Skip to main content

चालुक्यांची बदामी.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 29/02/2012 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
बदामी. हंपी, ऐहोळे, बदामी इत्यादी ठिकाणांची मधे जे फोटो काढले ते आत्ता टाकत आहे. लिनाबाईंचे आभार मानायला पाहिजे कारण मी हे फोटो विसरलो होतो. बरेच आहेत पण त्यातील काही निवडकच टाकतो नाहीतर खूपच पाने भरतील. दुसरे म्हणजे यात इतिहास अजिबात लिहीत नाही कारण मग लेख नेहमीप्रमाणे “क्रमश:” करावा लागेल. सध्या मुसोलिनी पूर्ण करायचे असल्यामुळे तो मोह टाळला आहे. :-) गेल्या गेल्या हा गुलाबीसर रंगाचा दगड नजरेत भरतो.

पुन्हा बालभारतीच्या शाळेत शिकायचं आहे?

लेखक सागर यांनी बुधवार, 29/02/2012 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, तुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात? खूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना? तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे? अगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल. तर आपल्या आवडत्या बालभारतीने पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरुपात आणि तेही सर्व माध्यमांतील (मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, इत्यादी) उपलब्ध करुन दिलेली आहेत. आहे की नाही मज्जा? :) येथे टिचकवा आणि हवी ती शाळेतील पुस्तके उतरवून घ्या मी सध्या आठवीचे बालभारती वाचतो आहे ;) तुम्ही???

प्रेयर्स फॉर बॉबी

लेखक प्रसाद प्रसाद यांनी बुधवार, 29/02/2012 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तीन चार वर्षापूर्वी शिक्षणानिमित्य पुण्याला जावून राहण्याचा योग आला, नवीन बरेच मित्र मिळाले. आत्ता मी पुण्यात नसतानाही हे मित्र कायम फोनवरून, ईमेलवरून संपर्कात असतात, त्यापैकी एका मित्राच्या बाबतीत अतर्क्य घडले, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. वास्तविक मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला चांगला ओळखतो. उच्चशिक्षित कुटुंब त्याचे. लगेच मी पुण्याला गेलो आणि तिथे कळले की ह्या मित्राला लग्नाचा घरी आग्रह झाला तेंव्हा त्याने असे केले. त्याला काय वाटते त्याची त्याने आई वडिलांना अगोदरच कल्पना दिली होती पण ते ऐकून वडिलांना धक्का आणि आई संतापली होती.

एक कविता

लेखक राजो यांनी बुधवार, 29/02/2012 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती.

'सचिन'चे महाशतक : आमचाही धागा

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 29/02/2012 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारताची क्रिकेटमधे श्री लंकेबरोबर गाठ पडली. भारतीय क्रिकेट टीमची सध्याची स्थिती आणि गती पाहता कुठल्याही आशा नव्हत्याच. अपेक्षा नाहीत त्यामुळे अपेक्षाभंगाचे दु:खही नाही. असा सुज्ञ विचार भारतीय क्रिकेटरसिक करू लागलाय.

ईशान्य भारत ...

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 28/02/2012 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी समजून घेता का....कोणी उमजून घेता का.....?? आक्रोक्ष माझ्या जगण्याचा....कोणी जाणून घेता का....?? कुणाचा असेल हा जीवघेणा आकांत..?? चिमुकल्या स्त्री गर्भाचा कि दंगलीत होरपळलेल्या कुटुंबाचा..?? सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा कि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा..?? अपयशी विद्यार्थाचा कि महागाईच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्याचा....कुणाचा...?? भारतीयच परंतु प्रगत रस्ते, वेगवान मोटारी, हवे तेवढे मॉल्स, सुसज्ज दवाखाने, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा सर्व सुख सोयीपासून वंचित असलेल्या ईशान्य राज्यांकडील लोकांचा हा आवाज आहे . मागासलेपणा, दळणवळणाची अपुरी साधने, उच्च शिक्षणाच्या अल्प सोयी, जबरदस्तीने होणारे ख्र

मराठी दिनानिमित्त काही अस्सल मराठी अभिव्यक्ती..

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 28/02/2012 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
काही अस्सल मराठी अभिव्यक्ती ..! फारा दिवसांपासून आम्ही ‘अमृताते जिंकीत पैजा..’वाल्या मराठीच्या अस्सल अभिव्यक्तींचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण अलीकडे मराठी भाषेची क्षितिजे मुंबई नगरी प्रमाणेच अस्ताव्यस्तपणे विस्तारल्याने अस्सल काय नि नक्कल कोणती याबाबत आमचा अंमळ गोंधळ व्हायला लागलाय. याबाबत अस्सल मराठी अभिव्यक्तीच्या व्यासपीठावरील विद्वानांचा व विदुषीनचा सुयोग्य व सूज्ञ सल्ला मिळेल या आशेने आम्ही आलो आहोत. इंग्रजी भाषेचा आहे तसा मराठीचा जागतिक स्तरावरचा शब्दकोष अजून का बनवला गेला नाही याची कारणे आम्हाला मराठी अभिव्यक्तींचा अभ्यास करताना समजली.