस्तंभ.) ह्यावरून बिलावल (कर्नाटक पद्धतीतले बिलावलचे नाव 'बिलहरी') रागाला 'संजीवन राग' असे नाव पडले.

महाभारत - भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?

लेखक महानगरी यांनी शुक्रवार, 10/02/2012 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे. तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ? माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो. कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल युधिष्टिर - मनोज वाजपेयी भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व अर्जुन - अक्षय खन्ना कुंती - शबाना आझमी ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती ता. का.

घायाळ चिमणी

लेखक मनमोकळि यांनी शुक्रवार, 10/02/2012 05:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक घायाळ चिमणी “प्रेम” तु जवळ असतांना माझे तुझ्याकडे बघणे लाजाळू पणे.. तु जवळ नसतांना तुला पाहण्याची तळमळ.. माझा लाजाळू पणा खूप आवडायचा ... तुझ्या त्या लाजाळू चिमणी ला आज तू सोडून चाललास... तू जवळ होतास पण लांब, मी तुला लपूनछपून बघायची तू म्हणायचास तुझे डोळे माझ्या कडे बघायची तळमळ नशा.. तुझ्या त्या नशील्या चिमणीला आज तू सोडून चाललास यालाच “प्रेम” म्हणायाचय काय?

**** चांडाळ चौकडी ****

लेखक वपाडाव यांनी शुक्रवार, 10/02/2012 04:05 या दिवशी प्रकाशित केले.
परवा, राजश्री मराठीच्या तुनळीवरील पोतडीत ढुंकुन पाहताना, चित्रपटाची लिंक गवसली. म्हटले चेपु-चेपु करण्याऐवजी, क्लासिक सिनेमा आहे बघावे दोनेक तास खर्ची घालुन. _____________________________________________________________ तर मंडळी चित्रपट आहे चांडाळ चौकडी.... चित्र : आंतरजालावरुन साभार... या चित्रपटाची कथा एका गावातील काही पात्रांच्या अवतीभोवती फिरते.

नाते मुला॑शी...मनाचे...

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 09/02/2012 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
नाते मुला॑शी...मनाचे... 'मुले म्हणजे देवाघरची फुले'..सुविचार तर नेहमी आमच्या ओठावर असतो. पण अलिकडे तो ओठावरुन पोतात गेलेला फारसा दिसत नाही. या फुला॑शी मनाचे नाते जोडण्याचा प्रयत्न आम्ही फारसा करत नाही. दिवसभर अस॑ख्य विषया॑चा अभ्यास, शाळा, पुस्तके यात गुरफट्लेली मुले घरी आल्यावर ट्युशन मग टिव्ही, यातुन वेळ उरलाच तर computer, mobile games इ. मध्ये या फुला॑चा पार पाचोळा होऊन जातो. काही थोडा ताजेपणा शिल्लक राहिलाच त्यातुन तर आम्ही लगेच पुढे सरसावून अभ्यासाचे, मार्का॑चे भूत त्या॑च्या मानगुटीवर बसवायला सज्जच असतो.

भावगीते..

लेखक utkarsh shah यांनी गुरुवार, 09/02/2012 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
असेच आंतरजालावर भ्रमंती करताना मला e-snips वर काही भावगीते सापडली. या ठिकाणी मराठी भावगीतांचा चांगला संग्रह करण्यात आलेला आहे. ही सारी भावगीतं तुम्ही ऑनलाईन ऐकू शकाल आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीचं भावगीत डाऊनलोड करुन घ्यावंसं वाटलं, तर डाऊनलोडसुद्धा करू शकता. फक्त त्यासाठी त्यांचा म्हणजे e - snips चा downloader bar तुमच्या संगणकावर उतरवून घ्यायला लागेल. खरे तर हा लेख मी खरडफळ्यावर टाकू शकलो असतो, पण जे मिसळपाव चे सदस्य नाहीत त्यांना खरडफळा दिसत नसल्याकारणाने मी हा लेख इथे टाकला.

क्रोशे - टेबल रनर

लेखक जयवी यांनी गुरुवार, 09/02/2012 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
हे आधी असे चौकोनी तुकडे करुन घेतले. DSC00419" width="480" height="360" alt="" /> मग ते जोडायला सुरवात केली. DSC00421