Skip to main content

निवडणुक...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 25/02/2012 05:13 या दिवशी प्रकाशित केले.
सुकलेला का होइना..?पण कुणीसा गाडीला घातला होता गजरा या निमितानी मी माझ्या.. गाडीलाच केला मुजरा काय सालं नशिब हीचं..? पाहिलं तरी फिदा होतात आंम्ही कडक कपडे घालतो तेंव्हा,कोण जाणे या कुठे जातात..? जरी असल्या या आजुबाजुला तरी, नळाला पाणी यावं तश्या बोलतात आल्याच समोर तर नंतर मग, मागे जाऊन कुजबुजतात. ''हँडसम दिसतोय गं...हम्म्म्म, पण कपड्याचा चॉइस बरा नाहीये दिसतोय जॉन अब्राहम सारखा.., पण अ‍ॅटिट्यूट काही खरा नाहीये..'' ''ए,,तुला काय करायचाय अ‍ॅटिट्युट..? नुसतं नाव विचार ना..?'' ''शी...!नाव काय विचारायचं..? त्यापेक्षा डायरेक्ट फोन नंबर घे ना..!'' असे पिछाडीला संवाद घडुन सैन्य
काव्यरस

झटपट नाश्ता-गुळ पोहे.

लेखक ज्योति प्रकाश यांनी शनिवार, 25/02/2012 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)जाडे पोहे. २)खवलेले खोबरे. ३)बारीक किसलेला गुळ. ४)चिमूटभर मिठ. ५)साजुक तुप. कृती :-प्रथम जाडे पोहे धुवून घ्यावे.

रात्ररात्रभराची ही जागरणं

लेखक Gajanan Mule यांनी शुक्रवार, 24/02/2012 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
रात्ररात्रभराची ही जागरणं नि प्रत्येक घटकेला येणारी तुझी सय अस्वस्थ मनाचं उनाड वागणं ... स्वतःलाच पुन्हा पुन्हा काहीतरी मागणं... चालता चालता एकटं नसल्याची जाणीव ... आणि आजूबाजूला भेडसावणारी तुझी उणीव ... चांदण्यांनी माझ्या नकळत हिरावून घेतलेली माझी झोप ... आणि माझ्या अंगणातलं तुझ्या कवितेचंरोप ... घेऊन जा ... खूप वाढलंय आणि दिवसेंदिवस अधिकाधिक वाढतंच चाललय हे ... रात्ररात्रभराची ही जागरणं .. नि प्रत्येक घटकेला येणारी तुझी सय . - गजानन मुळे
काव्यरस

पिल्ले ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 24/02/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/20678 ८ फेब. १२ ला कुत्रीने पिल्लांना जन्म दिला होता. आम्ही घरी नव्हतो. आल्यावर हे सर्व दिसले जाणवले.वैतागून गेलो. पण पिल्लांना नि पिल्लांच्या आईला बाहेर कसे काढणार . .? मनात थोडा थोडा करुणेचा प्रकाश झिरपत होता . आम्ही विचार करून तिला अंगणातच राहू देणे मंजूर केले .मग तिला रोज काहीना काही खायला पण देत होतोच. ती खातपण होती. आम्ही दिसताच शेपूट हलवीत होती. तिच्या आर्जवीपणाचा राग येत होता . मग आम्ही आमच्याच मनाला गोंजारून समजावीत होतो आजकाल उष्मा वाढला होता.

खारी बिस्किट

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 24/02/2012 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
खारी बिस्किट हे सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे. आता त्यात ही आपल्या भारतात बेकर्‍यांमध्ये सहज उपल्बध असते मग कशाला कोणी हे बनवण्याच्या भानगडीत पडेल ;) हल्ली परदेशातही बर्‍याच ठिकाणी एशियनशॉपमध्ये ही खारी, टोस्ट, नानकटाई अगदी सहज मिळून जाते , पण आमच्यासारखे खारीप्रेमी ज्यांना इग्लंडात (शेफिल्ड) राहूनही मिळत नाही त्यांना तर फक्त आठवणीनेच पोट आणी मन भरुन घ्यावं लागतं.

पक्षी निरिक्षकांचे नंदनवन Little Rann of Kutch .

लेखक Manish Mohile यांनी गुरुवार, 23/02/2012 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून कदाचित त्यात थोडासा विरोधाभास दिसेल. कारण रण म्हटले म्हणजे आपल्या डोळ्या समोर येते मैलोंन मैल पसरलेली रखरखीत रुक्ष जमीन, विखरलेली काटेरी झुडपं. अशा जागी पक्षी आणि ते सुद्धा फ्लेमिंगोज, पेलिकन्स सारखे पक्षी दिसणं कसे शक्य आहे? पण हे सत्य आहे. पावसाळ्यामध्ये जो काही थोडा बहुत पाऊस पडतो ते पाणी नंतर हळूहळू सुकू लागते आणि हिवाळ्यापर्यंत जमीन पाणथळ (काही अंशी दलदलीची) बनते जी पक्ष्यांसाठी आदर्श असते. कच्छचे रण सगळ्यांना माहीत आहे. आपल्या भारत देशाची पश्चिम सीमा. "रिफ्यूजी" चित्रपटामध्ये खुपसं चित्रीकरण या रणातील आहे. पण ते GRK - Greater Rann of Kutch.

((मी सदस्य होणारच!))

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 23/02/2012 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20789 आमच्या एका मित्राला तुम्ही कुणीच ओळखत नाही. दरवेळी अडचणीत सापडला किंवा एखाद्या नवीन ध्येय धोरणाने पछाडला गेला की आमचा हा मित्र, हा सखा, सुहृद आमच्याकडे धाव घेत असतो. त्याच्या दृष्टीने तो म्हणजे सुदामा आणी मी म्हणजे कृष्ण, तो म्हणजे हृतीक आणि मी म्हणजे राकेश, तो म्हणजे ओमार अब्दुल्ला आणि मी म्हणजे शेख अब्दुल्ला, तो म्हणजे दीप दासगुप्ता आणि मी म्हणजे गांगुली असे बरेच काय काय आहे.