Skip to main content

सिंधुदूर्ग

लेखक प्रभाकर पेठकर यांनी मंगळवार, 10/04/2012 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
कोंकणात भटकायचे तर पावसाळा संपल्यासंपल्या लगेच जावे. सगळीकडे निसर्गाचे विलोभनिय दर्शन होते. छायाचित्रकारांना तर पर्वणीच. पण काही कामा निमित्त हल्लीच मालवण आणि गोवा अशी सफर केली. काही निसर्गचित्रे कॅमेरात बंदिस्त केली. तीच आज तुमच्या आस्वादासाठी सादर करीत आहे. सौंदर्याचे वरदान लाभलेला मालवण किनारा.

नीतिमत्ता

लेखक सहज यांनी मंगळवार, 10/04/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
वडीलोपार्जीत संपत्ती? मानवतेचा ठेवा? स्त्रीधनच. बहुतेक वापरु की नको? जग कुठे चालल्लेय? ---------- उधळ्या इसाप भरपूर वाटून, झाला सुप्रसिद्ध! आता, मी वाटून काय उपयोग? आणि हो, घाबरतोय कोण कुप्रसिद्धीला? ----------------------- ती ना? नसतेच राजकारण्यांकडे, सरकारी बाबूंकडे आणि भांडवलशहांकडे. म्ह्णूनच मीही वापरत नाही. कशाला त्यांची वक्रदृष्टी? -------------------------- म्हणाली, मला स्वातंत्र्य द्या. तुमच्या आयुष्यात स्थान द्या. नाही जाणार पळून, नाही होत मी भ्रष्ट. ज्यांनी दिले, ते अजरामर झाले. स्साली, जरा बोलू दिले, तर पोहोचली थेट माझ्या मरणापाशी..

युजीसी च्या जुन २०१२ च्या नेट परिक्षांच्या तारखा काय?

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 10/04/2012 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! माझ्या चुलत भावाला युजीसी ची नेट (National Eligibility Test (NET)) जुन २०१२ ची परिक्षा द्यायची आहे. या नेट चे अधिकृत संकेतस्थळ हे आहे. तसेच या लिंकवर अधिक माहिती आहे आणि या लि़ंकवर फॉर्म कसा भरावा असली माहिती आहे. या युजीसी च्या नेट परिक्षेच्या जुन २०१२ या दरम्यान होणार्‍या?परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागतात. वर उल्लेखलेल्या अधिकृत संकेतस्थळावर २०११ च्या परिक्षांचे वेळापत्रक किंवा तत्संबंधीत तारखा आहेत.

मसाला बांगडा

लेखक दिपाली पाटिल यांनी मंगळवार, 10/04/2012 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
बांगडे लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस:
  1. ४ बांगडे
  2. अर्धे लिंबू किंवा छोट्या लिंबाएवढी चिंच
  3. ३ टेस्पून लाल तिखट
  4. १/२ टीस्पून हळद
  5. १ टेस्पून धणे पावडर
  6. २ टेस्पून कांदा-लसूण मसाला (किंवा गरम मसाला, फिश मसाला, रोजच्या वापरातला कुठलाही मसाला)
  7. १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  8. १ टेस्पून मिठ
  9. केळीच्या पानाचे ४ तुकडे (साधारण १ फूट)
  10. १ टीस्पून तेल
क्रमवार पाककृती:
  1. बांगडे स्वच्छ करून, हळद, मिठ, मसाला, तिखट,धणे पावडर, आलं-लसूण पेस्ट

उमज

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 10/04/2012 05:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा:-http://www.misalpav.com/node/21293 मिथकांचे रचुनी भांडार, दिवाभितांचे सोपस्कार स्त्री होउन मी पुन्हा वाचते, भेद तव कथेचा वारंवार शापित जीवन सदा सर्वदा, राजयोग जरी दिसे दर्शना तळमळ सारी उरात लपवी , माता कुंती पांडव जोजवी बालिका तू कोवळी , बळी तू कुण्या एका जोगड्याची जन्म अभागी पुत्राचा अन मिथक प्रसवली मंत्रांची कलंकित त्वा मग जोड कोठली सामर्थ्यवान पुरुषाची म्हणुनच मग विवाह योगी ...पंडु...ज्या गरज भासे मंत्रांची दिसतो मज अत्याचार ठायी ठायी तव जीवनी कुस्करलेले बालपण अन तहानलेल्या तारुण्यी त्यागुनी सारे राजवैभव पतीसह तू वनवासी राखाया

तो आणि ती

लेखक चाफा यांनी मंगळवार, 10/04/2012 04:36 या दिवशी प्रकाशित केले.
तो आला, नेहमी प्रमाणेच धाड धाड करून शूज रॅकमध्ये ठेवले आणि घरात आला. धडामकन सोफ्यावर पडला, त्याच्या गाडीच्या आवाजानं मी बाहेर आले, पण नेहमीसारखी नव्हे. माझ्याकडे पाहताच त्याचा भडका उडाला, तो उडणारच होता हे मला माहीत होतं. "आशु, अजून सकाळचाच ड्रेस अंगावर ? " " हो ! काय वाईट आहे त्यात ? " " तुला माहीताय मला आवडत नाही " " नसू दे आवडत, मी काही बाउंड्रीवर फिल्डिंग करत नसते की डाइव्ह मारून चेंडू अडवताना कपडे खराब होतील " " तू रैनासारखी फिल्डिंग कर, किंवा द्रवीडसारखी बॅटींग कर पण जरा टापटीप राहायला काही प्रॉब्लेम आहे का तुला ? " " हे 'तू' मला सांगतोयस ?

चांदण्यांची धार

लेखक पेशवा यांनी मंगळवार, 10/04/2012 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
शांततेवर लोंबणारा हा दोर कसला? ज्याचा पीळ ओळखीचा आहे भास ओळखीचा आहे माने भोवतालीचा पेड माझा आकांत भोवरा आहे ?
काव्यरस

आँखें

लेखक श्रीरंग यांनी मंगळवार, 10/04/2012 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास ६-७ वर्षांपुर्वी सागर आर्ट्स (रामायण बनवणार्या रामानंद सागर यांची कंपनी) नी दूरचित्रवाणी इतिहासात मैलाचा दगड ठरावी अशी मालिका दूरदर्शनवर आणली. "उस देश की सरहद को कोई छू नही सकता... जिस देश के सरहद कि निघेबान है आँखें" हे शीर्षकगीत कानावर पडलं, की पुढचा अर्धा तास काहितरी भन्नाट बघायला मिळणार'च', या खात्रीने आम्ही टीव्हीसमोर डोळ्यात प्राण आणून सरसावून बसत असू. अत्यंत कमी बजेटमध्ये चित्तथरारक साहसकथा पेश करण्याचं निर्माता-दिग्दर्शकांचं कसब तर वाखाणण्याजोगं.

Nokia X2 02 : माहीती हवी आहे

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 09/04/2012 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
Nokia X2 02 : या मोबाइलबद्दल माहीती हवी आहे कुणाचा स्वतःचा अनुभव असेल तर उत्तम. असे ऐकले आहे की हा मोबाइल मेसेज उघडू जाता हँग वा रीस्टार्ट होतो कुणाला काही माहीत असेल तर सांगितले तर बरे होइल खाली या मोबाइलच्या रिव्ह्यूच्या लिंक दिल्या आहेत http://discussions.europe.nokia.com/t5/Xseries/X2-02-Restart-Problem/td… http://discussions.europe.nokia.com/t5/Xseries/X2-02-Restart-Problem/td…