कुणी सांगा ......सुख म्हणजे नक्की काय असतं ?
जगी सर्वसुखी असा कोण आहे ....? .......विचारी मना तूच शोधोनी पाहे.
समर्थ रामदासांनी शेकडो वर्षांपूर्वी हे वाक्य लिहून ठेवले आहे. या वाक्यातून प्रक़्श्न निर्माण केला नसून मनुष्य स्वभावाचे वर्णन केले आहे . मोठ्या सुखांच्या मागे लागलेल्या माणसाची अवस्था नेहमी भांबावलेली असते कारण सुख मिळत नाही आणि त्याची चातकासारखी वाट बघणे असते आणि ते जेंव्हा समोर येते तेंव्हा उशिरा मिळाल्याचा खेद होत असतो . पुन्हा हे सुख कधी मिळणार या विचारात सुख खर्या अर्थाने उपभोगतच येत नाही .
मिसळपाव