Skip to main content

खस्स्स्स्स् स्स्कन्..

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात खस्स्स्स्स् स्स्कन् चादर ओढल्याचा भास झाला... कोणाचतरी कारटं चादरीवर पसारलं असणार... डोळ्यात धगधगीत आग आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... दारात उघड्यावर झोपलो होतो म्हणून त्या नुसत्या मनातच बरळल्या.. पुन्हा पुन्हा तिडीक उठवणारा तोच चादर ओढल्याचा भास... कोण तडमडतोय रे चादरेवर... मरतोय नुसता **चा.. असशिल कोणाचा लाडाचा कारटा म्हणून झोपेचं खोबर का करतोय.. वात्रट मेलं नालायक कारटं कुणाच... तोंडावरची चादर सारुन हळूच डोकावून बघितल तर ते गल्लीतल शेफारलेलं कुत्र होतं... मग मी त्याच्या कंबरट्यात कच्चकन लाथ मारुन गप गुमान मुस्कटून झोपलो... (आमचे प्रेरणास्थान फस्स्स्स्स्स्स्कन् ;) )

स्नेह संमेलन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/04/2012 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
फेबु..मुक्त पिठ.. अश्या अनेक समुहाची स्नेह संमेलने होत आहेत/ असतात .. मिपा चे हि स्नेह संमेलन असावे का? त्या निमित्ताने सभा सदांच्या भेटी गाठी होतिल व स्नेह भोजनाचा कार्य क्रम हि होईल... अशी योजना राबवता येईल का? चिंता मणी..परा व अनेक अशी अनेक अनुभवी मंडळी हि या समुहावर आहेत.. प्रयत्न केला तर होउ शकते.. मान्यवरानी आपली मते मांडावी..

(फस्स्स्स्स्स्स्कन)

लेखक आदिजोशी यांनी गुरुवार, 12/04/2012 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात सोडा उघडल्याचा फस्स्स्स्स्स्स्कन आवाज आला... कोणाची तरी बायको माहेरी गेली असणार... डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... आमची बायको घरी आहे म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा डोक्यात घुसणारा तो बूच उघडल्याचा आवाज... कोण ढोसतोय इतकी... मजा मारतोय **चा.. असशील सद्ध्या एकटा म्हणून आमची का जळवतोस... हलकट टेंपररी बॅचलर सारे... शेजारच्या घरी डोकाऊन बघितलं तर तो *म्या होता... मी मान खाली घालून ज्यूस पिऊ लागलो...

भस्सकन् ..

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या बाजुने भस्सकन् किंकाळींचा आवाज कानात घुसला... कोणाच्या तरी मोबाईलवार्ता चालू असणार.. कानात धडाधडा कंपनं आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... सवयीने तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या तोंडातच फडाफडा वाजल्या... पुन्हा पुन्हा कानात घुसणारा कचाकचा आवाज.. कोण साला घुसतोय टाळक्यात... नडतोय खालीपिली **चा.. काळ्या पैशाची पैदास सोडलेली ही... मान वळवून मागे बघितलं तर ती माझीच सौ फोनवर होती... मग मी गपगुमान हातातील शॉपिंग बॅगा सांभाळत चालू लागलो..!!!!

काळ कोठडी (भाग ३)

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 12/04/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ त्याच्या अंगाची आग आग होत होती.. पण तो हतबल होता.... केवळ वाट बघणेच त्याच्या हातात होते.. आणि तो वाट बघत राहिला.. .. ... उषा गेली त्याला खूप वेळ झाला, वाट बघता बघता राहुलला झोप कधी लागली समजलेच नाही. अचानक जाग आली त्याला, डोके जसे बधीर झाले होते.. काळामिट्ट अंधार.. तो जोरात ओरडला, पण आवाज घशातच अडकला. चाचपडत, अदमास घेत त्याने पाण्याचे भांडे शोधायचा प्रयत्न केला..ठ्न्न.. जोरात भांडे खाली पडले, रिकाम्या खोलीत आवाज जास्तच घुमला.

आमचं पण महाभारत

लेखक आदिजोशी यांनी गुरुवार, 12/04/2012 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
झक मारली नी जन्म घेतला असं म्हणायची वेळ आणली ह्या १०५ जणांनी. चांगला खाऊन पिऊन सुखी होतो तर ते ह्यांना बघवलं नाही. खायला अन्न नाही, रपेटीला घोडे नाहीत, शेतात राबायला मजूरही नाहीत. सगळ्यांना धरून नेलं. म्हणे युद्ध आहे. महायुद्ध. वर त वर युद्धानंतर दिवसाअखेरी सैनीकांना लागेल म्हणून दारूवरही रेशनींग सुरू केलं. टिआरपी खेचण्यासाठी काय काय नाही केलं ह्यांनी? पोपटाचे डोळेच काय फोडले, झाडंच काय उपटली, एकमेकांना विष काय घातलं, हत्तींना सोंडेला धरून फेकूनच काय दिलं...

मूलींची गरज नाहीये का?

लेखक स्वप्नाळू यांनी गुरुवार, 12/04/2012 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर एवढया टोकाचं बोलायचे नव्हते. पण एवढी टोकाची परिस्थिती नसली तरी परिस्थिती विशेष बदलली पण नाहिये. मधे मिपावर एक लेख वाचला होता - " पूरुषांची गरज काय" असा काहिसा विषय होता. पण सध्या ज्या बातम्या येत आहेत, त्यावरून मूलींची ग र ज नाहिये कि काय असा प्रश्न मनात येतो. बँगलोर सारख्या शहरात काल एका केवळ ३ महिने वयाच्या मूलीचा -' आफ्रिन'चा तिच्या वडिलांनी केलेल्या मारहाणीमूळे म्रुत्यू झाला. कारण का तर बापाला मूलगा अपेक्षित असताना मूलगी जन्माला आली. त्या एवढ्याशा जीवाचा काय अपराध असेल बर ? मागील वर्षी सांगली मधे एका डॉ.

(धप्पकन)

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 12/04/2012 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावरुन जाताना चालू सिग्नलमधून धप्पकन आवाज कानात घुसला.. कोणाचा तरी फाटलेला स्पिकर असणार.. छातीत नुसतीच धडधड आणि मनात कचकचीत शिव्या आल्या.. संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा कानात खुपणारा तो भसाडा आवाज... कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा.. कुठच्याही वेळेला कारटेप लावून शायनिंग मारतात... काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची... मान वळवून मागे बघितलं तर तो '४१४१ घड्याळवाला' स्कॉर्पिओ होता... मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!! -(मनातल्या मनात)

तुझी आठवण येते....

लेखक रसप यांनी गुरुवार, 12/04/2012 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ९०" मधील माझा सहभाग - भिजऱ्या पाउलवाटा आणिक टपटप गळती पाने दरवळ मृद्गंधाचा पाणी खळखळ झुळझुळवाणे हळवी रिमझिम अंगणवेडी ठाव मनाचा घेते धुंद लाघवी संध्याकाळी तुझी आठवण येते मोत्यांनी चमचम करणारी हरिततृणांची पाती सप्तसुरांची रंगसंगती तरळे क्षितिजावरती गंधभारली झुळुक अनाहुत कानाशी गुणगुणते नवी पालवी बघुन कोवळी तुझी आठवण येते ओली वाळू फसफस लाटा अनवाणी पाऊले भुरभुर पाऊस नकळत भिजवे थेंब-थेंब ओघळे डबडबल्या डोळ्यातुन कविता गालावरून झरते लोभसवाण्या कातरवेळी तुझी आठवण येते चिंब चिंब तू चिंब चिंब मी आसमंत भिजलेला गोजिरवाणा शब्द मनाचा ओठांवर थिजलेला दोघां
काव्यरस

कोंकणी माणूस असा का?

लेखक Madhavi_Bhave यांनी गुरुवार, 12/04/2012 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
मला खालील प्रश्न खूप वर्षांपासून पडलेला आहे. इतकी वर्षे मनातच ठेवला होता. मिपाकर नक्की उत्तर देतील असा विश्वास आहे. मी बऱ्याचदा कोकणात फिरायला जाते. माझा एक मामा भालावली (राजापूर जवळ) मध्ये राहतो. एक दोन वर्षांनी त्याच्याकडे पण चक्कर होते. कधी सावंतवाडी, मालवण इत्यादी ठिकाणी देखील फिरणे होते. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे "कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस वाटतो. म्हणजे आपली परिस्थिती सुधारायला हात पाय हलवायला पाहिजे ह्या गोष्टी वर विश्वासच नसावा वाटते. एक प्रकारचा भकासपणा म्हणा किंवा उदासपणा हा अगदी रक्तातच भिनलेला आहे.