नमस्कार मंडळी!
माझ्या चुलत भावाला युजीसी ची नेट (National Eligibility Test (NET)) जुन २०१२ ची परिक्षा द्यायची आहे. या नेट चे अधिकृत संकेतस्थळ हे आहे. तसेच या लिंकवर अधिक माहिती आहे आणि या लि़ंकवर फॉर्म कसा भरावा असली माहिती आहे.
या युजीसी च्या नेट परिक्षेच्या जुन २०१२ या दरम्यान होणार्या?परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागतात. वर उल्लेखलेल्या अधिकृत संकेतस्थळावर २०११ च्या परिक्षांचे वेळापत्रक किंवा तत्संबंधीत तारखा आहेत. त्या अर्थातच जुन्या व झालेल्या परिक्षांच्या आहेत. फॉर्म कसा भरावा या संकेतस्थळावरदेखील २०१२ संबंधी कोणतीही घोषणा नाही. त्यांच्या ईमेल पत्यावर २०१२ च्या परिक्षेबद्दल विचारणा केल्यास सरकारी खाक्याप्रमाणे उलट उत्तर अर्थातच आलेले नाही. त्यांचा संकेतस्थळावर दिलेला फोन नंबर देखील लागत नाही. हे संकेतस्थळ तयार करणार्या खाजगी संस्थेलाही ईमेल करून झालाय.
या अनधिकृत संकेतस्थळावर मात्र जुन २०१२ ला होणार्या परिक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे.
आपल्यापैकी कुणी या परिक्षेसाठी तयारी करत आहे काय? ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत काय आहे? तसेच हा अर्ज ऑनलाईन भरून त्या त्या भागातील टेस्ट सेंटर्स कडे जमा करावा लागतो काय? त्या टेस्ट सेंटर्सच्या यादीमध्ये केवळ वेगवेगळ्या विद्यापिठांची नावे आहेत. मग त्या विद्यापिठाकडे (आपल्या भागात पुणे विद्यापिठ) ह्या अर्जाच्या छायाप्रती द्याव्या काय?
पुणे विद्यापिठाची सेट परिक्षा असते. त्या संकेतस्थळावरदेखील २०१२ च्या परिक्षांची अजून अधिकृत घोषणा नाही.
या काथ्याकुटाचा उद्देश नेट परिक्षेच्या तारखा-मुदत यासंबंधी विचारणा जरी असला तरी सरकारी संकेतस्थळांवर माहिती कितपत अद्ययावत असते याविषयी चर्चा करण्याचा देखील आहे.
वाचने
3871
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहिती.
व्यनी केला आहे.
मोदक इथेच द्या ना.
In reply to व्यनी केला आहे. by मोदक
पहिल्या कंसाशी सहमत आणि दुसर्या कंसाला अनुमोदन
In reply to मोदक इथेच द्या ना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेट परीक्षांचे दोन प्रकार आहेत....
फारच उपयुक्त माहिती मिळाली.
(सदरहू उप-प्रतिसाद धागा वर
In reply to फारच उपयुक्त माहिती मिळाली. by पाषाणभेद